शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

स्पर्धेतील घोडे नको, माणूस बना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 05:30 IST

राज्यभरातील अनेक बुवा-बाबांचा पर्दाफाश करणारे आणि अंधश्रद्धेचे उच्चाटन करण्यासाठी गेली अनेक वर्षे विवेकवादी विचारांनी लढणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, श्याम मानव विविध पातळ्यांवर गेली अनेक वर्षे कार्य करीत आहेत.

राज्यभरातील अनेक बुवा-बाबांचा पर्दाफाश करणारे आणि अंधश्रद्धेचे उच्चाटन करण्यासाठी गेली अनेक वर्षे विवेकवादी विचारांनी लढणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, श्याम मानव विविध पातळ्यांवर गेली अनेक वर्षे कार्य करीत आहेत. अंधश्रद्धेप्रमाणेच त्यांनी राबविलेल्या विविध विषयांवरील कार्यशाळांचाही आवाका मोठा आहे. या कार्यशाळांच्या माध्यमातूनच समाजात नवी पिढी उत्तम माणूस घडेल, हा विश्वास बाळगणारे श्याम मानव हे सध्या द्विधा मन:स्थितीत असणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगतात की, करिअरच्या स्पर्धेत या पिढीला घोडे बनवू नका, तर माणूस घडविण्याचा प्रयत्न करा. केवळ श्रद्धा, अंधश्रद्धेच्या आहारी न जाता, स्वत:मधील क्षमता ओळखा, कल ओळखा तिथेच करिअर घडवा. सध्याच्या स्पर्धेच्या गतिमान जीवनशैलीत उत्तम माणूस घडविण्याविषयी ‘लोेकमत’च्या प्रतिनिधी स्नेहा मोरे यांनीश्याम मानव यांच्याशी साधलेला हा संवाद.करिअरविषयीच्या निर्णयाविषयी विद्यार्थी-पालकांना कसे मार्गदर्शन कराल?करिअरची निवड नेहमी बरोबरच असेल असे नाही. कदाचित, पहिल्या शिडीवरून खाली उतरून दुसºया शिडीवरून पुन्हा वर चढावे लागेल, पण त्याला काही हरकत नाही. तसे केल्याने काही बिघडत नाही. पालकांना आत्ताच्या जगातील स्पर्धा भेडसावत असते, पण स्पर्धा असली, तरी निरनिराळ्या संधीसुद्धा वाढत आहेत. प्रत्येक मुलाला चाखता येतील, इतकी फळे उपलब्ध आहेत. मुलांची इच्छा, त्यांची स्वप्नं आणि त्यांचा कल या तिन्ही गोष्टी करिअर निवडताना एकत्र येतात. सध्याचे जग करिअर खुलविणारे आहे. आवड आणि क्षमता एकत्र येईल, तेव्हा त्यातून उत्तम करिअर घडवू शकतो. मात्र, करिअर निवडताना केवळ स्पर्धेतील घोडे बनविण्यापेक्षा उत्तम माणूस घडविण्यावरही तितकाच भर दिला, तर हे संपूर्ण आयुष्यभर उपयुक्त ठरते. त्यामुळे केवळ पैशाच्या मागे धावणारा घोडा यापेक्षा उत्तम माणूस होणे हे समाजाच्या विकासाकरिता अतिशय महत्त्वाचे आहे.व्यक्तिमत्त्व विकास कसा करावा?आमच्या काळात व्यक्तिमत्त्व विकास हा विचार नव्हता, पर्सनॅलिटी असते आणि ती डेव्हलप करायची, असे काहीच त्या काळी नव्हते. मात्र, आता ती काळाची गरज आहे. वयाच्या पाच वर्षांपर्यंत होणारे संस्कार हे संगत, मोठ्यांचे अनुकरण यातून होत असतात. त्यानंतरच्या टप्प्यात येणारे अनुभव आणि भावनिकदृष्ट्या होणारे विचार अजाणतेपणी आपल्याला घडवित असतात. मात्र, कुठेतरी असे वाचनात आलेली की, ज्या गोष्टीची भीती वाटते, ती गोष्ट मुद्दाम करायला हवी. त्यामुळेच त्या भीतीवर मात करता येते. हेच मी आयुष्यभर करत आलो. त्यामुळे चांगले वाईट, गोड-कटू अशा सगळ्या अनुभवांनी वेळोवेळी समृद्ध झालो.