शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

काळाबरोबर बदलूया !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 09:14 IST

- मिलिंद कुलकर्णीकाळाबरोबर चालल्यास प्रगती होते; स्थितीशील राहिल्यास प्रगती खुंटते असे म्हटले जाते. आदिमानव ते आधुनिक मानव हे त्याचे ठळक उदाहरण आहे. दैनंदिन जीवनात आपण अत्याधुनिक सोयी-सुविधांचा वापर करतो, कारण त्यामुळे वेळ वाचतो, श्रम कमी होतात. कामे गुणवत्तापूर्ण होतात. हा त्याचा फायदा आहे. चुलीवरचा स्वयंपाक ही बाब आता कुतूहलाचा विषय ...

- मिलिंद कुलकर्णीकाळाबरोबर चालल्यास प्रगती होते; स्थितीशील राहिल्यास प्रगती खुंटते असे म्हटले जाते. आदिमानव ते आधुनिक मानव हे त्याचे ठळक उदाहरण आहे. दैनंदिन जीवनात आपण अत्याधुनिक सोयी-सुविधांचा वापर करतो, कारण त्यामुळे वेळ वाचतो, श्रम कमी होतात. कामे गुणवत्तापूर्ण होतात. हा त्याचा फायदा आहे. चुलीवरचा स्वयंपाक ही बाब आता कुतूहलाचा विषय बनली आहे. घरोघरी गॅसच्या चुली आलेल्या आहेत. भौतिक साधनांमध्ये ही प्रगती सहजपणे स्वीकारल्यानंतर परंपरा, संस्कृती यात काळानुसार बदल करण्याची सुरुवात झाली आहे. ही सुरुवात खूप धिम्या गतीने आहे. पण त्याची गती वाढण्याची आवश्यकता आहे.

उदाहरण घ्यायचे झाले तर सध्या सुरु असलेल्या लग्नसराईचे घेता येईल. पूर्वीसारखे ८-१० दिवस चालणारे विवाहसोहळे कधीच कालबाह्य झाले आहेत. दीड दिवसांचे विवाह सोहळे बहुतेक ठिकाणी होतात. आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम, सीमंती कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी लग्न सोहळा होतो. स्वागत समारंभ ऐच्छिक असतो. अर्थात ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे तो होत असतो.

यंदा अधिक मास असल्याने लग्नतिथी साधारण १२ मे नंतर नाही, असे सांगितले जाते. विवाह जुळल्यानंतर महिनाभर थांबण्यापेक्षा या हंगामात लग्न उरकण्याकडे वर-वधु या दोन्ही पक्षांचा कल असतो. मे महिन्यातील उन्हाळी सुट्या हे त्यामागील प्रमुख कारण असते. घरातील पहिले किंवा शेवटचे कार्य असे म्हणत लग्न धुमधडाक्यात करायचे, यावर वर पक्षाकडील मंडळींचे एकमत असते. बोलणी करताना मंगल कार्यालय, घोड्यावरुन मिरवणूक, डीजे अशा अटी मंजूर करुन घेतल्या जातात. मोजकी कार्यालये प्रत्येक शहरांमध्ये असल्याने अवाच्या सवा भाडे आकारले जाते. ज्यांना परवडत नाही, ते दारापुढे मंडप टाकून कार्य उरकतात. ४५ अंश तापमानात दारापुढे मंडप टाकून होणारी लग्ने, मिरवणुकांमध्ये डीजेच्या दणदणाटात थ्रीपीस सूट आणि फेटे बांधलेल्या तरुणाईचे सैराट नृत्य पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो. वयोवृध्द मंडळी, लहान मुले यांची होणारी आबाळ नजरेआड करुन कसे चालेल? व-हाडींसाठी वाहने लागतात, हंगाम म्हटल्यावर त्यांचेही दर दुप्पट होतात. लग्न कार्याशी संबंधित सगळ्याच बाबी महागलेल्या असतात.

हे सगळे टाळता येणार नाही काय? याचा विचार अलिकडे होऊ लागला आहे. नोंदणी विवाहाची संख्या हळूहळू वाढते आहे. लग्नपत्रिका प्रत्यक्ष घरी जाऊन देण्याचे प्रमाण कमी होत असून व्हॉटस् अप, मेलद्वारे निमंत्रणे पोहोचू लागली आहेत. मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत लग्नसोहळा आटोपून सायंकाळी स्वागत समारंभ आयोजित केला जाऊ लागला आहे. श्रीमंतांमध्ये ‘डेस्टीनेशन मॅरेज’ ही संकल्पना रुढ होऊ लागली आहे.

खान्देशात तर हळदीचा कार्यक्रम आणि लग्न दीड दिवसाचे असले तरी काही समाजात लग्नाच्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत मंडप रिकामा झालेला असतो. लग्नघटिकेपूर्वी भोजनावळी सुरु केल्याने अकारण ताटकळणे थांबले आहे. असे स्वागतार्ह बदल अंगिकारले गेले तर आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास कमी होऊ शकेल आणि लग्नसोहळ्याचा आनंद व-हाडींसोबत यजमानांनाही घेता येऊ शकेल.