शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भरमसाट वीजबिलाबाबत दक्ष राहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 04:05 IST

महाराष्ट्रामध्ये मुंबईसह उर्वरित राज्यांतील वीज ग्राहकांची संख्या सुमारे २ कोटी ८० लाख आहे.

- अशोक पेंडसेमहाराष्ट्रामध्ये मुंबईसह उर्वरित राज्यांतील वीज ग्राहकांची संख्या सुमारे २ कोटी ८० लाख आहे. यातील घरगुती वीज ग्राहकांची संख्या २ कोटींपेक्षा जास्त आहे. घरगुती वीज ग्राहकांची ‘आमचे बिल भरमसाट आले’, अशी मोठ्या प्रमाणावर तक्रार असते. वीजबिल म्हणजे वापरलेली वीज युनिट गुणिले वीज दर हा सामान्य गुणाकार आहे. मुंबईत अदानी, टाटा, बेस्ट तर उर्वरित महाराष्ट्रात महावितरण वीज वितरण करते. घरगुती वीज ग्राहकांचे या चार वीज कंपन्यांचे वीजदर खालीलप्रमाणे आहेत.वीज वापर अदानी टाटा महावितरण बेस्ट ०-१०० ४.५० ४.३३ ४.३० २.९१ १०१-३०० ७.६५ ७.५१ ८.०३ ५.१६ ३०१-५०० ९.२९ ११.४९ ११.०५ ७.९६ ५०१ वर ११.२४ १४.१० ११.८० ९.४५ हा तक्ता पाहिला असता असे लक्षात येईल की अदानी, टाटा आणि महावितरण यातील ० ते ३०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांचे वीजदर जवळजवळ समानच आहेत. बेस्टचे वीजदर कमी आहेत. त्याचे कारण की बेस्टमध्ये झालेला वाहतूक विभागाचा तोटा वीज दरवाढ करून भरून काढण्यात आला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा तोटा वीजदर वाढवून भरून काढण्यास मज्जाव केला. यामुळे आधीच्या वर्षातील वसूल केलेला तोटा हा सध्या परत दिला जात आहे. त्यामुळे बेस्टचा दर हा सध्या कमी आहे. सुमारे वर्षभरात हा दरसुद्धा इतरांच्या पातळीवर येईल.हे वीजदर बघितल्यानंतर एक लक्षात येईल की वीजदर टप्पा पद्धतीने वाढतो. समजा एखाद्या ग्राहकाने जर शंभर युनिट वीज वापरली तर महावितरणमध्ये त्याचे बिल ४३0 रुपये येईल. परंतु त्याने १३० युनिट वीज वापरली तर तेच बिल ४३0 अधिक २४0 म्हणजे ६७0 रुपये येईल. म्हणजेच थोडी अधिकच वीज वापरली तरी आपले बिल दीडपट का झाले, हे ग्राहकाला झटकन समजत नाही. त्याचे उत्तर हे टप्पा पद्धतीत आहे. म्हणजे शंभर युनिटपर्यंत चार रुपये असलेला दर शंभर युनिट ओलांडल्यानंतर दुप्पट म्हणजेच आठ रुपये होतो. दरवर्षी किंवा एक वर्षाआड साधारणत: वीज दरवाढ होत असते. या नव्या दरासंबंधी बातम्या पेपरमध्ये येतच असतात. त्यामुळे ग्राहकांना त्याची माहिती असते.