शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

budget 2021 : परवडणाऱ्या घरांबाबत दिलासा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 02:44 IST

budget 2021: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाने परवडणाऱ्या घरांना दिलासा दिला आहे. परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विकासकांसाठी केंद्राचा अर्थसंकल्प उत्तम आहे.

- निरंजन हिरानंदानी(राष्ट्रीय अध्यक्ष,  नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल(नरेडको))केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाने परवडणाऱ्या घरांना दिलासा दिला आहे. परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विकासकांसाठी केंद्राचा अर्थसंकल्प उत्तम आहे. मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पाला १० पैकी ७ गुण दिले पाहिजेत. कारण या अर्थसंकल्पात पायाभूत सेवा सुविधा, परवडणारी घरे, बँक,  आरोग्य, शिक्षण या क्षेत्रासाठी पुरेशी तरतूद केली आहे. या क्षेत्रावर खर्च केला जात असल्याने आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी येईल.  आर्थिक विकास दर जोवर ७ टक्के किंवा त्या आसपास जात नाही तोवर समस्या कमी होणार नाहीत. त्यामुळे कोरोनाकाळात आज सादर झालेला अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला चालना देईल, अशी आशा आहे.परवडणाऱ्या घरांबाबत जो करांचा विषय आहे तो सलग ठेवला आहे. व्याजाबाबतचा स्तरदेखील दोन लाखापासून साडेतीन लाखापर्यंत ठेवला आहे. जीएसटी एक टक्का ठेवला आहे. सर्वसाधारण घरांसाठी तो पाच टक्का आहे. परवडणाऱ्या घरांसाठी जीएसटी कमी म्हणजे पीएमवाय योजनेसाठी एक टक्का आहे. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने पीएमवाय योजनेसाठीची स्टॅम्प ड्यूटी एक हजार केली आहे. या अर्थसंकल्पाने गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन दिले आहे. पायाभूत सेवा सुविधांवर लक्ष केंद्रित करत परवडणाऱ्या घरांवर जोर दिला आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे गृहनिर्माण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात याचा स्वतंत्रपणे विचार केला गेला नसला, तरी महाराष्ट्र सरकारने सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंतच्या स्टॅम्प ड्यूटीबाबत ३ टक्क्यांचा दिलासा दिला आहे. सुरुवातीला ५ टक्के असणारी स्टॅम्प ड्यूटी आता २ टक्के करण्यात आली. याचा अनेकांना फायदा झाला आहे. या काळात लोकांनी घरे घेतली आहेत. या तीन महिन्यांत सरासरीच्या तुलनेत ६० टक्के अधिक गृहखरेदी झाली आहे. स्टॅम्प ड्यूटी कमी झाल्याने ही उलाढाल शक्य झाली.गृहनिर्माण क्षेत्रातील कच्चा मालाच्या किमतींबाबत काही दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, ती मात्र पूर्ण झालेली नाही. पण आता मोठ्या प्रमाणावर कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे  स्टील आणि सिमेंटची मागणी वाढेल. मागणीनुसार उत्पादन वाढले की पुढील दोन ते तीन महिन्यांत किमती निश्चितच खाली येतील. जे विकासक परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्यासाठी हा अर्थसंकल्प उत्तम आहे. त्यांना दिलासा आहे. उर्वरित विकासकांसाठी मात्र अर्थसंकल्पात फार काही नाही. दरम्यान, मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई या चार महानगरामधील मध्यमवर्गीय माणसाला मात्र परवडणारे घर मिळणे मुश्कील आहे, कारण जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. दिवसेंदिवस ते वाढतच जात आहेत. त्यामुळे स्वत:चे घर घेण्याचे लोकांचे स्वप्न स्वप्नच राहात आहे.  प्रत्येकाला स्वत:चे घर मिळायला हवे, यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. घरांच्या किमती खूप वाढल्या आहेत. केंद्राने जी ४५ लाखांची मर्यादा ठेवली आहे ती ७५ लाख असणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे मध्यमवर्गीय माणसाला या शहरांत घर घेता येईल.

टॅग्स :budget 2021बजेट 2021Homeघर