शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

वाळूच्या पट्ट्यात गावगाड्याचे दफन

By admin | Updated: May 26, 2015 23:49 IST

वाळूच्या व्यापाराभोवती समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण फिरते. राजकारणातील ठेकेदार आणि ठेकेदारीतील राजकारण हे समीकरण सरळ आहे.

वाळूच्या व्यापाराभोवती समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण फिरते. राजकारणातील ठेकेदार आणि ठेकेदारीतील राजकारण हे समीकरण सरळ आहे.‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ अशी एक म्हण पूर्वी प्रचलित होती. आता ती बाद ठरली आहे. कारण आता वाळू रगडण्याची गरज नाही. ती वाहून नेता आली किंवा वाळू वाहून नेण्याचा जुगाड जमला, तर तेलाऐवजी पैसा गळतो, नव्हे धबाधबा पडतो. एवढी वाळू महत्त्वाची आहे. पैशाची खाण वाळू ठरली; पण तिच्या बेसुमार उपशाने नद्या कोरड्या पडल्या. जमिनीतील पाण्याची पातळी खालावली. पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होत आहे. याहीपेक्षा मोठे नुकसान समाजाचे होत आहे. वाळूच्या व्यापाराने गावागावात गुंडगिरी वाढली आणि जोडीने व्यसनाधीनता आली. त्यामुळे अनेक गावांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. वाळू उपसण्यास विरोध असणारीही काही गावे आहेत. अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगावचे गावकरी गेल्या वर्षभरापासून याला विरोध करतात आणि पर्यावरणाच्या हानीपेक्षा गावातील बिघडत जाणारा सामाजिक एकोपा हा त्यांच्या काळजीचा विषय आहे. गेल्या वर्षी आणि याही वर्षी ग्रामसभेत वाळू उपशाला विरोध करणारा ठराव मंजूर झाला. गेल्या वर्षी हे गावकरी यासाठी उच्च न्यायालयात गेले होते आणि त्यांना तात्पुरती स्थगिती मिळाली होती; परंतु सरकारचे उत्पन्न आणि वाळूची गरज या मुद्यावर गावकऱ्यांचा आग्रह टिकला नाही आणि येथील वाळूपट्ट्याचा लिलाव झाला. कंत्राटदाराने वाळू उपशासाठी पोकलेन, बोटींचा वापर करताच गावकऱ्यांचा उद्रेक झाला. साष्ट पिंपळगावची कथा ही महाराष्ट्रातील नदीकाठच्या म्हणजे वाळूपट्टा असलेल्या कोणत्याही गावाची आहे. अनेक गावांत कंत्राटदार आणि ग्रामपंचायतीचे साटेलोटे असते. तेथे सारे बिनबोभाट चालते. कारण पैसा फेकून सर्व काही विकत घेता येते. ही ठेकेदारी मुजोरी पावलापावलावर दिसते. यातून येणारा पैसा, त्यासोबत येणारी गुंडगिरी आणि व्यवसनाधीनता हे गावाचे गावपण बरबाद करतात. त्यामुळे वाळूचा प्रश्न हा केवळ पर्यावरणाचा नसून त्यापेक्षा तो सामाजिक प्रश्न म्हणून मोठा आहे.कारण या व्यापारात सर्वच पक्षांचे पुढारी दिसतात. येथे पक्षभेद नाही आणि सत्ताधारी-विरोधक असा भेदही नाही. या ठेकेदारी पंगतीत सगळेच सारखे असतात. समानहित असल्याने पक्षीय मतभेदाचा मुद्दाच उपस्थित होत नाही. सत्ता आणि पैसा एकवटल्यामुळे वाळू ठेकेदारांची दंडेली सर्वत्र दिसते. वाळूचा पैसा राजकारणासाठी आणि राजकारण वाळूचा ठेका घेण्यासाठी असे एक भयावह वर्तुळ तयार झाले. त्याने सामाजिक शांततेला सुरुंग लावला. मराठवाड्यातील गोदाकाठ हा वाळू सम्राटांचे नंदनवन; पण या गोदाकाठावरील गावे तेवढीच पिडलेली. हा व्यवहार किती मोठा याची साधी झलक पाहायची, तर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात ४३ वाळूपट्टे आहेत. त्यापैकी फक्त नऊ पट्ट्यांचा लिलाव झाला. तीन वेळा लिलाव करूनही नऊच पट्टे विकले गेले. साधारण पाच ब्रास वाळूच्या ट्रकची किंमत ३५ हजार रुपये असते आणि एका पट्ट्यातून रोज १०० ट्रक वाळूचा उपसा होतो. आता ही महिनाभराची उलाढाल समान्य माणसांचे डोळे पांढरे करणारी असते. कोट्यवधी रुपयांचा हा धंदा आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या साऱ्या अस्त्रांचा खुलेआम वापर होतो. अधिकाऱ्यांना मारहाण करणे, धमक्या देणे असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. कायदा पुस्तकात दडून बसला असे चित्र वारंवार दिसते. एवढी मोठी उलाढाल असली तरी ज्या गौण खनीज विभागाकडे याचे नियंत्रण आहे त्यांच्याकडे स्वत:ची यंत्रणा नाही. महसूल यंत्रणेकडून त्यांना कामे करून घ्यावी लागतात. तहसीलदार आणि गौण खनीज अधिकारी समकक्ष असल्याने तहसीलदार त्यांचे ऐकत नाही. बेकायदेशीर उपसा रोखण्यासाठी पथक नाही. यंत्रणा ठेकेदारांच्या दावणीला बांधली गेल्याने ठेकेदार ठेके न घेता बेकायदा उपसा करतात. कायदेशीर ठेका असला तरी उपशाचे नियंत्रण नाही असा अंधेर नगरी चौपट राजा कारभार आहे.साष्ट पिंपळगावचे सरपंच अभय शेंद्रे हे रोखण्यासाठी जीवतोड प्रयत्न करीत आहेत. आमचे रस्ते ट्रक वाहतुकीने खराब होतात ही सबब त्यांनी पुढे केली तेव्हा रस्ते दुरुस्त करता येतात असे उत्तर त्यांना देण्यात आले. रस्ते दुरुस्त होतील पण पैशाच्या प्रभावामुळे गावगाडा बिघडत चालला, तो दुरुस्त कसा करणार? असा सवाल ते करतात.- सुधीर महाजन