शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

budget 2021 : शैक्षणिक ‘वातावरण’ बदलण्याला मोठे पाठबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 02:36 IST

budget 2021: देशाच्या विकासाच्या दृष्टीने शिक्षण आणि आरोग्य ही दोन अतिशय महत्त्वाची क्षेत्रे आहेत. या वर्षाच्या अर्थसंकल्पात या दोन्ही क्षेत्रांसाठी चांगली तरतूद करण्यात आली, याचा आनंद व्यक्त केला पाहिजे.

- डॉ. विद्या येरवडेकर(प्रधान संचालिका, सिंबायोसिस)देशाच्या विकासाच्या दृष्टीने शिक्षण आणि आरोग्य ही दोन अतिशय महत्त्वाची क्षेत्रे आहेत. या वर्षाच्या अर्थसंकल्पात या दोन्ही क्षेत्रांसाठी चांगली तरतूद करण्यात आली, याचा आनंद व्यक्त केला पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून या वर्षीचा अर्थसंकल्प ऐतिहासिक होता. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन याबाबत खूप काही बोलतील असे वाटत होते. परंतु तसे काही  झाले नाही. त्याबाबतीतल्या अपेक्षा अर्थमंत्र्यानी फोल ठरवल्या. आपल्या शैक्षणिक क्षेत्रात संशोधनाला पुरेसा वाव नाही, त्यासाठी पुरेशी साधने नाहीत आणि त्यामुळे संशोधक वृत्तीही विकसित होता नाही, हा नन्नाचा पाढा बदलायची एक चांगली सुरुवात यावर्षीच्या अर्थसंकल्पाने केलेली आहे, त्याचा उल्लेख मला महत्त्वाचा वाटतो.  नॅशनल रिसर्च फाउण्डेशनसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी  केलेली ५० कोटी रुपयांची तरतूद महत्त्वाची आहे. आपल्या देशात संशोधन फारसे होत नव्हते. निधी नसल्यामुळे संशोधन होत नव्हते. परंतु, यंदा त्यासाठी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे देशात ‘रिसर्च कल्चर’ तयार होईल आणि संशोधनाला चालना मिळेल. तसेच भारतातील विद्यापीठे जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत मागे आहेत. मात्र, आता  संशोधनाचा दर्जा सुधारल्यास देशातील विद्यापीठे जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत पहिल्या २०० ते ५०० पर्यंत येण्यास या बदलत्या वातावरणाची मदतच होईल.  कौशल्य विकासाकडे केंद्राने लक्ष केंद्रित केले असून, नॅशनल अ‍ॅप्रेंटिसशिप प्रोग्रॅमसाठी सुमारे तीन हजार कोटींची केलेली तरतूद स्वागतार्ह आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. मागील वर्षी या प्रोग्रॅमची घोषणा करण्यात आली होती. परंतु, कोरोनामुळे त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्याचप्रमाणे कौशल्य अभ्यासक्रमासह इतर अभ्यासक्रमांशी निगडित जपान व यूएई बरोबर शैक्षणिक करार केल्याचा मोठा फायदा शिक्षण क्षेत्राला होणार आहे. तसेच अधिक शैक्षणिक संस्था असणाऱ्या हैदराबादसह देशातील नऊ शहरांसाठी विशेष योजनेचा उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. त्यात निश्चितच पुणे शहराचा समावेश होईल, असे वाटते. यावर्षीच्या अर्थसंकल्पात शालेय शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले आहे. आदिवासी व डोंगरी भागांमध्ये शाळांची संख्या वाढण्यात येणार आहे. दुर्गम भागात शाळांची संख्या वाढिवल्याने त्या भागातील शिक्षणाला चालना मिळू शकेल. देशाच्या सर्व भागात शिक्षण पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्या परिसर भाषेतून त्यांना शिक्षण मिळणे आवश्यक आहे.लेह लडाखसारख्या ठिकाणी केंद्रीय विद्यापीठ केली जाणार आहेत.  शासकीय व खासगी शाळांचे सक्षमीकरण, आदिवासी व अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भरीव तरतूद, प्राध्यान्य हीदेखील या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.

टॅग्स :budget 2021बजेट 2021