शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात भाजपची जमवाजमव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:33 IST

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीची जमवाजमव भाजपने मराठवाड्यात सुरू केलेली दिसते आणि त्यादृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे.

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीची जमवाजमव भाजपने मराठवाड्यात सुरू केलेली दिसते आणि त्यादृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे. परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये आले होते, तर त्यांनी राष्टÑवादीचे नेते आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी पायधूळ झाडली. त्यापाठोपाठ महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी औरंगाबादमध्ये चार ठिकाणी भेटीगाठी घेतल्या. त्यात चर्चा झाली ती वेरूळची. ते शांतिगिरी महाराजांच्या भेटीला गेले होते.महाराज गेल्या ४० वर्षांपासून सेवेकरी. जनार्दन स्वामींच्या निर्वाणानंतर ते मठाचे प्रमुख बनले. स्वामींची मूळ समाधी कोपरगावला; पण त्या मठात त्यांना स्थान नाही. शांतिगिरी महाराजांचा माजी खा. रामकृष्ण बाबा पाटील, अशोक पाटील डोणगावकर यांच्याशी घनिष्ठ मेळ होता. पुढे ते खा. चंद्रकांत खैरेंच्या संगतीतही होते.औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात त्यांच्या भक्तांची मोठी मांदियाळी असल्याने राजकारण्यांसाठी बाबांचे महत्त्व आजही आहे. महाराज मूळचे निफाड तालुक्यातील लाखलगावचे. बाबूराव यशवंत कांडेकर हे त्यांचे मूळ नाव; पण बालपणापासून अध्यात्माची आवड असल्याने ते जनार्दन स्वामींचे सेवेकरी झाले आणि पुढे उत्तराधिकारी. राजकारण्यांच्या सहवासामुळे २००९ मध्ये त्यांच्याही राजकीय महत्त्वकांक्षेने उचल खाल्ली होती आणि त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली; पण पराभूत झाले तरी त्यांना मिळालेली मते दुर्लक्ष करण्यासारखी नव्हती. चंद्रकांत पाटलांनी जरी सांगितले की, तेथील हरिनाम सप्ताहामध्ये भेट देण्यासाठी आलो होतो; पण यांच्या पारमार्थिक गप्पा झाल्या असतील याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. या दीड तासाच्या भेटीने चर्चेला उधाण आले, औरंगाबाद मतदारसंघात भाजप आपला उमेदवार शोधत असल्याची आवई अगोदरपासूनच उठल्याने भरथंडीत गरमागरम चर्चा रंगली. भाजप असलेल्या जुन्या, नव्या चेहºयांचा विचार केला, तर भाजपचा हा ‘कात्रज घाटा’चा प्रयोग असावा. माजी खा. जयसिंगराव गायकवाड जिल्हाभर शेतकºयांच्या भेटीघाटी घेत फिरत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे नाही म्हणत विचार करताना दिसतात. त्याचवेळी ही हरिनाम सप्ताहातील गाठभेट रसद जमवाजमवीचा भाग असावा. यावेळी त्यांनी येथील ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत अदवंतांच्या घरी उद्योजकांच्या नव्या पिढीशी चर्चा केली. अदवंत हे अभ्यासू वकील म्हणून ओळखले जातात. किशोर शितोळे, सतीश वेताळ आणि वास्तुविशारद सुशील देशमुख यांच्याही घरी ते गेले. ही सर्वच मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रांतील आहेत; पण राजकारणात नाही.बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर राष्टÑवादीचे नेते असले तरी भाऊबंदकीने त्रस्त झाले. येथेही पुतण्याचा त्रास वाढला तो पक्षश्रेष्ठींच्या आशीर्वादाने. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांशी त्यांचे गूळपीठ जमलेले दिसते. गेल्या आठवड्यात त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शरद पवार आलेच नाहीत. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांची भेट ही राजकीय फोडणीच समजली जाते, तर अशी बांधाबांध मराठवाड्यात चालू आहे. ढोल कसे वाजणार हे गुजरातच्या निकालावरच अवलंबून आहे.- सुधीर महाजन

sudhir.mahajan@lokmat.com

टॅग्स :BJPभाजपा