वीजदर पाहिल्यानंतर पुढचा भाग ग्राहकाचा वीजवापर. दर महिन्याला येत असलेल्या बिलावर गेल्या बारा महिन्यांचा वीजवापर छापलेला असतो. वीजवापर हा उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या ऋतूप्रमाणे वरखाली होत असतो. एक उदाहरणच बघूया. आपला वीजवापर बारा महिन्यांमध्ये कमीत कमी शंभर ते एकशे साठ युनिट असा असू शकेल. तर सरासरी एकशे चाळीस युनिट असू शकेल. ज्या वेळेला बिल भरमसाट आले असे आपल्याला वाटते. त्या वेळा त्या महिन्यात किती युनिट वीज वापरली गेली हे बघणे जरुरीचे आहे. गेल्या बारा महिन्यांतील जास्तीत जास्त वापर हा एकशे साठ युनिट आहे. तो समजा जर का एकशे ऐंशी, दोनशेपर्यंत गेला असेल तर एवढा वीजवापर ग्राहकांकडून होणे शक्य आहे. परंतु जास्तीत जास्त समजा एकशे साठ युनिट वापर असलेला ग्राहक दुपटीपेक्षा जास्त वापर करू शकणार नाही. त्यावेळी ग्राहकाने जागरूक होत त्याकडे बघणे जरुरीचे आहे.दर आणि विजेचा वापर हे दोन्ही तपासल्यानंतरसुद्धा जर का तक्रार असेल तर अंतर्गत ग्राहक निवारण कक्षाकडे तक्रार करावी लागते. तक्रारीचा अर्ज आयोग आणि वीज वितरण कंपन्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अंतर्गत निवारण कक्षाचा पत्ता वीज बिलावरच छापलेला असतो. अशा पद्धतीची लिखित स्वरूपाची तक्रार वीज वितरण कंपनीकडे करावी. तक्रार झाल्यापासून साठ दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण होणे बंधनकारक आहे. समजा तक्रार निवारण कक्षाने दिलेला निर्णय मान्य नसला किंवा त्यांनी साठ दिवसांच्या आत निर्णय दिला नाही तर ग्राहक तक्रार निवारण कक्ष यांच्याकडे तक्रार करावी. हा करावयाचा अर्ज संकेतस्थळावर आणि कक्षाचा पत्ता बिलावर उपलब्ध असतो. सीजीआरएफ अर्थातच हे विभागीय कार्यालयात असल्यामुळे ग्राहकाला थोडा त्रास सहन करावा लागेल. सीजीआरएफमध्ये दोन सदस्य आणि एक अध्यक्ष असतो. अध्यक्ष साधारणत: न्यायाधीश किंवा सेक्रेटरी किंवा इंजिनीअरिंग कॉलेजचा प्राचार्य असू शकतो. तर दुसरा सदस्य हा ग्राहक चळवळीशी संबंधित असतो. आणि तिसरा सदस्य अर्थात वीज वितरण कंपनीचा कर्मचारी असतो. ग्राहक कक्षात येत असलेल्या तक्रारींचे ६५ ते ७० निकाल ग्राहकांच्या बाजूनेच लागतात. याचे मुख्य कारण असे की कक्षामध्ये मुख्यत: तीनपैकी दोन सदस्य हे वीज कंपनीचे कर्मचारीच नसतात.भरमसाट बिल आले असे ग्राहकाला वाटते तेव्हा पन्नास टक्के बिल ताबडतोब भरा, असे बऱ्याचदा वीज वितरण कंपनी सांगते. परंतु ते बिलसुद्धा ग्राहकाच्या क्षमतेच्या पलीकडे असू शकते. बिल भरले नाही तर वीज तोडली जाण्याची शक्यता असते. म्हणून कक्षाकडे अर्ज केला तर कक्ष या वीज बिल प्रकरणाचा निर्णय लागत नाही तोवर वीज तोडायला स्थगिती देऊ शकतो. अर्थात त्या महिन्याच्या बिलापोटी गेल्या सहा महिन्यांच्या वीजवापराची सरासरी घेऊन तेवढ्या वीज वापराचे बिल अदा करावे लागते. तात्पर्य, वीज बिलात झालेली शेवटची रक्कम पकडून काही निष्कर्ष काढण्याआधी वीज दर, वीजवापर यासंबंधी स्वत:च माहिती करून घेतलेली बरी.(वीज क्षेत्रातील तज्ज्ञ)