शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

काँग्रेसमुक्ती : त्यांचे ‘स्वप्न’, यांचे ‘भान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:33 IST

देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दर्पोक्तीवर संघाच्या मोहन भागवतांनी पाणी फिरविले आहे. ‘अशी मुक्ती राजकीय असल्याने ती संघाच्या भूमिकेत बसणारी नाही’ हे त्यासोबत भागवतांनी केलेले भाष्य मात्र कमालीचे फसवे आहे.

- सुरेश द्वादशीवारदेश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दर्पोक्तीवर संघाच्या मोहन भागवतांनी पाणी फिरविले आहे. ‘अशी मुक्ती राजकीय असल्याने ती संघाच्या भूमिकेत बसणारी नाही’ हे त्यासोबत भागवतांनी केलेले भाष्य मात्र कमालीचे फसवे आहे. ते फसवे म्हणण्याचे कारण तसे सांगताना, ‘संघ ही राजकीय संघटना नसल्याचे’ आता सर्वांनाच अविश्वसनीय वाटणारे मत त्यांनी सूचित केले आहे. देश काँग्रेसमुक्त होणार नाही याचे भान भाजपहून संघाला अधिक आहे हे सांगणारीही ही बाब आहे.काँग्रेस ही १८८५ मध्ये स्थापन झालेली संघटना आरंभीची ६२ वर्षे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढली आहे. त्या लढ्याचा अतिशय तेजस्वी वारसा तिला लाभला आहे. नौरोजी, टिळक, गोखले, मेहता, गांधी, पटेल, नेहरू व मौलानांसारख्या एकाहून एक थोर नेत्यांची प्रभावळ तिच्या पाठीशी आहे. या नेत्यांच्या कार्याने काँग्रेसच्या स्थापनेपासून विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंतचा देशाचा इतिहास घडविला आहे. हा इतिहास देशाची राजकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक घडण करणारा आहे. तो पुसता येत नाही आणि त्याजागी स्वातंत्र्यलढ्यापासून स्वत:ला दूर ठेवणाऱ्या संघाला आपल्या भूमिकेचा वारसा बसविता येत नाही. भागवतांना हे समजणारे आहे. संघाने १९५० मध्ये स्थापन केलेल्या जनसंघाचा भाजप हा नवा अवतार १९८० मध्ये अस्तित्वात आला. तोच तेवढा ज्यांच्या लक्षात आहे त्या मोदी व शहा आणि त्यांच्या अनुयायांना मात्र आपण काँग्रेसचा १३५ वर्षांचा इतिहास आपल्या ३७ वर्षांच्या वाटचालीच्या (व विशेषत: मोदींच्या तीन वर्षांच्या राजवटीच्या) भरवशावर मिटवू शकतो असे वाटणेही त्याचमुळे समजण्याजोगे आहे. मूळात या सगळ्या वक्तव्यांना व त्यातील परस्परांना फसवा छेद देण्याच्या प्रयत्नांना वास्तवात अर्थ नाही. संघ ही सांस्कृतिक संघटना पूर्वीही नव्हती व आताही नाही. १९२५ मधील स्थापनेपासून संघाने काँग्रेस, गांधी व त्यांच्या नेतृत्वातील स्वातंत्र्याचा लोकलढा यापासून दूर राहण्याचाच नव्हे तर त्याची टवाळी करण्याचा व त्याचे बळ कमी होत राहील याचाच प्रयत्न केला. स्वातंत्र्याच्या लोकलढ्यातील कोणत्याही नेत्याचे वा त्या लढ्याचे मोठेपण संघाने कधी मान्य केले नाही. गांधीजींचा खून करणाºया गोडसेचा त्याने निषेध केला नाही आणि गांधीजींचे जगाने मान्य केलेले महात्म्यही कधी स्वीकारले नाही. गोडसेला महात्मा म्हणणारी एक जमात महाराष्ट्रात आहे. तिच्या राजस्थान शाखेने परवा त्याचा पुतळाही लावला. संघाने गोडसेच्या तसबिरी लावल्या नाहीत. मात्र त्याचे महत्त्वाचे कारण कधीकाळी संघात असलेला गोडसे पुढे सावरकरांसोबत गेला व त्यांचा भक्त बनला हे आहे. सावरकरांचे हिंदुत्व संघाच्या हिंदुत्वाहून वेगळे आहे आणि ते संघाला अमान्य होणारे आहे. संघ ही संघटना राजकीय नसून सांस्कृतिक आहे असे म्हणणे ही निव्वळ धूळफेक आहे आणि स्वत:ची फसवणूक हेच आपले बुद्धिवैभव असे समजणाºया भगतांखेरीज ती इतर कुणाचा बुद्धिभेदही करू शकत नाही. काँग्रेसमुक्त भारत ही मोदींची भूमिका राजकीय असल्यामुळे ती आम्हाला मान्य नाही असे सांगून भागवतांनी ही धूळवड पुन्हा एकवार केली आहे, एवढेच यातले सत्य आहे. संघ खरोखरीच राजकारणमुक्त असेल तर अडवाणींना घालवून भाजपच्या अध्यक्षपदी गडकरी यांना आणले कुणी? आणि मोदींची मुसंडी पुढे येतपर्यंत त्यांचे ते पद रेटून धरले तरी कुणी? अयोध्येचे राजकारण करतो कोण आणि हिंदू धर्माला राजकारणाचा रंग देतो कोण? भाजपच्या प्रत्येक पातळीवर असणारा संघटन सचिव हा संघाचा माणूस असतो व तो संघाच्या वतीने पक्षावर नियंत्रण ठेवतो हे जगाला ठाऊक नाही काय? हां, आता ते मोदी संघाच्या बºयाचशा गोष्टी ऐकत नाहीत कारण ते स्वबळ-प्रतिष्ठित आहेत, एवढेच.