शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

व्हिसलिंग वूड्स, सुभाष घई अन् सरकारची लगीनघाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 12:38 IST

घई यांच्या व्हिसलिंग वुडस इंटरनॅशनल स्कूल या संस्थेला मागील सरकारने दिलेली जमीन बेकायदा दिल्याचा निष्कर्ष काढून न्यायालयाने ही जमीन परत घेण्याचे आदेश दिले असताना राज्यातील देवेंद्रभौंच्या सरकारने ही साडेपाच एकर जमीन २० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्याचा देण्याचा निर्णय घेतला.

- दे. दे. ठोसेकरस्मिता ठाकरे यांच्या राजकारण प्रवेशाची बातमी जेवढी अजरामर आहे तेवढीच सुभाष घई यांना आलेल्या डी गँगच्या धमक्यांची बातमी ताजी फडफडीत आहे. १९९३ मध्ये ‘खलनायक’ रिलीज झाला तेव्हा घई यांना धमकी आल्याची पहिली बातमी आली होती. (त्यावेळी दुबईत बसलेला ‘खलनायक’ दाऊद आमच्या सुभाषबाबूंना काही तरी करणार या कल्पनेनं इंटरव्हलमध्ये आमच्या घशाखाली समोसा उतरला नव्हता) मात्र आजतागायत डॉनने घई सॉरी घाई केलेली नाही. खर तर घई यांची उठताबसता आठवण व्हायला आम्ही का गोविंद स्वरुप आहोत. पण त्यांच्या व्हिसलिंग वुडस इंटरनॅशनल स्कूल या संस्थेला मागील सरकारने दिलेली जमीन बेकायदा दिल्याचा निष्कर्ष काढून न्यायालयाने ही जमीन परत घेण्याचे आदेश दिले असताना राज्यातील देवेंद्रभौंच्या सरकारने ही साडेपाच एकर जमीन २० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्याचा देण्याचा निर्णय घेतला. (‘खलनायका’प्रमाणे प्रत्येक गोष्टीत नकारघंटा बडवणाऱ्या वित्त विभागाचे आक्षेप हा निर्णय करताना चक्क नजरअंदाज केले गेले) विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना घई यांना घाईगर्दीत ही २० एकर जमीन नाममात्र किंमतीत दिली गेली. (रितेश देशमुख यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार आगमनाचा संबंध त्यावेळी भाजपाने या जमीन व्यवहाराशी जोडला होता) आता एखाद्या ‘अमृताहूनी गोड’ गळ्याच्या गायिकेची गाणी घईंच्या आगामी चित्रपटात वाजणार का, असा प्रश्न विरोधकांना पडला तर नवलं नाही? केवळ १०० रुपयांच्या स्टँपपेपरवर सहमती करार करुन विलासरावांनी दिलेली ही जमीन बेकायदा असल्याचा निर्वाळा न्यायालयाने २०१२ मध्ये दिला तेव्हा ‘सरकारने आपल्या ब्ल्यू आईड बॉयला कायदा डावलून लाभ दिला आहे’ अशी टिप्पणी न्यायालयाने केली होती. निर्मला सीतारामन (विषय व्हिसलिंग वुडसचा असो की राफेलचा घशाच्या सर्व शिरा ताणून बोलणाºया) यांनी त्यावेळी केंद्रात मंत्री असलेल्या विलासरावांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. घई यांना दिलेली साडेचौदा एकर जमीन त्यावेळी न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने काढून घेतली. मात्र ज्या साडेपाच एकर जमिनीवर बांधकाम झाले ती २०१४ पर्यंत परत घेणे अपेक्षित होते. ही जमीन काढून घेणे तर दूरच राहिले ती जमीन त्यांना देण्याचा निर्णय करुन सरकार मोकळे झाले. घई हेही उर्वरित साडेचौदा एकर जमीन पुन्हा मिळावी याकरिता प्रयत्नशील आहेत. टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाच्या अखत्यारित आपली संस्था चालवली जात असल्याचा देखावा करुन उच्च व तंत्रशिक्षण संस्थेच्या निकषात आपल्याला कोंबून घेत घई यांनी स्वत:ला ‘सौदागर’ सिद्ध केले. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना इतकी घाई करण्याची काय गरज होती? हिंदी चित्रपटसृष्टीत पिछाडीवर पडलेला व सध्या तमिळ, मल्याळम व कन्नड चित्रपट करणाºया एका ‘विवेकी’ अभिनेत्याने हा अविवेकी निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडल्याची चर्चा आहे. भविष्यात पुन्हा न्यायालयाने चपराक लगावली तर या सरकारमधील निर्णय घेणाºयांना हेच गीत आळवावे लागेल...घाई नको बाई अशी आले रे काकुळतीलानको नको घाई नको बाई अशी आले रे काकुळतीलाकळे न काही आज असा का सुभाष हिरमुसलाथांब जरा अंगारा विसरले न मी तुला..

टॅग्स :bollywoodबॉलिवूड