शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मालेगावची हालत का बिघडली?

By किरण अग्रवाल | Updated: April 30, 2020 08:28 IST

कोरोनाच्या संदर्भाने राज्याचा विचार करायचा तर मुंबई, पुणे व ठाणे येथे बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.

- किरण अग्रवालस्वस्थता व सुस्तता ही व्यक्तिगत पातळीवर असो, की यंत्रणेच्या; कुठल्याही पातळीवर असली की ती नुकसानीस कशी निमंत्रण देणारी ठरते याचा आदर्श वस्तुपाठ कोरोनामुळे उद्भवलेल्या मालेगावमधील परिस्थितीवरून घेता यावा. कोरोनाच्या विळख्यात अडकून हॉटस्पॉट ठरलेली महाराष्ट्रातील जी विविध शहरे आहेत, त्यापैकी पहिल्या पाचात नाशिक जिल्ह्यातील मालेगावने स्थान मिळविल्याने तेथे ही परिस्थिती का ओढविली, कुणाची स्वस्थता त्यास कारणीभूत ठरली, असा प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये. स्थानिक यंत्रणा व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष यास जबाबदार आहे, की केवळ सरकारी सूचनांचे पालन न करणाऱ्या मालेगावकरांचा दोष; याचा यानिमित्ताने आढावा घेतला जाणे गरजेचे आहे, कारण यापुढील काळात तेथे होणारा कोरोनाचा प्रसार किंवा संक्रमण रोखण्यासाठी ते गरजेचे ठरणार आहे.

कोरोनाच्या संदर्भाने राज्याचा विचार करायचा तर मुंबई, पुणे व ठाणे येथे बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या तीन शहरांच्या पाठोपाठ मालेगावचा नंबर लागतो. मालेगाव सध्या दोनशे बाधित संख्येच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनामुळे ओढवलेल्या मृत्यूच्या संदर्भाने विचार करायचा झाल्यास मुंबई व पुण्यानंतर मालेगावचा नंबर लागतो. तेथे आतापर्यंत १२ जणांचे मृत्यू कोरोनामुळे ओढविले आहेत. शिवाय दिवसागणिक बाधितांच्या संख्येत पडत चाललेली भर पाहता, यापुढील काळात हे संकट अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत; म्हणूनच मालेगावमध्ये अशी स्थिती साकारण्यामागील कारणांचा शोध घेतला जाऊन उपाययोजना केल्या जाणे अत्यंतिक गरजेचे बनले आहे. मालेगाव हे तसे तालुक्याचे शहर.

यंत्रमागाचा प्रामुख्याने व्यवसाय असलेल्या या मालेगावची ओळख म्हणजे हातावर पोट असणाऱ्यांचे गाव. कधीकाळी जातीय दंगली या मालेगावची ओळख बनून राहिल्या होत्या. या दंगलींनी शहराला खूप मागे नेले याची जाणीव मालेगावकरांना झाली. जसा जसा काळ पुढे सरकत गेला, नवीन पिढी आली; तिने या दंगलीत होणा-या आपल्याच स्वत:च्या नुकसानीला लक्षात घेऊन दंगलीच्या आठवणींना तिलांजली देत विकासाचा मार्ग पत्करला. राजकीयदृष्ट्याही तेथील मोसमपुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पालिकेची महापालिका झाली, त्यातून बकालपणाची ओळख पुसून मालेगाव नवा चेहरा घेऊन उभे राहू पाहत असल्याचे गेल्या काही काळात प्रकर्षाने दिसून येत होते. अशातच कोरोनाचे संकट ओढवले व म्हणता म्हणता राज्यातील मुंबई-पुण्यापाठोपाठ मालेगावदेखील हॉटस्पॉट बनले. त्यामुळे पुन्हा एकदा मालेगावचे नाव चर्चेत येऊन जाणे स्वाभाविक ठरले आहे.

