शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2024: निर्मला सीतारामन कामात आहेत.. तुम्ही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 08:42 IST

Budget 2024: येत्या १ फेब्रुवारीला आपल्या देशाच्या अर्थमंत्री अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

अर्जुन : कृष्णा, येत्या १ फेब्रुवारीला आपल्या देशाच्या अर्थमंत्री अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याबद्दल काही सांगा.कृष्णा : सरळ सोप्या भाषेत अर्थसंकल्प म्हणजे पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजित उत्पन्न व खर्च यांचे बनविलेले पत्रक. त्याच्या आधारेच सरकार आर्थिक निर्णय घेते. सामान्य माणसाने स्वत:चे वैयक्तिक बजेटदेखील बनवले पाहिजे, ज्यामध्ये मासिक अंदाजित उत्पन्नानुसार मासिक खर्चाचे नियोजन करता येईल. वैयक्तिक बजेटचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे. १. कुटुंबातील सर्व खर्चाचे नियोजन : मासिक बजेटद्वारे आपण आपल्या कुटुंबाला लागणारे सर्व खर्च ओळखून त्यांचे योग्य नियोजन करू शकतो. जसे की, मुलांचा शैक्षणिक खर्च, विमा आदी.२. खर्चावर नियंत्रण : दर महिन्याच्या खर्चाचे नियोजन केल्याने अनावश्यक खर्च ओळखून तो पुढील महिन्यात टाळू शकतो आणि खर्चांवर नियंत्रण आणू शकतो.३. आर्थिक शिस्तीची शिकवण : बजेट तयार करून आपण आपल्या मुलांना व इतर कुटुंबांतील सदस्यांना आर्थिक शिस्तीबद्दल शिकवण देऊ शकतो.४. बदलत्या जीवनशैलीशी जुळवून घेणे : बजेट तयार करून आपण बदलत्या जीवनशैलीनुसार आपले जगणे कसे जुळवून घ्यावे, त्यासाठी खर्चाची तजवीज कशी करावी, आपल्या उत्पन्नानुसार जीवनशैलीबद्दलच्या अपेक्षा कशा जुळवून घ्याव्यात, हे ठरवू शकतो. अर्जुन : सामान्य माणसाने कर्जाचे नियोजन कसे आणि का करावे? कृष्णा : सध्या  कर्ज मिळवणे खूप सोपे झाले आहे; परंतु या कर्जाची परतफेड करताना त्याच्या पुढील खर्चांवर काय परिणाम होईल, याचा तो विचार केला जातोच, असे नाही. याकरिता कर्जाचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. परतफेडीची रक्कम ही मासिक उत्पन्नाच्या ३० टक्क्यांपर्यंतच असावी. कर्ज नियोजनाचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे :१. स्वत:वरील आर्थिक ओझे कमी करणे.२. व्याज आणि इतर खर्चांवर योग्य नियंत्रण आणणे.३. भविष्यामध्ये कर्ज घेण्यात अडचण येऊ नये, याकरिता सामान्य आपला क्रेडिट स्कोअर उच्चतम ठेवणे इत्यादि.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन