शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

स्वराज्याकडून सुराज्याच्या दिशेने नागरी सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 2:45 AM

७० वर्षांपूर्वी २१ एप्रिल १९४७ रोजी देशाचे पहिले गृहमंत्री आणि देशाच्या राजकीय एकीकरणाचे महान शिल्पकार, स्वराज्यासाठी लढलेले सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीच्या मेटकाफ हाऊस येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील पहिल्या तुकडीतील अधिकाऱ्यांना संबोधित केले होते.

- एम. व्यंकय्या नायडू(उपराष्ट्रपती)७० वर्षांपूर्वी २१ एप्रिल १९४७ रोजी देशाचे पहिले गृहमंत्री आणि देशाच्या राजकीय एकीकरणाचे महान शिल्पकार, स्वराज्यासाठी लढलेले सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीच्या मेटकाफ हाऊस येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील पहिल्या तुकडीतील अधिकाऱ्यांना संबोधित केले होते. या ऐतिहासिक संबोधनात त्यांनी स्वतंत्र भारतासाठी नागरी सेवेचा दृष्टिकोन काय असावा, हे समजावून सांगितले. अशा प्रकारे सुराज्य आणि सुशासनाचा पाया घातला गेला. २१ एप्रिल रोजी साजरा होणारा ‘नागरी सेवा दिवस’ वास्तविकत: उत्सव साजरा करण्याचा चिंतन-मनन करण्याचा आणि कटिबद्धता आणखी मजबूत करण्याचा दिवस आहे. ब्रिटिशांनी विदेशी मालकांसाठी स्थापित केलेल्या मुलकी सेवांमध्ये परिवर्तन करून त्या नागरिकांच्या सेवेकडे वळविण्याचा हा दिवस होता. त्यात प्रशासकीय सेवा किंवा नोकरी करण्याऐवजी पूर्ण मनाने देशाची सेवा करण्याची आवश्यकता होती. सरदार पटेल यांनी ते अतिशय समर्पकपणे ते स्पष्ट केले होते. मुलकी सेवा आता इतिहासातील परंपरा आणि सवयींतून निर्माण होणाºया अडसरांपासून स्वतंत्र होईल. मुलकी सेवांना आता राष्टÑेसेवतील आपल्या वास्तविक भूमिकेला अवलंबावे लागेल. अधिकाºयांना आपल्या दैनंदिन प्रशासनात सेवेची वास्तविक भावना निर्देशित करायला हवी. कारण अन्य कोणत्याही प्रकारे ते या चौकटीत बसू शकणार नाही. त्यांच्या या शब्दांपासून प्रेरणा घेत आपल्या देशातील लोकसेवक सुशासनाच्या माध्यमातून सर्व भारतीयांच्या जीवनमानातील गुणवत्ता सुधारण्याच्या आव्हानांचा सामना करीत आले आहे. त्यात त्यांना उल्लेखनीय यशही मिळाले आहे. देशविकासाच्या गाथेत लोकसेवकांची चिकाटी, योग्यता आणि कटिबद्धतेचे मोठे योगदान राहिले आहे. सरदार पटेल यांनी भारतासारख्या वैविध्यपूर्ण राष्टÑाला एकीकृत करणाºया आणि राष्टÑनिर्मिती प्रक्रियेत योगदान देणाºया नागरी सेवांना पोलादी चौकटीच्या रूपात मानले. संसदेत १० आॅक्टोबर १९४९ रोजी त्यांनी उच्चारलेले शब्दांचे स्मरण करणे यावेळी प्रासंगिक ठरेल. ते म्हणाले होते की, नागरी सेवेतील बहुतांश सदस्यांनी कौशल्याने देशाची सेवा केली नसती तर व्यावहारिकदृष्ट्या संघराज्य हिंमत हारले असते, ही बाब मी सभागृहाच्या पटलावर नोंदू इच्छितो. माझ्या मते काही मार्गदर्शक तत्त्वे देशाच्या उच्च नागरीसेवांचा आधार बनत असून या झºयांना आटू दिले जाऊ नये. मी चार प्रमुख तत्त्वांची रूपरेखा सादर करू इच्छितो. सहानुभूती, दक्षता, निष्पक्षता आणि सुचारित्र्य हे ती चार तत्त्वे आहेत. सहानुभूती हा नागरी सेवेच्या माध्यमातून सरकारचा सर्वाधिक दिसणारा चेहरा आहे. कारण नागरिकांच्या वेगवेगळ्या