मालेगाव आणि कोरोनाचा संबंध तपासता प्रारंभीच्या म्हणजे मार्च महिन्याच्या अखेरीस त्या काळात तेथे यासंदर्भातला मागमूसही आढळत नाही. कागदी घोडे नाचवणे यापलीकडे वास्तवात कसलीही उपाययोजना अगर जनजागृती तेथे होताना दिसली नाही. माध्यमांमधून यासंदर्भात लक्ष वेधले जाऊनदेखील स्थानिक यंत्रणा जागची हलत नव्हती हे विशेष. दरम्यानच्या काळात नाशिक शहरात एक बाधित आढळला व सर्व यंत्रणेचे लक्ष त्याच रुग्णाकडे व नाशिककडे केंद्रित झाले, त्यामुळे मालेगाव आणखीनच बाजूला पडल्यासारखे झाले. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मालेगावमध्ये पहिला रुग्ण दगावला व त्याच दिवशी पाच कोरोनाबाधित आढळले आणि नंतर जिल्हा प्रशासन व स्थानिक यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या.

कोरोनाचा कहर माजल्यावर व थेट मुंबईमधून मुख्यमंत्र्यांनी मालेगावमधील एका डॉक्टरशी संपर्क साधून माहिती घेईपर्यंतही जुजबी कामकाज चालल्याचे दिसून आले, त्यामुळे कोरोनाचे संक्रमण या काळात वाढून गेले आणि आता तर परिस्थिती हाताबाहेर चालल्याचे दिसून येत आहे. यास स्थानिक यंत्रणा नक्कीच जबाबदार आहे. त्यामुळेच तेथे अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांची उचलबांगडी करून धनंजय निकम यांना नेमण्यात आले, तर अवघ्या महिनाभरात सेवानिवृत्त होणारे महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनाही बाजूस करून नवे आयुक्त म्हणून त्र्यंबक कासार यांच्याकडे जबाबदारी सोपविली गेली. पण तोपर्यंत संकट थेट घरात शिरून गेले.

महत्त्वाचे म्हणजे एकीकडे असे प्रशासकीय दुर्लक्ष होताना दिसून आले असतानाच, दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थेट पंतप्रधानांनी व मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर संपूर्ण राज्यात त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना मालेगावमधील दळणवळण व चलनवलन जणू काही कशाची भीती नसल्यासारखेच सुरू असलेले दिसले. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत मालेगावमधील व्यवहार, वर्तन आढळून येत होते. कोरोनाच्या संदर्भाने महापालिकेतर्फे केल्या जात असलेल्या सर्वेक्षणालाही तेथील काही मोहल्ल्यांमध्ये विरोध झाला. इतकेच नव्हे तर सर्वेक्षण करणा-यांवर हल्ले केले गेले, याहीपुढे जाऊन डॉक्टरांवर व रुग्णालयातदेखील हल्ल्याचे प्रकार घडून आले. हे सर्व होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत जाणीव - जागृती करून नागरिकांना त्यांच्या हिताचे काय ते लक्षात आणून द्यायचे, तर तेदेखील पूर्ण क्षमतेने होऊ शकले नाही.

मालेगावमधील लोकप्रतिनिधी वैयक्तिक राजकीय प्रतिमा उजळून घेण्यात व्यस्त राहिले. प्रशासनावर वचक ठेवून प्रशासनाला कामास लावण्याचे त्यांच्याकडून राहूनच गेले, त्यामुळे कोरोनाचा विषाणू हा शहरात बिनदिक्कतपणे शिरला व त्याने हाहाकार माजविला. आता दिवसेंदिवस हे संकट अधिक तीव्र होताना दिसत आहे, त्यामुळे झालेल्या चुका सुधारून सर्वांनीच धडा घेणे व स्वत: सोबतच मालेगाव शहराची सुरक्षितता जपणे प्राधान्याचे झाले आहे. मालेगावकरांनी आतापर्यंत जे सोसले आहे व ज्या वेदनेतून त्यांची वाटचाल सुरू आहे ते पाहता यात आगामी काळात नक्कीच सुधारणा होईल व कोरोनावर मात करण्यात यश लाभेल, अशी अपेक्षा आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMalegaonमालेगांवNashikनाशिक