शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

‘उंबरठे’ ओलांडून ‘ती’ दिल्लीत पोहोचते; त्याची गोष्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 11:11 IST

सर्वपक्षीय स्त्री खासदारांशी संवाद साधणारा ‘नेत्री’ हा प्रकल्प विशेष चर्चेत आहे. त्या मुलाखतींचे संक्षेप सांगणारी लेखमाला आजपासून दर पंधरा दिवसांनी!

शायना एन. सी., भाजप नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या -सार्वजनिक जीवनात स्त्री म्हणून वावरताना एक बाब मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे राजकारणातले पुरुष नेते अनेकानेक व्यासपीठांवरून सतत बोलत असतात. राजकारणातला त्यांचा प्रवास, त्यांचे कष्ट,  त्यांच्यासमोरची आव्हानं याबाबत त्यांना उत्सुकतेने विचारलं जातं. ही संधी स्त्री नेत्यांना मात्र अभावानेच मिळते. त्यातूनही ज्या स्त्रिया कोणतीही पार्श्वभूमी नसताना ग्रामीण भागातून राजकारणात आल्या, खासदार म्हणून संसदेत पोहोचल्या, त्यांचा व्यक्तिगत प्रवास कसा असेल? त्यांची गोष्ट काय असेल? राजकारणातल्या महिलांकडे कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, तर मग सगळी चर्चा तिचं कुटुंब, ती कोणाची मुलगी, कोणाची पत्नी, कोणाची सून, कोणाचा वारसा कसा चालवते आहे याभोवतीच फिरत राहते; पण याही स्त्रियांना करावा लागलेला संघर्ष, त्यांच्यासमोरची आव्हानं  याबाबत फार बोललं जात नाहीच.

या स्त्रियांचं सोडाच, पण भारतीय राजकारणात आज कितीतरी स्त्रिया  दुर्गम, ग्रामीण भागातून, अगदी जंगलातून येऊन दिल्लीत पोहोचल्या आहेत, आपल्या ताकदीवर खासदार झाल्या आहेत. त्यांच्या या कर्तृत्वामागची गोष्ट उलगडून पाहण्यासाठी मी ‘नेत्री’ या प्रकल्पाचा प्रारंभ केला. पक्षाचे भेदाभेद न् मानता लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांशी संवाद हा त्या प्रकल्पामागचा उद्देश ! महिला खासदारांच्या मुलाखती घेताना एक बाब प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे अनेक जणी या मुलाखतींच्या निमित्ताने  पहिल्यांदा आपल्या मनातलं सांगत होत्या. आपण राजकारणात का आलो, आपल्याला काय करायचं आहे, यावर मोकळेपणाने बोलत होत्या. 

गोमती सहाय. छत्तीसगडमधल्या खासदार. पहिल्यांदा स्टुडिओमध्ये बोलवून कोणी आपली मुलाखत घेत आहे, याचंच त्यांना विशेष वाटत होतं. अख्खं आयुष्य जंगलात गेलेल्या गोमती सहाय खासदार होऊन दिल्लीला जातात या घटनेतच एक मोठा संघर्ष लपलेला आहे. त्या सांगत होत्या, त्यांच्या नवऱ्याने कधीही त्यांच्या कामात ढवळाढवळ केली नाही. ते कधीही पत्नीसोबत दिल्लीला गेले नाहीत. लोकशाहीचा मजबूत कणा दाखवणाऱ्या अशा कहाण्या सर्वांपर्यंत पोहोचणं मला महत्त्वाचं वाटतं. 

साध्वी निरंजन ज्योती यांनी त्याग आणि तपश्चर्या करून आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेला दिलं.  इतर स्त्री खासदारांच्या तुलनेत हेमा मालिनी यांचा प्रवास अगदीच सोपा असेल, असं कुणालाही वाटेल; पण त्या सांगतात, ती वस्तुस्थिती वेगळी आहे. मुंबईहून मथुरेला जाणं, तिथून निवडणूक लढवणं, तेथील सामान्य जनतेचा विश्वास जिंकणं हे अतिशय अवघड आव्हान हेमा मालिनी यांनी पार केलं, ते कसं हे समजून घेणं मला महत्त्वाचं वाटतं. 

दिया कुमारी तर राजघराण्यातल्या. पण त्या राजकारणात  आल्या आणि त्यांचं आयुष्य, दृष्टिकोन सारंच कसं बदलत गेलं याची त्या सांगतात ती कहाणी फारच वेधक आहे. सुनीता दुग्गल महसूल खात्यातील नोकरी सोडून राजकारणात आल्या. अपराजिता सारंगी आयएएस अधिकारी होत्या, आपलं तिथलं करिअर सोडून त्या राजकारणात आल्या त्या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी नाही; तर ३३ टक्के आरक्षणाच्या सहाय्याने राजकीय क्षेत्रात येऊन समाजात काहीतरी बदल करण्याची महत्त्वाकांक्षा या महिला खासदारांनी बाळगली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या अशाही महिला खासदार मला भेटल्या, ज्यांना आपल्याला काय करायचंय हे नेमकं सांगता येत नाही, पण त्यांचं नियोजन मात्र स्पष्ट आहे.

अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या, आपली लढाई आपल्या ताकदीवर लढून सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांतल्या स्त्री खासदारांची गोष्ट ‘नेत्री महिला सांसद और उनकी कहानिया शायना एन.सी. के साथ’ या यू-ट्यूब कार्यक्रमात मी उलगडली. त्या कहाण्यांचं संक्षिप्त रूप मुद्रित स्वरुपात लिहिण्याचा प्रयत्न या लेखमालेतून मी करणार आहे.

टॅग्स :Womenमहिला