शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

बिरबलाची खिचडी अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 04:38 IST

परवा आम्ही बारामतीला येऊन गेलो. सध्याच्या राजकीय हवामानावर आपला अंदाज जाणून घेण्याची इच्छा होती; पण आपण अचानक दिल्लीला गेल्याचे कळले. आम्ही हिरमुसलो नाही. उलट आम्हाला आनंदच झाला.

- नंदकिशोर पाटीलआदरणीय साहेब, साष्टांग नमस्कार.परवा आम्ही बारामतीला येऊन गेलो. सध्याच्या राजकीय हवामानावर आपला अंदाज जाणून घेण्याची इच्छा होती; पण आपण अचानक दिल्लीला गेल्याचे कळले. आम्ही हिरमुसलो नाही. उलट आम्हाला आनंदच झाला. कारण आपण असे अचानक दिल्लीला जाता तेव्हा आमच्यासारख्या अनेकांच्या आशा पल्लवीत होतात. साहेब, मराठी माणसाला दिल्ली मानवत नाही, असे म्हणतात. पण आपणास ती चांगलीच मानवलेली दिसते. दिल्लीतील आपली ‘ऊठबस’ ही आता नॅशनल न्यूज होऊ लागली आहे. आजवर आपण सेव्हन रेसकोर्सवरचे अनेक उंबरठे झिजवले असतील. पण आता दिल्लीतील अनेक रस्ते आपल्या बंगल्यापाशी येऊन थांबतात. कालाय् तस्मे नम:!साहेब, आजवर अनेकांना आपण बोट धरून राजकारणात आणले. काहींनी त्याची जाणीव ठेवली. काहीजण विसरले. पण आपण त्यांना कधीच विसरत नाहीत. हा आपला मोठेपणा. तसा तुमचा गोतावळा खूप मोठा. साहित्य, संगीत, नाट्य, क्रीडा, शिक्षण, कृषी, उद्योग अशा नानाविध क्षेत्रात आपले चाहते आहेत. या सगळ्यांसाठी तुम्ही वेळ कसा काढता?साहेब, भारतीय हवामान खाते आपल्या प्रभावाखाली आहे, असे आमचे ठाम मत बनले आहे. आपल्या धोरणांचा, विचारांचा आणि कृतीचा जसा अंदाज लागत नाही, तसा हवामान खात्याचाही लागत नाही. यंदा पाऊसकाळ चांगला असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. त्यानुसार आम्ही पेरणीची तयारी केली. पण चाड्यावर मूठ धरताच ढगांनी दगा दिला आणि पाऊस गायब झाला. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात मान्सून संपल्याची घोषणा झाली तरी जानेवारीपर्यंत पाणी पडत होते! हल्ली आपलाही अंदाज लागेनासा झाला आहे. काल परवापर्यंत तुम्हीच विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतलेला. आपले स्वयंघोषित शिष्यमोत्तम मोदींजीवर तमाम जनता नाराज असल्याचे आपण वारंवार सांगितलेत. नोटाबंदीमुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांचे कंबरडे मोडले, हिंदुत्ववादी शक्तींमुळे देशात जातीय तणाव वाढू लागला असून लोकशाही धोक्यात आल्याचे आपण सांगत आला आहात. आपल्या पक्षाच्या वर्धापनदिनी बोलताना आपण देशात राजकीय परिवर्तनाची लाट असल्याचे विधान केले होते. ते ऐकून आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते ‘कामाला’ लागले होते. राष्टÑीय पातळीवरदेखील विरोधकांची जमवाजमव होऊ लागली होती. कुमारस्वामींच्या शपथविधीला राज्यपातळीवरील ‘राष्टÑीय’ नेत्यांचा हात उंचावलेला फोटो वर्तमानपत्रात पाहून आमची छाती रुंदावली होती. त्या फोटोत आम्हाला उद्याच्या भविष्याचे सुचिन्ह दिसू लागले होते. ‘अब दिल्ली दूर नही’ असे वाटून आम्ही मनोमन खूप आनंदून गेलो होतो. वातावरण देशभर तापलेले असताना आपण परवा केलेल्या एका विधानाने आम्ही पार बुचकळ्यात पडलो. ‘विरोधकांची एकजूट म्हणजे बिरबलाची खिचडी. कितपत पकेल माहीत नाही’ असे आपण म्हणालात यावर आमचा विश्वास बसत नाही. मीडियाने ‘ध’ चा ‘मा’ केला की, आपणच खडा टाकून पाहिलात?खरं काय ते सांगून टाका बरं.उत्तराच्या प्रतीक्षेत...(तिरकस)

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार