शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

कोंडलेली नग्नता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 10:25 IST

नग्न देहांची छायाचित्रे आपल्या संस्कृतीशी संवादी नाहीत असा आक्षेप घेऊन एका तरुण छायाचित्रकाराचे प्रदर्शन सुरू होण्याआधीच थांबवण्याची घटना नुकतीच पुण्यात घडली. त्यानिमित्ताने...

- अक्षय माळी(छायाचित्रकार) 

प्रत्येक माणूस एका बंद खोलीत ‘नग्न’ देह घेऊनच वावरत असतो..पण हीच गोष्ट बाहेर उघडपणे करायची म्हटली की संस्कृतीच्या चौकटी येतात. त्या आपणच आणतो. खरंतर आपल्या प्राचीन संस्कृतीमध्येही ‘नग्नता’ आहेच. ’खजुराहो’ ची शिल्पं बघण्यासाठी लोकं पैसे खर्च करून जातात. ती शिल्प नग्न चालतात, पण माणसं नाही. हे सगळं पाहिलं की वाटतं, हे जग आणि जगातली माणसं किती फसवी आहेत ! जे वाटतं ते मोकळेपणाने मांडता यावं एवढी साधी गरजही पूर्ण नाही होत इथे !  हो, मी नग्न छायाचित्रं काढतो. मला जे वाटतं, अस्वस्थ करतं ते मी माझ्या छायाचित्रांमध्ये बंदिस्त करतो. जे मी टिपलंय; ते कदाचित दुसऱ्याला अर्थहीन वाटू शकतं. कोणताही चित्रकार किंवा छायाचित्रकार आपण काय काढलंय हे कधीच शब्दांत मांडू शकत नाही. त्यांना ‘नि:शब्द’च राहायचं असतं ! मलाही ! चित्र किंवा छायाचित्र या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत, त्यातला अर्थ “समजावण्याची” वेळ यावी, हेच मुळात दुर्दैव ! मी मूळचा साताऱ्याचा. पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण तिथंच घेतलं. वाईट संगतीला लागलो. शाळा शिकण्याची आवड नव्हती. मग कुटुंबाने एका मिलिटरी शाळेत घातलं. तिथं आयुष्य एकदम शिस्तबद्ध झालं. रोजचा दिनक्रम ठरलेला असायचा. त्यात काही बदल नाही. आयुष्याला एक साचेबद्धपणा आला होता. तिथं असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये मी जीवंत राहू शकतो, असा आत्मविश्वास आला होता. दहावीनंतरची दोन वर्षेही मावशीच्या घरी शिस्तबद्धतेमध्येच गेली.  तिथंच मी बंड पुकारलं होतं. सिंबायोसिसला पहिल्या वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर मग मी स्वत:ला खऱ्या अर्थानं व्यक्त करायला लागलो. पाच वर्षांच्या तांत्रिक जगण्यातून बाहेर पडलो होतो. सुरुवातीला वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करत होतो. पण सिंबायोसिसला गेल्यावर माझ्यातला आत्मविश्वास एकदम ढासळला. सगळे इंग्रजीमध्ये बोलत. मी गावाकडून आलेलो. “तू इंग्रजीमध्ये का बोलत नाहीस?” असं एका शिक्षिकेने विचारल्यावर माझी मैत्रिण पटकन म्हणाली, ’तो नाही तर त्याचं काम बोलतं’!... मग काम बोलायला पाहिजे असं काहीतरी करायचं असं ठरवलं. केस वाढवणं, फाटक्या जीन्स घालणं असं सगळंच सुरू केलं होतं. अचानक वाइल्ड लाइफमधून फॅशन फोटोग्राफीकडे वळलो. माझ्या छायाचित्रातून आता विचार बाहेर पडायला हवा असं वाटलं. एकदा आम्हाला ‘जेंडर स्टिरिओटाइप’’ असा एक विषय असाइनमेंटला दिला होता. खरंतर त्याचा अर्थही मला माहिती नव्हता. एका मैत्रिणीबरोबर सिगरेट ओढत होतो,  तिला शब्दाचा अर्थ विचारला आणि तिने न सांगताच तो मला गवसला. मुलगी सिगरेट ओढत आहे म्हणून लोकांनी वेगळ्या नजरेने का पाहावं?- असं जाणवलं आणि तोच ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. अमेरिकेतले फोटोग्राफर राइन मँकेले यांची ’नग्न’ छायाचित्रं पाहिल्यानंतर आपणही हे भारतात करू शकतो असं वाटलं. पण त्यासाठी कुणाशी मोकळेपणाने चर्चाही शक्य नव्हती. कुणी मॉडेल्सही मिळाली नाहीत. मग स्वत:च स्वत:चीच ’नग्न’छायाचित्रं काढू लागलो. मी जेवढ्या मोकळेपणाने उभा राहू शकत होतो तेवढं कुणी राहील असं वाटत नव्हतं. सोशल मीडियावर पहिलं छायाचित्र टाकलं आणि कुटुंबात खळबळ माजली. हे स्वीकारायला कुणी तयार नव्हतं. तरीही मला हटायचं नव्हतं. “तू बरोबर करतोयस” असं सांगणारं आसपास कुणी नव्हतं. पण गोव्यातील एका मित्राचा फोन आला; तो म्हणाला, चालू दे !  खरंतर हा ‘आर्ट फॉर्म’ काय आहे हे मला शब्दांत कधी समजवता आलं नाही आणि येतही नाही. नवनवीन शब्द कानावर पडतात तसं मी सांगत जातो. त्याला कधी ‘बॉडी पॉझिटिव्हिटी’ म्हणतो. लहानपणापासूनची जी रग अंगात साठली होती, ती या आर्ट फॉर्ममधून गवसली. जे सत्य आहे ते मी पुढं ठेवतो आहे, फक्त लोकांना ते पचत नाही. म्हणून लोक विरोध करतात. काही लोकांना माझी न्युडस आवडतात. काहीतरी नवीन पाहायला मिळतं याचा त्यांना आनंद आहे तसा काहींचा विरोधही आहे. मला एकच जाणवतं; ‘मिनिंग इज मिनिंगलेस’.. मला अनेकजण ‘वेडा’ ठरवू शकतात, पण कुणी कसंही बघू देत, माझी प्रदर्शनं बंद पाडू देत...मी कुणाला विरोध करणार नाही किंवा निषेधही व्यक्त करणार नाही... व्यक्त होईन ते आर्ट फॉर्ममधूनच ! पाश्चात्य देशांमध्ये ही गोष्ट खूपच नॉर्मल आहे. ‘मोमा’ प्रदर्शनात तर लोक नग्न छायाचित्रं काढण्यासाठी आपणहून उभे राहतात. आपल्याकडे याला वेळ लागेल. कदाचित शंभर वर्षांमध्ये काहीतरी बदलेल... म्हणून आता मी थांबणार नाही ! शब्दांकन : नम्रता फडणीस

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र