शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

‘जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९सी मधील बदल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 04:00 IST

सीबीआयसीने १४ नोव्हेंबर २०१९ रोजी नवीन अधिसूचना जारी केली आहे

- उमेश शर्मा, सीएअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सीबीआयसीने १४ नोव्हेंबर २०१९ रोजी नवीन अधिसूचना जारी केली आहे, त्याबद्दल काय?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, सरकारने जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९ सीच्या सरलीकरणाची प्रतीक्षा संपवली आहे. जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९ सी फॉर्म दाखल करण्याची शेवटची २0१७-१८ साठी तारीख ३१ डिसेंबर २०२९ करण्यात आली आहे़अर्जुन : कृष्णा, आर्थिक वर्ष २0१७-१८ आणि २0१८-१९ च्या फॉर्म जीएसटीआर-९ मध्ये बाह्य पुरवठ्याशी संबंधित काय बदल करण्यात आले?कृष्ण : अर्जुना, आर्थिक वर्ष २0१७-१८ आणि २0१८-१९ च्या जीएसटीआर-९ मध्ये असे बदल आहेत :१. करपात्र बाह्य पुरवठा : आता करदात्यांना करपात्र बाह्य पुरवठा नेट आॅफ क्रेडिट नोट आणि डेबिट नोट नोंदविण्याचा पर्याय दिला आहे. करपात्र बाह्य पुरवठा तक्ता ४ बी ते ४ इ मध्ये दुरुस्तीचा अहवाल देता येईल़२. बाह्य पुरवठा ज्यावर देय नाही : आता तक्ता ५ अ आणि ५ एफ मध्ये बाह्य पुरवठा नेट आॅफ डेबिट आणि क्रेडिट नोटद्वारे नोंदविण्याचा पर्याय दिला आहे.३. करदाते तपशील प्रदान करू शकतात़अर्जुन : कृष्णा, आर्थिक वर्ष २0१७-१८ आणि २0१८-१९ च्या फॉर्म जीएसटीआर-९ मध्ये आवक पुरवठ्याशी संबंधित काय बदल करण्यात आले?कृष्ण : अर्जुना, २0१७-१८ आणि २0१८-१९ च्या फॉर्म जीएसटीआर-९ मध्ये आवक पुरवठ्याचे बदल़१. आवक पुरवठा : तक्ता ६ सी आणि ६ डी मधील आयटीसी तक्ता ६ डी मध्ये नोंदविता येईल़२. वस्तूंची आयात : संपूर्ण आयटीसी ‘इनपूट’ पंक्तीत नोंदविण्याचा पर्याय करदात्यांना दिला आहे.३. आयटीसीच्या रिव्हर्सलचे तपशील : ट्रान्स १; हे तक्ता ७ एफ आणि ट्रान्स २; हे तक्ता ७ जीचे रिव्हर्सल नोंदविणे अनिवार्य आहे.४. जीएसटीआर २ ए : आर्थिक वर्ष २0१८-१९ साठी १ नोव्हेंबर २0१९ रोजी तयार केलेला फॉर्म जीएसटीआर २ ए हा स्वयंचलित नोंदणीकृत झाला पाहिजे. आर्थिक वर्ष २0१७-१८ आणि २0१८-१९ मध्ये नोंदणीकृत व्यक्तीकडे जीएसटीआर फॉर्म सी; सीए प्रमाणपत्राशिवायद्ध पीडीएफ स्वरूपात तक्ता ८ ए ते तक्ता ८ डी मध्ये स्वाक्षरी केलेल्या नोंदणीसाठी तपशील अपलोड करू शकतात़५. मागील वर्षाचे व्यवहार त्यानंतरच्या आर्थिक वर्षात नोंदविले गेले : करदात्यांना तक्ता १२ मध्ये मागील वर्षाच्या रिव्हर्सलची माहिती न देण्याचा पर्याय दिला आहे.अर्जुन : कृष्णा, आर्थिक वर्ष २0१७-१८ आणि २0१८-१९ फार्म जीएसटीआर-९सी मध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत?कृष्ण : अर्जुना, २0१७-१८ आणि २0१८-१९ साठीचे जीएसटीआर-९ सी मध्ये झालेले बदल खालीलप्रमाणे :१. करदात्यास तक्ता ५ बी ते तक्ता ५ एनमध्ये कोणताही डेटा न भरण्याचा पर्याय आहे.२. चालू आणि पुढील वर्षात पूर्वीच्या वर्षातील बुक केलेल्या आयटीसीचा दावा केला असेल तर त्याची माहिती करदात्यांना पुरवण्याची गरज नाही.३. करदात्यास आयटीसीचा खर्च तक्ता १४ मध्ये न पुरवण्याचा पर्याय दिला आहे.अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, फॉर्मच्या सरलीकरणामुळे करदात्यांना सुलभता आली आहे. आता करदात्यांनी जीएसटी वार्षिक परतावा व लेखापरीक्षण अहवाल वेळेवर दाखल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेत मुदतवाढ करण्यात आली आहे आणि फॉर्मसुद्धा सोपा करण्यात आला आहे तर करदात्यांनी रिटर्न वेळेवर भरण्याचा प्रयत्न करावा.

टॅग्स :GSTजीएसटी