शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

...पण घर सोडणार नाही, असं ते का म्हणताहेत? शहरांची ही मोठी शोकांतिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 11:39 IST

घर सोडून गेल्यावर त्या इमारतीचा पुनर्विकास होईल, याची शाश्वती नाही. नियोजनशून्य पद्धतीने विकसित झालेल्या जिल्ह्यातील शहरांची ही मोठी शोकांतिका आहे.

- संदीप प्रधान (सहयोगी संपादक)मुसळधार पाऊस पडू लागला की, जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांतील अतिधोकादायक, धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होण्याची भीती कुठल्याही संवेदनशील व्यक्तीच्या मनाला कुरतडत राहते. मृत्यू समोर दिसत असतानाही बहुतेकदा लोक आपली राहती घरे सोडत नाहीत. कारण पर्यायी व्यवस्थेची शब्दश: बोंब आहे. घर सोडून गेल्यावर त्या इमारतीचा पुनर्विकास होईल, याची शाश्वती नाही. नियोजनशून्य पद्धतीने विकसित झालेल्या जिल्ह्यातील शहरांची ही मोठी शोकांतिका आहे. विरारमधील इमारत कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. अशाच पद्धतीचे मृत्यू ठाणे, डोंबिवली, मुंब्रा, भिवंडी येथे गेल्या पाच-दहा वर्षांत झाले आहेत. दरवर्षी मे च्या अखेरीस महापालिका अतिधोकादायक, धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. ज्या इमारती कुठल्याही क्षणी पडतील, अशी भीती वाटते तेथील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या जातात. 

रहिवासी घरे रिकामी करत नाहीत, कारण त्यांच्या पर्यायी निवाऱ्याकरिता संक्रमण शिबिरे नाहीत. मुंबईसारख्या शहरात जेथे ही सुविधा आहे तेथेही कोसळलेल्या इमारतींमधील जगल्या वाचलेल्यांच्या दोन-दोन पिढ्यांनी संक्रमण शिबिरातील हालअपेष्टा सहन केल्याची शेकडो उदाहरणे आहेत. त्यामुळे संक्रमण शिबिरे ही थुकपट्टी आहे. आपण घर सोडले म्हणजे कायमचे बेघर झालो ही भावना धोकादायक इमारतीमधील लोकांच्या मनाच्या तळाशी आहे. त्यामुळे भले मरू पण घर सोडणार नाही, असा रहिवाशांचा बाणा असतो. 

अनेक मालमत्तांवरून मालकांत वाद असतात. त्यामुळे इमारतीचा पुनर्विकास करायला विकासक तयार असले तरी ते शक्य होत नाही. काही इमारती अशा बेकायदा बांधलेल्या असतात. तेथे वास्तव्याला असलेल्या रहिवाशांना एक फूट अतिरिक्त जागा देणे शक्य नसते. त्यामुळे विकासकांना त्यामध्ये काडीमात्र रस नसतो. अशा इमारती जीर्ण होतात पण त्यांचा पुनर्विकास अशक्य असल्याने लोक कसेबसे राहतात. 

गॅलरीचा स्लॅब कोसळला, सज्जाचा काही भाग कोसळला, एका मजल्यावरील स्लॅब खालच्या मजल्यावर कोसळला तरीही लोक दिवस काढत असतात. काही इमारतींमध्ये एकुलती एक म्हातारी किंवा वृद्ध पती-पत्नी राहत असतात. त्यांचे कुणीही जवळचे नातलग नसतात. इमारत नव्याने बांधली जाईपर्यंत आपण जिवंत राहू की नाही, याची त्यांना शाश्वती नसल्याने ते हलायला तयार नसतात. समजा नवी इमारत उभी राहिली तर लिफ्टपासून सगळ्या सुविधांमुळे वाढणारा मेंटेनन्स देण्याची त्यांची ऐपत नसते. त्यांचे दोनवेळच्या जेवणाचे वांधे असतात. असे गुंतागुतीचे विषय कोसळणाऱ्या इमारतींच्या बाबतीत असतात. 

जुन्या, धोकादायक इमारतींचा हा प्रश्न सोडविण्याकरिता क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग सरकारने शोधला आहे. मात्र त्याला फारसे यश आल्याचे अजून दिसून आलेले नाही. एका इमारतीचा पुनर्विकास होत असतानाही २० ते ३० कुटुंबांमध्ये तंटेबखेडे होतात. तीन-चार डोकी ही विघ्नसंतोषी असतात. 

क्लस्टरमध्ये आजूबाजूच्या आठ ते दहा इमारतींचा विकास झाला तर एफएसआय वापरून झाल्याने पुनर्विकास रखडलेल्या इमारतींचा विकास होऊ शकतो. वृद्ध आणि गरीब रहिवाशांना छोटी घरे देऊन त्यांचा आर्थिक भार कमी करता येईल. 

काही भागांचा व्यापारी विकास करून रहिवाशांना कॉर्पस फंड दिला तर भविष्यातील मेंटेनन्सचा खर्च कमी होईल. पण त्याकरिता समजूतदारपणा हवा. अनेकदा पुनर्विकास प्रकल्प समजूतदारपणाअभावी कोर्ट कचाट्यात अडकतात आणि ठप्प होतात.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाVirarविरारVasai Virarवसई विरारthaneठाणे