शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

budget 2021 : धक्के नाहीत, हे अभिनंदनीय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 02:57 IST

budget 2021 : अनपेक्षित असे या अर्थसंकल्पात फारसे काही नाही. पायाभूत सुविधांच्या निर्मितीला वेग देण्याचा सरकारचा इरादा अभिनंदनाला पात्र आहे, हे निश्चित. पायाभूत क्षेत्रातील सर्वच घटकांत सरकारने गुंतवणूक करायचा निर्णय घेतलेला दिसतो आहे.

- किरण मुझुमदार-शाॅ(कार्यकारी अध्यक्ष, बायोकॉन )अनपेक्षित असे या अर्थसंकल्पात फारसे काही नाही. पायाभूत सुविधांच्या निर्मितीला वेग देण्याचा सरकारचा इरादा अभिनंदनाला पात्र आहे, हे निश्चित. पायाभूत क्षेत्रातील सर्वच घटकांत सरकारने गुंतवणूक करायचा निर्णय घेतलेला दिसतो आहे. आरोग्य, बंदरे, महामार्ग, मेट्रो, अक्षय ऊर्जा या सगळ्याच क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मितीला वेग येईल, अशी चिन्हे दिसतात. अर्थात, ज्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे सरकारने जाहीर केले, त्या योजनांसाठी पैसा कसा-किती उपलब्ध होतो, या योजनांची  कशाप्रकारे अंमलबजावणी होते, त्या अंमलबजावणीचा वेग काय असेल यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील. कोरोनाकाळात गेलेले अनेक रोजगार या गुंतवणूकीतून पुन्हा निर्माण होतील.दुसरा मुद्दा आहे तो संशोधन आणि नवनिर्मिती अर्थात रिसर्च आणि इनोव्हेशन संदर्भात सरकारने घेतलेला निर्णय. दहा वर्षांच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील संशोधनासाठी सरकार ५०,००० कोटी रुपये उपलब्ध करून देणार याचा मोठा आनंद आहे. अर्थात माझी अपेक्षा होती की शासनाने सार्वजनिक क्षेत्राप्रमाणेच खासगी क्षेत्रालाही संशोधनासाठी ‘इन्सेंटिव्ह’ द्यावेत. तसे झाले असते तर मला अधिक आवडले असते, मात्र सरकार खासगी क्षेत्रापेक्षा सार्वजनिक क्षेत्रात अधिक पैसा गुंतवून सार्वजनिक क्षेत्रातील संशोधनाला बळ देण्याचा प्रयत्न करते आहे. एक ‘पब्लिक इकोसिस्टिम’ त्यातून तयार करायचा प्रयत्न दिसतो आहे. पायाभूत सुविधा, संशोधन, शिक्षण या क्षेत्रातली गुंतवणूकही त्या दिशेने तयार करण्यात येणाऱ्या संधींसाठीच अधिक उपयुक्त ठरावी, असे प्रयत्न दिसतात. बँकिंग आणि विमा क्षेत्रात येणाऱ्या विदेशी गुंतवणुकीचा अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होईल. निर्गुंतवणूक प्रक्रियाही सरकारने सुरू केलेली दिसते. मात्र या अर्थसंकल्पात तरी सरकारचा खरा भर सार्वजनिक क्षेत्राचे हात बळकट करणे, त्या क्षेत्रांना अधिक संधी-निधी उपलब्ध करून देणे यावरच दिसतो आहे. खासगी क्षेत्रालाही त्यांनी तसे पाठबळ दिले असते तर ते जास्त पूरक ठरले असते, मात्र तसा विचार न करता सरकारने यावेळी तरी आपली सारी मदार सार्वजनिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांवरच ठेवलेली दिसते. खासगीकरणाला या सरकारचा विरोध नसला, तरी खासगी उद्योग क्षेत्राने सरकारकडे डोळे लावून बसू नये, या क्षेत्राने स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे एकूण धोरण दिसते. वरकरणी या अर्थसंकल्पात फार काही ‘धक्के’ नाहीत याचाही आनंदच आहे. अनेकांना वाटत होते की, कोविड काळातून सावरताना श्रीमंतांपासून सामान्यांपर्यंत प्रत्येकासाठी करभार वाढेल, मात्र तसे  काही घडले नाही या साऱ्याच्या पल्याड एक महत्त्वाची गोष्ट आहे- देशाच्या आर्थिक धोरणात आवश्यक असलेले सातत्य. ते सातत्य या अर्थसंकल्पाने राखले ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. 

टॅग्स :budget 2021बजेट 2021