शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णविवराची विलोभनीय प्रतिमा : प्रत्यक्षाहून उत्कट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 04:24 IST

कृष्णविवराच्या कृष्णवर्णाची प्रतिमा बघायला मिळणं ही खगोलशास्त्रज्ञांच्या दृष्टीने एक पर्वणीच. परंतु अशी प्रतिमा साकारली जाणं ही एक वेगळी बात असून तिची प्रत्यक्ष प्रतिमा प्राप्त करणं ही बात अलाहिदा.

- शैलेश माळोदे (विज्ञान लेखक)कृष्णविवराच्या कृष्णवर्णाची प्रतिमा बघायला मिळणं ही खगोलशास्त्रज्ञांच्या दृष्टीने एक पर्वणीच. परंतु अशी प्रतिमा साकारली जाणं ही एक वेगळी बात असून तिची प्रत्यक्ष प्रतिमा प्राप्त करणं ही बात अलाहिदा. विविध दूरदर्शक (टेलिस्कोप) एकत्र आणून त्यांचं जाळं तयार करून अशा प्रकारचं चित्र अवतरलंय. हे आहे कृष्णविवराचं एक व्यापक टोक. अर्थात हा कृष्णरंग प्रखर चमचमणाऱ्या प्रकाशात उठून दिसतोय. नेदरलँडमधील खगोलशास्त्रज्ञ हायनी फलके यांनी त्याला ‘अवकाश आणि काळ यांच्या शेवटी असलेली नरकाची कवाडं असं संबोधलंय. ते या घडामोडीत असलेल्या प्रमुख शास्त्रज्ञांपैकी एक आहेत.अवकाश—काळाच्या अरचनेतून ही ‘अग्निची अंगठी’ आपण या प्रतिमेच्या व्हिडीओतून बघतोय. प्रकाश गोल फिरून एक वर्तुळाकार आकार धारण करतो. एम ८७ नावाच्या दीर्घिकेच्या केंद्राजवळ असलेल्या अतिविशाल कृष्णविवराची प्रतिमा एका चमकदार अंगठीसारख्या रचनेसारखी दिसतेय. ही दीर्घिका (गॅलेक्सी) ५५0 दशलक्ष प्रकाशवर्ष दूरवर असून तिचं वस्तुमान सूर्याच्या साडेसहापट आहे. यातून अधिक तपशीलवारपणे क्षितिजावरील घटना दिसतेय. तिथे गुरुत्वबल इतकं प्रचंड आहे की त्यामुळे अगदी प्रकाशदेखील निसटू शकत नाही. कृष्णविवराची व्याख्या करताना असं म्हणतो की, अवकाशातील अशी वस्तू की जिथून गुरुत्वबलाच्या ताकदीमुळे प्रकाशदेखील बाहेर पडू शकत नाही.

हे सर्व निष्कर्ष अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स या प्रथितयश जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेत. चंद्रभूमीवर पडलेलं एखादं ‘डोनट’ शोधण्यासारखी ही गोष्ट इव्हेन्ट होरायझन दूरदर्शक (टेलिस्कोप) या एका सामूहिक प्रयत्नातून साकारली गेलीय. जागतिक स्तरावरील परस्पर सहकार्याचे हे एक उदाहरण आहे. आपल्या लहानपणी ही कल्पनाही केवळ रम्य परंतु अशक्य कोटीतील वाटत होती असं काही वैज्ञानिकांनी म्हटलंय. आईन्स्टाईनच्या सापेक्षताविषयक सर्वसाधारण सिद्धान्तापासून म्हणजे जनरल थिअरी आॅफ रिलेटिव्हिटीपासूनच कृष्णविवरांच्या अस्तित्वाविषयी अभ्यास सुरू आहे. या जवळपास एका शतकाच्या प्रयत्नांना आलेलं फळ या प्रतिमेतून दिसतंय. एक ८७ दीर्घिकेबरोबरच सॅजिटॅरिअस ए नावाचं दुसरं कृष्णविवराचंही निरीक्षण एप्रिल २0१७ मधील पाच रात्री वैज्ञानिकांच्या गटानं केलं.हे कृष्णविवर प्रकाशगंगा म्हणून ओळखल्या जाणाºया दुधाळ पट्ट्याच्या स्वरूपात दिसणाºया दीर्घिकेच्या केंद्रस्थानी आहे. जगभरातील आठ वेधशाळांमधील रेडिओ टेलिस्कोपना एकमेकांशी लिंक करून या दूरस्य अवकाशीय वस्तूंची प्रखरता टिपण्यात आली. त्यासाठी हवाईपासून ते दक्षिण ध्रुवापर्यंतच्या या वेधशाळांमधील डेटा एकत्रित विश्लेषणांसाठी वापरण्यात आला. २0१८ सालच्या मध्यावर हे काम पूर्ण झाल्यावर त्यांना एम ८७ चं सुस्पष्ट चित्र मिळण्याची शक्यता दुणावली.
कृष्णविवर हे अत्यंत जलदगतीने फिरतं. त्याचबरोबर संशोधकांना कृष्णविवर हे महाकार जेट्स ‘प्रवाह’ निर्माण करतात असंही दिसून आलं. अर्थात सॅजिटेरिअस ‘ए’च्या आकडेवारीतून हे कृष्णविवर एम ८७ पेक्षा हजारपट लहान असल्याचं सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ लिझियानो रेझीला यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांचं विश्लेषण अधिक किचकट आणि माहितीच्या दृष्टीने खूपच समृद्ध असल्याचं दिसतं.घटनाक्षितिजावर सुस्पष्टपणे कृष्णविवर दिसण्यासाठी पृथ्वीएवढ्या आकाराच्या दूरदर्शकाची रेडिओ खगोलशास्त्रज्ञांना गरज असते. कारण टेलिस्कोपची प्रखरता त्याच्या आकाराच्या प्रमाणात असते. परंतु इंटरफेरोमेट्री या तंत्राद्वारे एकमेकांपासून लांब अंतरावर असलेल्या अनेक दूरदर्शकांना एकाच अवकाशस्थ वस्तूकडे एकाच वेळी फोकस करून कार्य यशस्वी ठरतं. थोडक्यात हे टेलिस्कोप्स एका बशीच्या आकाराप्रमाणे प्रतिमा टिपणारे बनतात. जगभरातील शास्त्रज्ञांच्या विविध गटांनी वेधशाळांचं नेटवर्क बनवून २0१४ सालापासून या इव्हेंट होरायझन टेलिस्कोपद्वारे निरीक्षणं केलं. २0१७ मध्ये संपूर्ण पृथ्वी कव्हर होईल इतपत मोठी निरीक्षण मोहीम हाती घेण्यात आली. पेटाबाईटस इतक्या प्रचंड प्रमाणात अनेक हार्डडिस्क भरून आकडेवारी गोळा करण्यात आली. वैश्विक प्रयोगांसाठी किमान जागतिक सहयोग हवाच. ही बाब यातून उठून दिसते. कृष्णविवरांच्या प्रथम प्रतिमेच्या औचित्यानं हे घडतंय. हेही नसे थोडके. वसुधैव कुटुंबकम्।