संमोहन शास्त्राविषयी थोडक्यात सांगा.संमोहनशास्त्राला मानसशास्त्राचा शास्त्रशुद्ध पाया आहे. कोणत्याही संमोहनकाराकडे कोणत्याही प्रकारची अलौकिक किंवा दिव्यशक्ती नसते. मात्र, कठीण परिश्रम व प्रदीर्घ साधना करावी लागते. त्यामुळे हे शास्त्र कोणीही सहज शिकू शकत नाही. योग्य व्यक्ती गुरूच्या मार्गदर्शनाखाली काही काळ साधना शिकू शकते. मात्र, या शास्त्राने सर्वसामान्यांना अशक्य वाटणाºया गोष्टी घडविता येतात, हे वर्णन चुकीचे आहे. संमोहनातही व्यक्ती आपल्या नैतिक मूल्यांची मर्यादा ओलांडत नाही. शिवाय, स्वत:च्या जिवाचा धोका पत्करत नाही. संमोहित होण्यासाठी मनाची एकाग्रता व संमोहित होण्याची इच्छा या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. नकारात्मक विचारसरणीच्या संमोहनाची गरज वाटणाºया व्यक्तींवर अतिशय अल्पकाळात संमोहनाचा प्रभावी परिणाम साधता येतो. स्व-संमोहनाच्या माध्यमातून दु:खाने विव्हळणार नाही आणि आनंदाने हुरळून जाणार नाही, इतकी स्थिती गाठता येते.आत्मविकासासाठी स्वसंमोहन कसे उपयुक्त आहे?संमोहन म्हणजे सकारात्मक मनोवृत्ती होय. या मनोवृत्तीतून येणाºया यश-अपयशातून माणूस शिकत असतो. आपल्या अंतर्मनाशी थेट संपर्क साधण्याचे हे अत्यंत प्रभावी शास्त्र आहे. आत्मविकासाचा हा पाया आहे. आपल्या जीवनातील अडी-अडचणी आणि मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी या शास्त्राचा वापर करण्यात येतो. स्वसंमोहनाने आपल्यातील सुप्तगुणांना अधिकाधिक विकसित करता येतो. या प्रयोगात शरीरातील सर्व ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, इतर सर्व संस्था ऐच्छिक, अनैच्छिक क्रि या, तसेच प्रतिक्षिप्त क्रि यांना नियंत्रित करता येते. बाह्यमनाचे सर्व व्यवहार बंद करून, तसेच अंतर्मनाला योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करण्याच्या प्रक्रि येला स्वसंमोहन म्हणतात. या विषयाच्या अभ्यासाने कमकुवत मनाच्या व्यक्ती धैर्यवान बनू शकतात. आपण स्वत: संमोहनात जाऊन स्वत:ला वारंवार सूचना देतो. त्या आपल्या मेंदूत ठसतात. त्यानुसार, आपली नवी सवय निर्माण होऊ शकते. आपला स्वभाव बदलू शकतो. आपली वर्तणूक बदलते.निमॉनिक तंत्र म्हणजे काय?