देश काँग्रेसमुक्त करणे इंग्रजांना जमले नाही. ‘तुझ्या तुरुंगात असताना तू गांधींचा शेवट केला असता तर आपले साम्राज्य आणखी काही दशके जगावर राहिले असते’ हे चर्चिलने दक्षिण आफ्रिकेचे गव्हर्नर जनरल स्मट्स् याला ऐकविलेले विधान याची साक्ष देणारे आहे. मात्र स्मट्स्ने जे केले नाही ते गोडसेने केले. तरीही गांधी संपले नाहीत. उलट भारताचे असलेले गांधी नंतरच्या काळात साºया जगाचे झाले. नौरोजी आणि टिळकांच्या काळापासून गावोगाव उभी राहिलेली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फळी प्रसंगी निस्तेज झाली असली तरी ती कधी नामशेष झाली नाही आणि आता तर तिने आपल्या तरुण नेतृत्वात नवी उभारी घेतली असल्याचे गुजरातपासून बिहारपर्यंत आणि राजस्थानपासून बंगालपर्यंत सर्वत्र आढळले आहे. बहुमतासाठी आमदारांची ठोक खरेदी करण्याची पाळीही तिने गोवा, नागालॅन्ड, मेघालय आणि मणिपूर या राज्यात मोदींच्या पक्षावर आणल्याचे दिसले आहे. सत्ता मिळविण्यासाठी ज्याच्याशी लढा दिला त्या नितीशकुमारांचे नेतृत्व भाजपला बिहारमध्ये स्वीकारावे लागले आहे आणि २०१४ मध्ये आक्रमक दिसलेला तो पक्ष आता बचावाचे पवित्रे घेताना दिसत आहे.आपले ऐतिहासिक नेतृत्व अपुरे पडले म्हणून की काय, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हुतात्मा राजगुरू या त्याच्यापासून सदैव दूर राहिलेल्या नेत्यांना आपला रंग फासण्याचा उद्योग संघ परिवाराने आता हाती घेतला आहे. सारा भारतीय समाज साक्षर व पदवीधर नसला तरी तो सत्य समजणारा आहे. त्याला खºया खोट्यातील फरक आणि चेहरे व मुखवटे यातले अंतरही चांगले समजणारे आहे. त्यामुळे मोदींचे ‘काँग्रेसमुक्त’ म्हणणे आणि ‘ते राजकीय असल्याने आमचे नाही’ हे भागवतांचे सांगणे यातला फरक त्यातील फसवेपणासह त्याला चांगले ओळखता येणारे आहे.काँग्रेस हा साधा राजकीय पक्ष नाही. लोकचळवळीतून उभा झालेला व सर्वांना कवेत घेणारा तो व्यापक विचारही आहे. काळ ही साºयांना थकवा आणणारी बाब आहे. ती व्यक्तींएवढीच संस्थांमध्येही प्रकृती दोष आणत असते. मात्र विचार व धारणा या बाबी सदैव सजीवच नव्हे तर तरुण राहत असतात. गंगेचे पाणी समुद्राला मिळत असतानाच तिच्या प्रवाहात नव्या पाण्याचे लोंढे येतात. संघाला पाऊणशे वर्षाहून अधिक आयुष्य लाभल्याने त्यालाही यातले वास्तव आता समजावे असे आहे. ज्या संघटना आतून बंद असतात त्यांना लहानसा तडा गेला तरी त्या कोसळून नाहिशा होतात. कम्युनिस्ट पक्षाचे रशियात जे झाले आणि चीनमध्ये जे होताना दिसते ते याचेच पुरावे आहेत. बंदिस्तांचा कोसळ होतो आणि खुल्यांना विस्तारता येते. त्यामुळे मोदींनी स्वप्ने पाहायला आणि शहांनी ती गोंजारायला हरकत नाही. भागवतांनीही ‘आम्ही त्यातले नाही’ असे खोटे सोवळेपण करायलाही हरकत नाही. मात्र त्यांच्या अशा वक्तव्यातल्या वास्तवाची व त्यांच्या भूमिकांमधल्या तथ्याची खरी जाण जनतेला आहे हे त्यांनीही समजूनच घेतले पाहिजे. शेवटी इतिहास कृतीने घडतो. भविष्यकथनातून स्वप्नेच तेवढी उभी होतात. ती सा-यांनी पाहावी, पण ती स्वप्ने आहेत हेही लक्षात घ्यावे एवढेच.(संपादक, नागपूर) 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMohan Bhagwatमोहन भागवत