शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

केंद्र - राज्य संघर्ष?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 01:24 IST

सोमवारी पश्चिम बंगाल विधानसभेनेही तसा प्रस्ताव मंजूर केला.

हल्ली देशात केंद्र सरकार आणि विविध राज्यांमधील सरकारांदरम्यान संघर्षाची स्थिती बघायला मिळत आहे. संसदेने अलीकडेच पारित केलेला नागरिकत्व (सुधारणा) कायदा त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. वस्तुत: नागरिकत्व हा केंद्राच्या सूचीतील विषय आहे. त्याचा अर्थ हा की, नागरिकत्व ही बाब संपूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे आणि राज्यांना त्या संदर्भात कोणतेही अधिकार प्राप्त नाहीत. तरीदेखील विरोधी पक्ष सत्तारूढ असलेल्या राज्यांच्या विधिमंडळांमध्ये, नागरिकत्व (सुधारणा) कायद्याची आमच्या राज्यात अंमलबजावणी करू देणार नाही व तो कायदाच रद्दबातल ठरवावा, अशा आशयाचे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत.

सोमवारी पश्चिम बंगाल विधानसभेनेही तसा प्रस्ताव मंजूर केला. असे करणारे पश्चिम बंगाल हे चवथे राज्य ठरले आहे. आपल्या देशाने संघराज्य व्यवस्थेचा अंगीकार केला आहे. या व्यवस्थेमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी परस्परांशी समन्वय साधत, आपापला कारभार करणे अभिप्रेत असते. काही मुद्द्यांवरून मतभेद निर्माण होणे स्वाभाविकच असते; पण त्यावर चर्चेच्या माध्यमातून, सामोपचाराने तोडगा काढणे आवश्यक असते.

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून मात्र, केंद्र आणि राज्ये एकमेकांविरुद्ध बाह्या सरसावून उभे ठाकत असल्याचे चित्र वारंवार दिसत आहे. त्यातच पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसींसंदर्भात सूत्रांच्या हवाल्याने जे वृत्त बाहेर आले आहे, ते खरे निघाल्यास केंद्र आणि राज्यांमध्ये आणखी एक संघर्षाची ठिणगी पडण्याची दाट शक्यता आहे. एका इंग्रजी दैनिकात उमटलेल्या बातमीनुसार, केंद्रीय करांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातील राज्यांचा वाटा कमी करण्याची शिफारस पंधराव्या वित्त आयोगाने केली आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद २८० नुसार १९५१ मध्ये गठित करण्यात आलेला वित्त आयोग सामाईक महसुलाची केंद्र आणि राज्यांदरम्यानची हिस्सेवाटणी निर्धारित करीत असतो.

चौदाव्या वित्त आयोगाने राज्यांचा वाटा ४२ टक्क्यांवर नेण्याची शिफारस केली होती, जी केंद्र सरकारच्या अजिबात पचनी पडली नव्हती. त्या आधीच्या तेराव्या वित्त आयोगाने राज्यांना ३२ टक्के वाटा देण्याची शिफारस केली होती. चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारसीच्या पार्श्वभूमीवर पंधराव्या वित्त आयोगाकडून राज्यांची अपेक्षा वाढली होती. मात्र, या आयोगाने राज्यांचा वाटा घटविण्याची शिफारस केल्यास राज्ये नाराज होणे निश्चित आहे. चौदाव्या वित्त आयोगाने राज्यांचा वाटा वाढविण्याची शिफारस केल्यानंतर केंद्राने राज्यांचा वाढलेला हिस्सा आडमार्गाने काढून घेण्याची खेळी केली होती. त्यासाठी नीति आयोगाची समिती गठित करून केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यात आला. त्या समितीने अशा योजनांची नव्याने रचना करून, त्यामधील राज्यांचा हिस्सा वाढविण्याची शिफारस केली.

परिणामी, राष्ट्रीय आरोग्य मिशनसारख्या योजनांमध्ये आता राज्यांना २५ टक्क्यांऐवजी ४० टक्के वाटा द्यावा लागतो. देशाचा विकास दर घटत असल्याचा परिणाम केंद्र आणि राज्य सरकारांच्या उत्पन्नावरही झाला आहे. त्याचा थेट परिणाम निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांच्या कामगिरीवर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे राजकीय पक्ष या मुद्द्यांसंदर्भात संवेदनशील असतात. त्यातच वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी लागू झाल्यापासून, राज्यांच्या हातून विक्री करासारखा उत्पन्नाचा हुकमी स्रोत निसटला आहे. आता राज्यांकडे भरीव उत्पन्न देणारा एकही स्रोत शिल्लक नाही. जीएसटीमधील स्वत:च्या हिश्श्यासाठीही राज्यांना केंद्र सरकारच्या तोंडाकडे बघावे लागते.भरीस भर म्हणून जीएसटी कर प्रणाली अंतर्गत महसुलातील तुटीची केंद्राने भरपाई देण्याची तरतूद २०२२-२३ मध्ये संपुष्टात येणार आहे. तोपर्यंत अर्थव्यवस्थेची तब्येत सुधारली नाही आणि जीएसटीमधून होणारे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढले नाही, तर राज्यांची आर्थिक कोंडी होणे निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर पंधराव्या वित्त आयोगाने राज्यांचा हिस्सा घटविण्याची शिफारस खरोखरच केली असल्यास आणि ती प्रत्यक्षात आल्यास, केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांदरम्यान नव्या संघर्षाची ठिणगी पडणे अपरिहार्य आहे. आधीच नागरिकत्व (सुधारणा) कायद्यासारख्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्ये विरोधात उभी ठाकत असताना, त्यांच्यात आणखी एक संघर्ष सुरू होणे, संघराज्यीय व्यवस्थेच्या खचितच हिताचे नाही!

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकEconomyअर्थव्यवस्था