शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:07 IST

चीनमधील तरुणाई आधीच लग्नाला आणि मुलं जन्माला घालायला नाखुश आहे. त्यात गर्भनिरोधकांचा वापरही तिथे वाढतो आहे, त्यामुळे चीनमधील अपेक्षित जन्मदर सातत्याने घटतो आहे.

आपल्या देशाची लोकसंख्या कशी वाढवावी यासाठी चीन सध्या फारच घायकुतीला आला आहे. त्यासाठी जे जे म्हणून प्रयत्न करता येतील ते ते प्रयत्न आणि उपाय चीन करून पाहतो आहे. साम-दाम-दंड-भेद.. या साऱ्याच उपायांचा उपयोग त्यासाठी चीननं करून पाहिला आहे. पण, आता त्याही पुढचं पाऊल उचलताना चीनच्या नागरिकांनी विशेषत: तरुणाईनं कंडोमसह इतर कोणत्याही गर्भनिरोधकांचा वापर शक्यतो करू नये, यासाठी सर्वच गर्भनिरोधकांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे.

चीनमधील तरुणाई आधीच लग्नाला आणि मुलं जन्माला घालायला नाखुश आहे. त्यात गर्भनिरोधकांचा वापरही तिथे वाढतो आहे, त्यामुळे चीनमधील अपेक्षित जन्मदर सातत्याने घटतो आहे. अलीकडच्या काळात तर त्यांचा जन्मदर ऐतिहासिक नीचांकीवर आला. याला आळा घालण्यासाठी चीननं आता गर्भनिरोधकांवर मोठा कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे, याशिवाय गर्भनिरोधकांचे उत्पादनही घटवलं जाण्याची शक्यता आहे. हा उपाय तरी यशस्वी होतो का, याची चाचपणी आता चीन सरकार करत आहे. गर्भनिरोधकांचा वापर कमी झाल्यानं आपोआपच जन्मदर वाढेल असा त्यांचा कयास आहे. 

चीन सध्या लोकसंख्येतील घसरण थांबवण्यासाठी व्यापक धोरणात्मक बदल करत आहे. गेल्या काही वर्षांत देशाच्या जन्मदरात सातत्याने घट होत असून, २०२४ मध्ये सलग तिसऱ्या वर्षी लोकसंख्या कमी झाल्याची नोंद झाली. ही घसरण दीर्घकालीन आर्थिक, सामाजिक आणि श्रमबाजाराच्या दृष्टीने धोकादायक मानली जात आहे. 

चीनमध्ये १९९३ पासून कंडोम आणि इतर गर्भनिरोधक साधने करमुक्त होती. ‘वन चाइल्ड पॉलिसी’च्या काळात जन्म नियंत्रणाला चालना देण्यासाठी सरकारनं ही उत्पादनं स्वस्त आणि सहज उपलब्ध केली होती. मात्र, आता ३२ वर्षांनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. लोकसंख्येतील घट, कमी प्रजननदर आणि वृद्धांच्या भरमसाट वेगानं वाढत्या लोकसंख्येमुळे चीन चिंताक्रांत झाला आहे. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये जानेवारी २०२६ पासून कंडोमसह सर्व गर्भनिरोधक उत्पादनांवर १३ टक्के अतिरिक्त कर लागू केला जाणार आहे. सरकारचा दावा आहे की, किमती वाढल्यास गर्भनिरोधकांचा वापर कमी होईल आणि परिणामी जन्मदर वाढण्यास मदत होईल. चीनची लोकसंख्या सातत्यानं आणि वेगानं घसरते आहे. त्यात संयुक्त राष्ट्रसंघानेही अंदाज वर्तवला आहे की, चीनमधील १५ ते ४९ वयोगटातील महिलांची संख्या या शतकाच्या अखेरीस तब्बल दोन-तृतीयांशांनी कमी होऊन १०० दशलक्षापेक्षा खाली जाईल. म्हणजेच, भविष्यात प्रजननक्षम लोकसंख्येचा आधारच मोठ्या प्रमाणात कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

वाढती महागाई, घरांच्या किमती, शिक्षणावरील खर्च, बदलती जीवनशैली यामुळे अपत्यजन्माचे प्रमाण कमी झाले आहे. ‘तीन अपत्य धोरण’, मातृत्व रजेत वाढ, मुलांना शैक्षणिक सवलती, जोडप्यांना आर्थिक अनुदान, विवाहांना प्रोत्साहन अशा अनेक पातळ्यांवर सरकार प्रयत्न करते आहे. त्यातलाच एक उपाय म्हणजे गर्भनिरोधकं महाग करणे. या मार्गाने लोकसंख्या खरंच वाढेल का, यावरही मतभेद आहेत. मात्र, उतावीळ झालेल्या आणि घायकुतीला आलेल्या चीनला काहीही करून आपल्या देशाचा जन्मदर वाढवायचाच आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : China Hikes Contraceptive Prices to Boost Declining Birth Rate

Web Summary : China, facing a declining birth rate, is increasing contraceptive prices and potentially reducing production. This follows other measures like incentives for families. The goal is to reverse population decline, deemed a threat to the economy and society, despite concerns about effectiveness.
टॅग्स :chinaचीन