शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

तीन महिन्यांत दीड कोटी चाचण्यांचे आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 01:33 IST

खरं तर आफ्रिकन देशांमध्ये सध्या अतिशय भयावह अशी स्थिती आहे. तिथे कोरोनाचे रुग्ण अतिशय कमी दिसतात. कारण तिथे अजून हजारो, लाखो लोकांचं टेस्टिंगच झालेलं नाही

आफ्रिकाजगभरात कोरोनाचा फैलाव अत्यंत वेगानं होत असताना आफ्रिकन देशांमध्ये मात्र त्याच्या विस्ताराचा वेग तितकासा अधिक नाही. आफ्रिका खंडात तुलनेनं कोरोनाचे कमी रुग्ण दिसताहेत. काय कारण असावं त्याचं? खरंच कोरोनानं अजून तिथे शिरकाव केलेला नाही? आफ्रिकेतील लोकांची कोरोनाविरुद्धची प्रतिकारशक्ती खरंच इतकी बळकट आहे की, या देशांनी कोरोनाविरुद्धची अतिशय प्रत्ययकारी अशी व्यवस्था उभारली आहे? खरंतर यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे.

खरं तर आफ्रिकन देशांमध्ये सध्या अतिशय भयावह अशी स्थिती आहे. तिथे कोरोनाचे रुग्ण अतिशय कमी दिसतात. कारण तिथे अजून हजारो, लाखो लोकांचं टेस्टिंगच झालेलं नाही. याचं कारण बऱ्याच ठिकाणी ती सुविधाच उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेनंही त्यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं आहे, आफ्रिकन लोकांना लवकरात लवकर साºया सुविधा मिळाल्या नाहीत, तर तिथल्या बळींची संख्या खूप मोठी असेल.जागतिक आरोग्य संघटनेनं त्याचा लेखाजोखाच मांडला आहे. युरोपमध्ये तर सध्या कोरोनानंहाहाकार माजवला आहे. युरोपात सध्या दहा लाख लोकसंख्येसाठी सुमारे चार हजार अतिदक्षता विभागातील बेड्स आहेत. आफ्रिकन देशांमध्ये हेचप्रमाण आहे दहा लाख लोकांसाठी केवळ चारबेड्स! कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जगात सर्वांत कमी सोयी आणि साधनं आफ्रिकेत आहेत. अशावेळी त्यांचं काय होणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे संपूर्णजगानं आफ्रिकेकडे अधिक लक्ष पुरवावं आणि त्यांना तातडीनं मदत पुरवावी, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे.यासंदर्भात आफ्रिकन देशही एकत्र आले असून, येत्या काही दिवसांत दहा लाख कोरोना चाचण्या घेण्यासाठीची सुविधा आम्ही निर्माण करू, असं आफ्रिकन देशांच्या आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी जाहीर केलं आहे. यासंदर्भात घेण्यात आलेल्या आॅनलाईन पत्रकार परिषदेत आफ्रिकन केंद्राचे संचालक जॉन नेकेनसोंग यांनी सांगितलं की, प्रत्यक्षातले कोरोनाचे रुग्ण आणि चाचण्यांची कमतरता यातील दरी भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्यासाठी चाचण्यांची संख्या आम्ही वाढवणार आहोत. येत्या तीन महिन्यांत आफ्रिकेत किमान दीड कोटी कोरोना चाचण्या घेण्याची गरज आहे. तीन महिन्यांत दीड कोटी चाचण्या घेण्याचं अशक्यप्राय आव्हान आफ्रिकन देशांपुढे आहे, पण सध्या मिळेल तिथून आणि मिळेल त्या मार्गानं ही दरी भरी काढण्याचा प्रयत्न ते करताहेत.आफ्रिकन देशांमध्ये रुग्णांची संख्याच वाढत नाही, तर इतरही मोठी आव्हानं त्यांच्यासमोर आहेत. डॉक्टरांची कमतरता आहे. आरोग्य साधनं, कर्मचारी, नर्सेस नाहीत. लोकांमध्ये तेवढी जागरुकता नाही. त्यापेक्षाही मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे भुकेचा. कुठल्याही रोगापेक्षा आधी पोटाचा प्रश्न त्यांना महत्त्वाचा वाटतो. आफ्रिकन देशांमध्ये त्यातल्या त्यात सध्या ‘विकसित’ देश म्हणजे दक्षिण आफ्रिका, पण तेही आतापर्यंत केवळ ऐंशी हजार चाचण्या घेऊ शकले आहेत. आफ्रिकन देशांना लवकरात लवकर वैद्यकीय उपकरणं आणि टेस्टिंग किट्स मिळाले नाहीत, तर तिथे महाभयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते.दहा लाख लोकांमागे केवळ पाच अतिदक्षता विभागातील बेड्स!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या