सेवा प्राप्त करवून घेण्यासाठी लोकसेवकांशीच संपर्क करण्याची आवश्यकता असते. सरकारची प्रतिमा लोकसेवकांवरच निर्भर असते. ते नागरिकांच्या गरजा आणि अपेक्षांना पूर्ण करतात. खरे तर सहानुभूती आणि सौजन्य वास्तवात ग्राहकांच्या समाधानात मोठे योगदान देत असते. नागरिकांचा सन्मान आणि तत्परतेसह सेवेची दक्षता ही चांगल्या प्रकारे काम करणाºया नागरी सेवेची ओळख असते. चांगले काम असो की वाईट, कुणाला एखाद्या कामाबद्दल शंका असेल तर त्याने देशातील सर्वात गरीब व्यक्तीला केंद्रस्थानी मानून ते करावे. विशेष धोरण आणि कार्यक्रम त्याच्यावर कसा प्रभाव पाडतोे, हे जाणून घ्यावे, असा महात्मा गांधींचा सल्ला होता.नागरी सेवेतील कर्मचारी निर्णय घेताना तो विधी आणि निषेध या दोन्ही तराजूत तोलत असतात. दुसरे तत्त्वही मी अधोरेखित करू इच्छितो. ते म्हणजे दक्षता. प्रशासक हा शक्ती आणि अधिकाराच्या सर्वोच्च पदावर असतो. त्यांच्याकडे धोरणात्मक कार्यक्रम बदलण्याची आणि योजनांना वास्तवात आणण्याची दुष्कर जबाबदारी असते. लोकसेवक हे कायदा आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण असतात. एखादे धोरण त्याची अंमलबजावणी चांगली होत असेल तर ते तेवढेच चांगले ठरते. प्रकल्प आणि कार्यक्रमांची मंदगती आणि वाईट निष्पत्ती ज्यांना आपण सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करतो त्या सर्वसामान्यांना नुकसान पोहोचविते. उत्पादन खर्च आणि विलंब देशाच्या विकासाचा वेग मंद करतो. लोकसेवकांनी आपले विचार आणि कार्यात तत्पर असायला हवे. काम आणि वास्तव्याच्या वातावरणात बदल करण्यासोबतच प्रत्येक भारतीयाच्या जीवनमानात सुधारणा हे अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी कामकाजाची पद्धत अवलंबायला हवी. विशेषत: ज्यांना पर्यायी सेवा दिली जात नाही अशांसाठी ते आवश्यक ठरते. त्यासाठी नवाचाराची सूत्री अवलंबली जावी. आम्ही काय साध्य केले. काय केले नाही. त्याची प्रामाणिकपणे समीक्षा, चिंतन-मनन केले जावे. तो कामकाजाचा अभिन्न भाग असायला हवा. तिसरे आणि चौथे तत्त्व हे निष्पक्षता आणि सुचारित्र्य हे आहे. सरदार पटेल यांनी निष्पक्षता आणि सुचारित्र्य कायम ठेवण्यावर भर दिला. नागरी सेवेत जोडण्याची, देशात खूप साºया विभाजनांदरम्यान सेतू बनवण्याची क्षमता असते. सुचारित्र्य हे अखेरचे तत्त्व आहे. दु:खी भारत आज प्रामाणिक सेवेचा दावा करू शकत नाही, मात्र मला विश्वास आहे की, मुलकी सेवेतील नवी पिढी कोणत्याही आमिषाला बळी न पडता कोणतेही भय न ठेवता काम करेल. तुम्ही सेवेच्या प्रामाणिक भावनेने काम करीत असाल तर तुम्हाला सर्वश्रेष्ठ बक्षीस मिळेलच. लोकसवेकांनी अहंकार आणि निरंकुशतेपासून बचाव करायला हवा. दु:साध्य आणि डोकेदुखी ठरणाºया मुद्यांनाही शांततेने सोडवायला हवे. सुशासनाची सुरुवात आणि व्यवहार सकारात्मक दृष्टिकोनातून व्हायला हवी. भ्रष्ट यंत्रणा ही मजबूत देशाच्या जीवनशक्तीला संपवून टाकते. नागरी सेवकांकडून केवळ समोर येण्याचीच नव्हे तर समोर दिसण्याचीही आवश्यकता आहे. देशाच्या लोहपुरुषाने पोलादी चौकटीची कल्पना केली आहे. लोकसेवकांनी या चौकटीला आपल्या ऊर्जावान सकारात्मक योगदानातून आणखी चमकदार बनवावे. गेल्या सात दशकांमध्ये अनेक लोकसेवकांनी हे कार्य केलेही आहे.

टॅग्स :Indiaभारत