शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

प्रगतीसाठी अर्थतंत्र क्षेत्रात ब्रिटन भारताचा सहकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 5:08 AM

‘स्क्वेअर माईल’ स्थित लंडन शहराचा ६९१वा लॉर्ड मेयर या नात्याने, मी ब्रिटनच्या आर्थिक क्षेत्राच्या, देशातील महत्त्वाच्या प्रतिनिधींपैकी एक आहे

जगातील अग्रगण्य आणि व्यवसाय सेवांची कर्मभूमी असणाऱ्या ब्रिटनमधील ऐतिहासिक ‘स्क्वेअर माईल’ स्थित लंडन शहराचा ६९१वा लॉर्ड मेयर या नात्याने, मी ब्रिटनच्या आर्थिक क्षेत्राच्या, देशातील महत्त्वाच्या प्रतिनिधींपैकी एक आहे. मला भारताबद्दलही थोडे-बहुत ज्ञान आह़े़ कारण गेल्या दोन दशकांत दरवर्षी कमीतकमी एकदा तरी मी भारतास भेट दिली आहे! सध्याही मी मुंबई दौºयावर आहे.या आठवड्यात, फिनटेक(अर्थतंत्र) क्षेत्रात आणखी नावीन्यपूर्ण सहकार्यास उत्तेजन देण्यासाठी येणाºया ब्रिटनच्या प्रतिनिधी मंडळाचा प्रमुख या नात्याने मला या सुंदर देशात परत येण्यास आनंद होत आहे. फिनटेक हे एक प्रचंड क्षमता असणारे क्षेत्र आहे आणि ते आपल्या दोन्ही देशांनाही फायदेशीर ठरत आहे. मी प्रतिनिधित्व करत असलेल्या सिटी आॅफ लंडन कॉर्पोरेशन (लंडन शहर महापालिका) भारताशी दीर्घकालापासून सहभागी आहे. १२ वर्षांहून अधिक काळापासून मुंबईत आमचे प्रतिनिधी कार्यालय कार्यरत आहे. भारताशी स्नेहसंबंध जुळवण्यावर आमचा दृढ विश्वास आहे.भारत जगातील सर्वात आकर्षक आणि सर्वात अधिक वेगाने भरभराट होत असणारी अर्थव्यवस्था आहे़ ब्रिटन हे जगातील अग्रगण्य आर्थिक केंद्र आहे. ते अधिक मजबूत करण्यासाठी भारतातील सर्वाधिक लोकसंख्या आणि अत्यंत व्यस्त महानगरे, अग्रगण्य संस्था, बँका आणि नियामक अधिकार यंत्रणांच्या प्रमुख कार्यालयांना मी भेट देणार आहे़ यासाठी कधीही न झोपणाºया, मुंबई महानगराच्या भेटीने सुरुवात केली आहे. आपल्याकडे बरेच काही बोलण्यासारखे आहे, ज्यात आर्थिक सेवा क्षेत्रात ब्रिटन - भारत सहयोगास आणखी पुढे नेण्यासाठी, जिथे आपले दोन्ही देश एकमेकांस बरेच काही देऊ शकतात, अशा विशेषत: फिनटेकसारख्या नावीन्यपूर्ण क्षेत्रात अनेक संधी समाविष्ट आहेत आणि आम्ही त्यावर काम करणार आहोत.

भारतात वेगाने विकसित होत असणारे फिनटेक क्षेत्र दरसाल २0 टक्क्यांहून अधिक वेगाने वाढत आहे. खरे तर तुम्ही अंदाजे २0 हजारांहून अधिक स्टार्ट अपचे यजमानत्व स्वीकारले आहे, ज्यातील अंदाजे तीन हजार तर फिनटेक क्षेत्रातील आहेत; २0 दशलक्षांहून अधिक ग्राहक असणाºया पेटीएमसारख्या कंपन्या, विमा संकलक पॉलिसी बझार आणि चॅलेंजर बँक, ब्रिटनमध्ये लवकरच पदार्पण करतील. या शिवाय फिनटेकचा अंगीकार करण्यात भारत जगाचे नेतृत्व करत आहे. या संदर्भात आर्थिक समावेशास उत्तेजन देण्यासाठी एक डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न केल्याबद्दल येथील सरकारचे आभार मानावे लागतील. प्रचंड यशस्वी अशा ब्रिटन मॉडेलच्या धर्तीवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने रेग्युलेटरी सँडबॉक्स फ्रेमवर्क नुकतेच सादर केल्याने नियामकांनीही भक्कम पाठिंबा दिला आहे.हे क्षेत्र संशोधन, एकाग्रता आणि आर्थिक समावेशाच्या संधी यांचे संमिश्रण आहे. नियमन आणि ज्ञान ही आव्हाने नक्कीच आहेत़, परंतु ज्ञानदान सहकारी या नात्याने ब्रिटनने आपली भूमिका सिद्ध करायची आहे. आपण जगाच्या फिनटेक क्षेत्राचे माहेर आहोत, ज्याचे मूल्य आमच्या अर्थव्यवस्थेसाठी सात अब्ज पौंड आहे, हे तर अगदी खरे. आजमितीस या क्षेत्राने देशभरात ७५ हजारांहून अधिक लोकांना नोकरी दिली आहे. हे क्षेत्र सर्वाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करते व २0३0 सालापर्यंत नोकरीच्या संधी एक लाखाचा आकडा पार करेल, अशी अपेक्षा आहे.
ब्रिटिश नागरिकांसाठी स्टार्ट अप आणि चॅलेंजर बँका या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत आणि अनेक जण नवनवे आर्थिक प्रस्ताव स्वीकारण्यासाठी संशोधन करण्यात निष्णात झाले आहेत, परंतु फिनटेकमधील आमची मजबूत स्थिती ही आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळेच आहे, ही अनेकांसाठी आश्चर्याची बाब असेल. ब्रिटनमधील ४0 टक्क्यांहून अधिक स्टार्ट अप बाहेरील देशात कार्यरत आहेत. मी प्रतिनिधित्व करीत असलेली सिटी आॅफ लंडन कॉर्पोरेशनसारख्या संस्था हे याचे कारण आहे. जगभरातील शहरांची वैश्विक नावीन्यपूर्ण पर्यावरण प्रणाली विकसित करण्यासाठी त्यांच्या वैश्विक संबंधांचा उपयोग करून आणि त्याबरोबरच सहजतने उपलब्ध गुंतवणूक भांडवलाचा वापर करून त्यास सक्रियपणे उत्तेजन देण्यासाठी या संस्थांनी कठोर मेहनत घेतली आहे.माझ्या भेटीत मी शहरातील भारतीय उद्योजकांना उत्तरे शोधण्यासाठी मदत करणार आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि ज्ञानातील उणिवा दूर करण्यासाठी ब्रिटनच्या फिनटेकच्या नैपुण्याची मदत देऊ करीत आहे. त्यासाठी मी ब्रिटनमधील अत्युत्तम फिनटेक संस्थाच्या प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ सोबत आणले आहे.ब्रेक्सिटबद्दलच्या बातम्या ब्रिटनमधील जवळजवळ सर्वच वृत्तपत्रात गाजत असतील, परंतु मी इथे भारतात, राजकारणापेक्षा व्यवसायाबद्दल अधिक बोलत आहे. सध्या तर हाच विषय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण ३१ आॅक्टोबरनंतर काहीही होवो, आपल्या दोन देशांतील नातेसंबंध अत्यंत महत्त्वाचे राहतील आणि आपण त्यांच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही.