शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

‘अभिजात’ मराठीसाठी पंतप्रधान कार्यालय कृतिशील व्हावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 05:34 IST

नव्या वर्षात मराठी भाषा दिनापूर्वी अभिजात दर्जा मिळाल्याची आनंदाची बातमी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. आता पंतप्रधान कार्यालयाने कृती करून गतिमान प्रशासनाचे उदाहरण घालून द्यावे, ही माफक अपेक्षा आहे.

- विजय बाविस्करनव्या वर्षात मराठी भाषा दिनापूर्वी अभिजात दर्जा मिळाल्याची आनंदाची बातमी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. आता पंतप्रधान कार्यालयाने कृती करून गतिमान प्रशासनाचे उदाहरण घालून द्यावे, ही माफक अपेक्षा आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठीची कृतिशील कार्यवाही विचाराधीन आहे, असे पत्र पंतप्रधान कार्यालयातील सांस्कृतिक मंत्रालय सचिवांचे विभागीय अधिकारी कुमार शैलेंद्र यांनी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना पाठविले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्रा. रंगनाथ पठारे समितीने सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात मसापने पुढाकार घेतला. त्यासाठी लोकचळवळ उभी केली. लेखकांची बैठक, मसापचे सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी शाहूपुरी शाखेमार्फत पंतप्रधान कार्यालयाला पाठविलेली एक लाखाहून अधिक पत्रे, मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाबाबत भूमिका घ्यावी, यासाठी मसापच्या शिष्टमंडळाने घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे धूळखात पडलेल्या अभिजात भाषेसाठीच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू झाली. सहा महिन्यांपूर्वी मसापने पाठविलेल्या पत्राला उत्तर देताना मद्रास उच्च न्यायालयातील याचिका निकाली निघाल्याने सांस्कृतिक कार्यालयाला सुधारित कॅबिनेट नोट तयार करण्याचा आदेश देण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. पण, त्यानंतर कोणतीच ठोस कार्यवाही न झाल्यामुळे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पुन्हा ८ डिसेंबर रोजी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करून, नवीन वर्षात मराठी भाषा दिनापूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे ठोस आश्वासन द्यावे; अन्यथा २६ जानेवारी रोजी दिल्लीत मराठीप्रेमींसमवेत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तसे पत्रही पंतप्रधान कार्यालयाला पाठविले होते. या आंदोलनात छत्रपती घराण्याचे वारसदार या नात्याने सहभागी होण्याचा निर्णय साताºयाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला होता. परिषदेच्या पत्राला उत्तर देताना अभिजात दर्जाच्या कृतिशील कार्यवाहीसाठी केंद्र सरकार विचाराधीन असल्याचे कळविण्यात आले आहे. पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे, बडोदा येथे होणाºया ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांचा सत्कार डॉ. पी.डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभात प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या भाषणात ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठीच्या प्रयत्नांत महाराष्ट्रातील राजकीय इच्छाशक्ती अपयशी ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बडोद्यातून निवडणूक लढविताना आपल्या स्वाक्षरीने उमेदवारी अर्ज भरला होता. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या पत्रावर पंतप्रधानांची स्वाक्षरी आपण घ्यावी,’ असे भावनिक आवाहन केले. त्याला राजमातांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ‘या कामासाठी निश्चित पुढाकार घेईन,’ असे आश्वासन दिले. त्यामुळे मराठी भाषकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. नव्या वर्षात मराठी भाषा दिनापूर्वी अभिजात दर्जा मिळाल्याची आनंदवार्ता मिळणार का, याकडे मराठी जगताचे लक्ष लागले आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. आता पंतप्रधान कार्यालयाने कृती करून गतिमान प्रशासनाचे आदर्श उदाहरण घालून द्यावे. बडोद्याच्या संमेलनात पंतप्रधानांना निमंत्रित करण्याचा संयोजकांचा मानस आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा झाल्यास हे संमेलन ऐतिहासिक ठरेल. 

टॅग्स :marathiमराठी