शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बापूशाही ! जिल्ह्याचं पालकत्व.. वेध बदलत्या समीकरणांचा !

By सचिन जवळकोटे | Updated: November 10, 2019 07:37 IST

लगाव बत्ती...

- सचिन जवळकोटे

काय मंडळी...दिवाळी कशी साजरी झाली ? यंदाचा फराळ कसा होता ? लाडू-चिवडा संपला की नाही ? बालूशाही खाल्ली की नाही ?...एक मिनिट. ‘बालूशाही’वरून आठवलं. यंदा ‘बापूशाही’ जोरात दिसतेय आपल्याकडं. राज्यात ‘ओन्ली वन भाजप गाडी’ निघाली तर म्हणे ‘दक्षिण’चे ‘सुभाषबापू’... अन् ‘महाशिवआघाडी’ जमली, तर म्हणे ‘सांगोल्या’चे ‘शहाजीबापू’. आलं का लक्षात ? होय... होय. जिल्ह्याचं ‘पालकत्व’ मिळविण्यासाठी या दोन्ही ‘बापूं’नी लावलीय आपापल्या गॉडफादरकडे जोरदार फिल्डिंग. लगाव बत्ती...

‘देवेंद्रपंतां’शी जवळीक वाढतेय ‘सुभाषबापूं’ची !‘काळजापूर मारुती’जवळच्या ‘देशमुख’ बंगल्यात बरीच वर्षे ‘पालकत्वाची खुर्ची’ नांदली. त्यांनी या पदाचा जिल्ह्याच्या विकासासाठी अन् पक्षाच्या भल्यासाठी किती फायदा करून घेतला हा भाग वेगळा; मात्र त्यांच्या मतदारसंघापुरतंच बोलायचं झालं तर, त्यांना यंदा भरभरून मिळालेल्या ‘लीड’मधूनच ‘उत्तर’ मिळालेलं. 

खरंतर, जिल्ह्यात पार्टीचा अजून एक ‘कॅबिनेट’ असतानाही ‘राज्य’मंत्र्याला ‘पालकत्व’ मिळावं, ही खदखद शेवटपर्यंत ‘लोकमंगल’ ग्रुपमध्ये राहिलेली. अनेकांच्या तक्रारी असतानाही ‘विजयकुमारां’ची खुर्ची टिकली, केवळ दोन गोष्टींसाठी. पहिली म्हणजे महाराष्ट्रातील ‘तम् तम् मंदीं’ना खूश ठेवणे. दुसरी म्हणजे ‘सुभाषबापूं’चा ‘गडकरी पॅटर्न’ जिल्ह्यात स्ट्राँग होऊ नये म्हणून त्यांचा विरोधी गट बळकट करणे; मात्र यंदाच्या निकालानंतर परिस्थिती पूर्णपणे पालटलीय. राज्यात ‘वारणानगर’चे ‘विनय’ तर ‘अक्कलकोट’चे ‘सचिनदादा’ हेही ‘तम् तम् मंदी’ नेते म्हणून निवडून आलेत. या दोघांचीही ‘देवेंद्रपंतां’सोबत खूप चांगली सलगी. त्यामुळं केवळ समाजाच्या पॉर्इंटवरच ‘विजयकुमारां’च्या नावाचा विचार झाला तर त्यांना दोन सक्षम पर्यायही पार्टीला मिळालेले. तशात पुन्हा ‘सुभाषबापूं’नी अलीकडच्या काळात आपली ‘पॉलिटिकल स्ट्रॅटेजी’ थोडीशी बदललेली. भलेही ते ‘गडकरी वाड्या’वरचे म्हणून ओळखले जात असले तरी आजकाल ‘देवेंद्रपंतां’सोबत अधिकाधिक जवळीक साधू लागलेले. शुक्रवारी जेव्हा स्वतंत्र सत्तास्थापनेसंदर्भात ‘पंत’ आपली भूमिका मीडियासमोर मांडत होते, तेव्हा त्यांच्यासोबत बसलेले ‘सुभाषबापू’ सा-या जगाला दिसलेले. सध्या पार्टीच्या कोअर कमिटीत असलेल्या ‘बापूं’वर ‘पंतां’चा विश्वास वाढत चालल्याचीच ही लक्षणं.

त्यामुळं यंदा कोणत्याही परिस्थितीत ‘बापूं’नाच ‘सोलापूरचं पालकत्व’ मिळणार, असा दावा ‘लोकमंगल’ बँकेच्या पिग्मी एजंटापासून ते ‘लोकमंगल’ कारखान्याच्या डायरेक्टरपर्यंत सारेच म्हणे करू लागलेत; पण थांबाऽऽ थांबाऽऽ हे कधी होणार ?...जर ‘कमळा’ला बहुमत मिळालं तरच. तोपर्यंत लगाव बत्ती.

...तर मग नक्कीच ‘शहाजीबापूं’चं नाव पुढं...

समजा ‘कमळ’वाल्यांचं सरकार आलंच नाही. थोरले काका ‘बारामतीकरां’च्या करामतीतून ‘धनुष्यबाण’वाल्यांचा मुख्यमंत्री खुर्चीवर बसला तर जिल्ह्यातील एकमेव ‘बाण’वाल्या आमदाराची चांदीच चांदी. ‘सांगोल्याचे शहाजीबापू’ होऊ शकतात ‘लाल बत्ती’चे मानकरी. कदाचित त्यांनाच मिळू शकते ‘पालकत्वाची खुर्ची’...कारण ‘अकलूजच्या दादां’पासून ते ‘पंढरपूरच्या पंतां’पर्यंत सर्वांना नडण्याचं धाडस दाखवू शकतात केवळ तेच. फक्त पूर्वीच्या सवयीप्रमाणं कुणाला मॅनेज होऊ नये म्हणजे मिळविली.

‘बापू’ म्हणजे रांगडा गडी. बोलताना वाणी सुटली की, भल्याभल्यांची पंचाईत करून टाकणार. कदाचित याच स्वभावामुळं कैक वर्षे आमदारकीविना ‘अनवाणी’ फिरण्याची पाळी आलेली; मात्र यंदा ‘बाणा’चे एकमेव आमदार म्हणून ते निवडून आलेत.खरंतर, ‘जिल्ह्याचं पालकत्व’ परंड्याच्या ‘तानाजीरावां’कडे दिली जाण्याची शक्यता दाट. मात्र त्यांना ‘सोलापूर’पेक्षाही ‘उस्मानाबाद’च्या राजकारणावर अधिक कमांड घ्यायची असल्यानं त्यांचा ओढा तिकडंच. तशात पुन्हा त्यांनी सोलापूूर जिल्ह्यात वेचून-वेचून निवडलेला एकही हिरा चमकला नाहीच. त्यांचा ‘सुपरहीट फॉर्म्युला’ पाचही ठिकाणी पुरता ‘फ्लॉप’ झाला. त्यामुळंच ‘शहाजीबापूं’चं नाव वरच्या पातळीवर येऊ लागलंय चर्चेत...पण या सा-या जर-तरच्या गोष्टी...कारण ‘कमळा’ऐवजी ‘बाणा’चं सरकार आलं तरच असं शकतं घडू. तोपर्यंत लगाव बत्ती....

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSubhash Deshmukhसुभाष देशमुखShiv SenaशिवसेनाBJPभाजपाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार