शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

‘बॉईज लॉकर रूम’; आभासी जग आणि बालमनाची अधोगती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 06:17 IST

गेल्या जवळपास दोन-तीन महिन्यांपासून हे घडत होते. त्यात सहभागी मुलीने या ग्रुपचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आणि पोलिसांसकट तो बघणारे सर्वच हादरले.

- सविता देव हरकरे (उप वृत्तसंपादक, लोकमत, नागपूर)दिल्लीच्या नामांकित शाळांमधील काही मुलांनी इन्स्टाग्रामवर ‘बॉईज लॉकर रूम’ नावाचा ग्रुप बनविला. कोवळ्या वयातील ही मुले ग्रुपवर अश्लील चॅटिंग करू लागली. आपल्या वर्गमैत्रिणींबद्दल अश्लील चर्चा, त्यांच्यासोबत सामूहिक बलात्काराची योजना आखणे, त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे शेअर करणे, असले अत्यंत घाणेरडे प्रकार या ग्रुपवर घडू लागले. विशेष म्हणजे यात सहभागी मुले अल्पवयीन. भल्याबुऱ्याची समज नसलेली.गेल्या जवळपास दोन-तीन महिन्यांपासून हे घडत होते. त्यात सहभागी मुलीने या ग्रुपचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आणि पोलिसांसकट तो बघणारे सर्वच हादरले. महिला आयोग सक्रिय झाला. पोलिसांनी इन्स्टाग्रामला नोटीस बजावली. या ग्रुपच्या अ‍ॅडमिनसह आणखी एका मुलाला अटक केली. त्यात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. या ग्रुपवर ही मुलगी फेक अकाऊंट तयार करून मुलांसोबत चॅटिंग करीत होती. इंटरनेट व सोशल मीडियाच्या आभासी विश्वालाच वास्तव मानणाºया अशा मुलांची संख्या झपाट्याने वाढत असून, कोरोनाच्या महामारीपेक्षाही हा आजार भीषण रूप धारण करीत आहे यात तीळमात्र शंका नाही. दुर्दैवाने या रोगाच्या संक्रमणाकडे समाज, पालक, शाळा व संबंधित सर्वांचेच फारसे लक्ष नाही. भविष्यात याचे किती गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागतील याची जाणीव अजूनही आपल्याला झालेली नाही.तीन वर्षांपूर्वी गुरूग्राममधील एका शाळेत सात वर्षांच्या विद्यार्थ्याची गळा कापून निर्घृण हत्या झाली होती हे स्मरणात असेलच. या चिमुकल्याची हत्या करणारा त्याच्याच शाळेतील १६ वर्षांचा अकरावीत शिकणारा विद्यार्थी होता. परीक्षा आणि पालक-शिक्षक बैठक पुढे ढकलण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केले असले, तरी त्याला पॉर्न साईट्स बघण्याचे वेड होते, हेही नंतर उघडकीस आले. मुलांमध्ये पसरत चाललेल्या या महामारीचे समाजमन हादरवून टाकणारे रूप तीन-चार वर्षांपूर्वी नागपुरात समोर आले होते. अवघ्या १३ वर्षांच्या दोन मुलांनी त्यांच्या शेजारी राहणाºया दोन बालिकांवर अत्याचार केला होता. ही मुले शाळेच्या परिसरात आपल्या मित्रांसोबत मोबाईलवर पॉर्न साईट्स बघायची. सगळेच अविश्वसनीय, धक्कादायक पण सत्य. कोरोनावर आज ना उद्या लस निघेल, औषध येईल; पण देशाच्या अल्पवयीन पिढीत फोफावत चाललेल्या या महामारीचे काय? त्यावर उपाय कोण शोधणार? आजमितीस देशात १५ वर्षे वयोगटातील जवळपास ७० टक्के मुले पॉर्न अ‍ॅडिक्शनची शिकार आहेत. सध्या मुलांना डेटिंग साईट्स आाणि सोशल मीडियाच्या इतर अ‍ॅप्स्चे प्रचंड वेड आहे. या साईट्सचा वापर करून नको त्या अवस्थेतील छायाचित्रांची देवाण-घेवाण होते. न्यूड सेल्फीजसह अशी अनेक विकृत छायाचित्रे, व्हिडिओ मित्रमैत्रिणींना पाठविली जातात.‘तुझे माझे सिक्रेट’ या नावावर टाकलेल्या या छायाचित्रांचा किती मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जाऊ शकतो याची कल्पनाही बºयाचदा या मुलांना नसते. या डेटिंग साईट्स व मॅसेंजर अ‍ॅपमधून ही छायाचित्रे नकळत उचलली जातात. कुतूहल, उत्तेजना आणि आनंदाच्या मागे धावणाºया या मुला-मुलींना सायबर साक्षरता नसते. त्यामुळे या धोक्याबद्दल ते पूर्णत: अनभिज्ञ असतात आणि यात कळत नकळत गुंतलेल्या मुलांची आयुष्ये उद्ध्वस्त होण्याची भीती असते. कारण हे मायाजाल त्यांना केवळ आपले गुलामच बनवत नाही, तर त्यांच्यात व्यसनाधीनता, खोटे बोलणे, चोरी करणे, हिंसकता, लहान वयात लैंगिकतेचे आकर्षण असे वर्तनातील धोकादायक बदलही घडविते. अलीकडच्या काही वर्षांत अल्पवयीनांकडून होणाºया बलात्काराचे प्रमाण का वाढते आहे, हे समजून घ्यायला हवे. वाढत्या बालगुन्हेगारीमागील हे एक मोठे कारण आहे.इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जग फारच लहान झाले आहे. घरात बसल्या-बसल्या आपण साºया दुनियेची सैर करू शकतो. माहितीच्या विस्फोटाने प्रत्येकाच्या आयुष्यात क्रांती घडवून आणलीय. परंतु, या क्रांतीची एक काळी बाजूही आहे, जी अल्पवयीन मुलांना अधिक आकर्षित करीत असते. त्यांना आभासी विश्वात नेत असते. आपल्या मुलांना या आभासी जगाचा बळी पडण्यापासून रोखण्याकरिता पालकांनी सतर्क असणे गरजेचे झाले आहे. मुळात त्यांची जबाबदारी वाढली आहे. मुलांचे मित्र, त्यांचे मोबाईल तपासणे, सोशल मीडियावर ते कोणत्या ग्रुपमध्ये आहेत ही सगळी माहिती पालकांना ठेवावी लागणार आहे. मुलांच्या मोबाईलमधील इंटरनेट डाटा, त्याचा वापर कसा आणि किती होतो यावर लक्ष द्यावे लागणार आहे. सर्वांत महत्त्वाचा आहे तो मुलांसोबत मोकळा संवाद. त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवून त्यांना या आभासी जगाची जाणीव कशी करून देता येईल हे बघितले पाहिजे आणि यासाठी आवश्यक आहे जागरूकता.

टॅग्स :Instagramइन्स्टाग्राम