शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

भाजपाची कोंडी

By admin | Updated: June 4, 2015 23:13 IST

निवडणूक काळात दिलेली आश्वासने मार्गी लावण्याचे आव्हान भाजपापुढे असताना सहा महिन्यात त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलली गेलेली नाहीत.

निवडणूक काळात दिलेली आश्वासने मार्गी लावण्याचे आव्हान भाजपापुढे असताना सहा महिन्यात त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलली गेलेली नाहीत. प्रश्न बिकट होत असल्याने भाजपाची कोंडी झाली आहे. $$्रिजळगाव महापालिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढताना भाजपाची कोंडी झाली आहे. केंद्र, राज्यात भाजपाची सत्ता आहे, जळगाव शहर मतदारसंघातून भाजपाचा आमदार निवडून आला आहे. महापालिकेत खान्देश विकास आघाडीची सत्ता असली तरी महत्त्वपूर्ण स्थायी समितीचे सभापतिपद भाजपाकडे आहे. अत्र-तत्र सर्वत्र भाजपा असताना जळगाव महापालिकेचे आर्थिक संकट का दूर होत नाही, असा प्रश्न साडेपाच लोकसंख्येच्या या शहराला पडला आहे.जळगाव महापालिकेवर हुडकोचे ५४० कोटी रुपये कर्ज आहे तर जिल्हा बँकेचे २९ कोटी रुपये आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये महापालिकेतील सत्ताधारी मंडळींवर आरोप करून राजकीय फायदा भाजपाने मिळविला. मात्र आता सत्ताधारी झालेल्या भाजपाला सहा महिन्यात मार्ग काढता आलेला नाही. हुडकोने घरकुलांसाठी कर्ज दिले होते. कर्जफेड काही वर्षे झाली. मात्र हप्ते थकल्यानंतर हुडकोने अवास्तव आकारणी केली. डीआरटीकडे वाद गेला. महापालिका प्रशासन उदासीन राहिल्याने दावा विरोधात गेला. महापालिकेचे बँक खाते तब्बल ५० दिवस सील करण्यात आले. हुडको अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. पण तो असफल झाला.भाजपाची कोंडी झाल्याचे दुसरे प्रकरण महापालिकेतील व्यापारी संकुलातील गाळेकराराचे आहे. महापालिकेच्या मालकीच्या १८ व्यापारी संकुलात २१७५ गाळे आहेत. या गाळेधारकांशी केलेल्या कराराची मुदत संपल्याने नवीन गाळेकरार करणे अपेक्षित होते. परंतु शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केट या दोन संकुलातील ९०० गाळेधारकांनी संघटितपणे नवीन गाळेकराराला विरोध दर्शवला. रेडीरेकनरचा दर आणि मुदतीचा कालावधी या मुद्द्यांना व्यापाऱ्यांचा विरोध होता. भाजपाने व्यापाऱ्यांची बाजू लावून धरली. व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयात दाद मागितली. सगळ्याच ठिकाणी व्यापाऱ्यांना अपयश आले. उच्च न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत अपिलासाठी दिली आहे. ही मुदत ८ जून रोजी संपते. सर्वोच्च न्यायालयात जाण्याऐवजी व्यापाऱ्यांनी पुन्हा भाजपा नेत्यांचे दार ठोठावले.नवीन ठराव करण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांनी केला. परंतु घरकूल प्रकरणाची प्रचंड दहशत असलेल्या भाजपा नगरसेवकांनी ठरावावर सह्या करण्यास उत्सुकता दाखविली नाही. नगरसेवकांचे समाधान करण्यासाठी अखेर महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना बैठक घ्यावी लागली. या गाळेकरारातून ४५८ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळवून देणारा २० आॅक्टोबर २०१४चा ठराव मुख्यमंत्र्यांनी रद्द केला. नगरविकास राज्यमंत्र्यांकडे रितसर सुनावणी घेण्याचे आदेश दिले. ठराव रद्द झाला असला तरी उच्च न्यायालयाने दिलेल्या ८ जूनच्या मुदतीनंतर काय, हा प्रश्न कायम आहेच. दुसरीकडे फुले मार्केट व चौबे मार्केट ही व्यापारी संकुले महसूल विभागाच्या जागेवर बांधण्यात आली असून, अटी-शर्तीचा भंग झाल्याचा ठपका महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी महापालिकेवर ठेवला आहे. ही जागा आता महसूल विभाग ताब्यात घेईल आणि नंतर ती व्यापाऱ्यांना रितसर देण्यात येईल, असे खडसे यांनी स्पष्ट केले. गाळेकराराचा मुद्दा सुटताना दिसत नसताना हे पाऊल भाजपा नेत्यांनी उचलले हे उघड आहे. पण तरीही रेडीरेकनरच्या दराचा मुद्दा महसूल यंत्रणादेखील सोडेल, असे वाटत नाही. तीन वर्षांपासून व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांनी महापालिकेला भाडे दिलेले नाही. कर्जाचा डोंगर असताना मालमत्ता फेरमूल्यांकन, जाहिरात कर वसुलीचा मक्ता ही उत्पन्नाची साधनेदेखील प्रशासनाच्या उदासीनतेमुळे थंडबस्त्यात आहे. महापालिका कर्मचाऱ्यांचा पाच महिन्यांपासून पगार नाही. या बाबीकडे लक्ष द्यायला महापालिका प्रशासनाला वेळ नाही. राजकीय अभिनिवेश विसरून हा प्रश्न सोडविण्याची खरे तर भाजपा नेत्यांकडून शहरवासीयांच्या अपेक्षा आहेत. पण त्याऐवजी तात्कालीक लाभासाठी प्रश्न अधिक किचकट होताना दिसत आहे. - मिलिंंद कुलकर्णी