या तंत्राच्या माध्यमातून आपण सर्व अचूकतेच्या जवळ जातो. मात्र या तंत्रांचे धडे केवळ कार्यशाळांद्वारे देण्यात येतात. या माध्यमातून मौखिक, दृश्य संकेतांद्वारा पूर्वीचे ज्ञान आणि नवीन संकल्पना यांच्यातील समतोल राखून स्मरणशक्ती अधिक वाढविता येते आणि अचूकता टिकविता येते. हे औपचारिकरीत्या शिकविले जाऊ शकते. त्यानंतर, प्रत्येक विद्यार्थी आपली स्मरणशक्ती वाढवू शकतो. ग्रीक शब्द ‘ेल्लीेङ्मल्ल्र‘ङ्म२’ अर्थात, संबंधित आपल्या स्मरणशक्तीशी निगडित आहे. नैसर्गिक स्मरणशक्ती जेव्हा अपयशी ठरते किंवा जटिल माहिती आठवत नाही, अशा वेळेस चहू बाजूने या तंत्रांची मदत होते. मात्र, हे तंत्र शिकण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी पुरेसा वेळ लागतो. आपल्या आवडत्या क्षेत्रात स्मरणशक्तीच्या जोरावर यशस्वी कसे होता येते, हे सांगताना स्मरणशक्ती म्हणजे काय, त्याची प्रक्रि या, प्रकार, व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव, अडथळे, मानवी मेंदू, स्मरणशक्तीचे गुपित, उजव्या मेंदूचे महत्त्वाचे कार्य, नाव व चेहरा लक्षात ठेवण्याचे तंत्र, विदेशी भाषा शिकायचे तंत्र, पेगवर्ड तंत्र, मोठी सूची, संख्या, इतिहासातील संख्या, वाढदिवस, दूरध्वनी क्र मांक, भौगोलिक माहिती लक्षात ठेवण्याचे तंत्र आदी या तंत्राद्वारे आत्मसात करता येते.लहान मुलांना कशा पद्धतीने समजावून सांगावे?पहिल्या पाच वर्षांपर्यंत लहानग्यांचा मेंदू हा उघड्या डब्याप्रमाणे असतो. जे समोर दिसते, ऐकतो, तेही चिमुरडी मंडळी जसच्या तसे स्वीकारतात. वयाच्या या टप्प्यात आपण सगळे चांगल्या- वाईटाचा विचार न करता, केवळ स्वीकारत जातो. त्यानंतर, आपले माइंड प्रोग्राम होण्यास सुरुवात होते. बºयाचदा आपण ज्या वेळेस भावनाविवश होतो, तेव्हा माइंड प्रोग्रामिंगची प्रक्रि या वेगाने होते असते. त्यानंतर, १२ वर्षांनंतर ही लहान मुले स्वत:चे निर्णय स्वत:च घेतात. त्यांची स्वत:ची भूमिका असते. आपण काहीही सांगितले, तरी ते त्याविषयी स्वत:चा दृष्टीकोन बाळगत असतात. त्यामुळे लहानग्यांना घडविण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्यांना रागावायचं नाही, समजावून सांगायचं. त्यांच्या उत्तरांवर कारणे देऊन स्पष्टीकरण द्यायचे. त्याशिवाय, हो किंवा नाही, यातल्या आपल्या भूमिकेवर ठाम राहून, त्याप्रमाणे त्यांना समजेल अशा भाषेत त्यांना समाजावून सांगायचे. या लहानग्यांना मारायचे नाही आणि त्यांना ‘नाही’ म्हणायचं नाही.आपल्या कार्यशाळांविषयी माहिती सांगा.बालसंगोपन, कुटुंबस्वास्थ्य, पती-पत्नी संबंध, सेक्स, व्यक्तिमत्त्व विकास, संमोहन, स्मरणशक्ती सुधार तंत्र (निमोनिक्स) अशा विविध विषयांवर आपण कार्यशाळा घेतो. चार, पाच आणि तीस दिवस असा कार्यशाळांचा कालावधी असतो. राज्यभरातून आतापर्यंत विविध वयोगटांतील दीड लाख नागरिकांनी या कार्यशाळांचा लाभ घेतला आहे. त्यातील वैशिष्ट्य म्हणजे, यातील बरेच तरुण पिढीतील मुले-मुली, एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देऊन चांगल्या पदावर काम करत आहे. आता पुन्हा लवकरच या कार्यशाळा मुंबईसह राज्यभरात सुरू होणार आहेत.