शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

‘बॅनर्जींचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार, अमेरिका आणि आम्ही!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:12 IST

नोबेल विजेत्या अभिजित बॅनर्जींचे गरिबीवरील अर्थशास्त्रीय संशोधन हे महत्त्वाचे व उपयोगी जरूर आहे, पण ते आजच्या ‘टिपिकल’ अमेरिकी पद्धतीने केलेले आहे.

नोबेल विजेत्या अभिजित बॅनर्जींचे गरिबीवरील अर्थशास्त्रीय संशोधन हे महत्त्वाचे व उपयोगी जरूर आहे, पण ते आजच्या ‘टिपिकल’ अमेरिकी पद्धतीने केलेले आहे. याचा अर्थ असा की, अमेरिकन अर्थशास्त्री हे एका विषयातील छोटा हिस्सा घेतात व त्या छोट्या परिघातच खोलवर शिरतात. म्हणजे एखाद्या गरिबाला अन्न द्यावे, रोकड द्यावी, कपडे द्यावेत, जेणेकरून तो समाधानी होईल व आस्तेकदम गरिबीतून बाहेर पडेल. या सीमित मुद्द्यावर हे अर्थशास्त्री गणिती पद्धतीने व जमल्यास प्रायोगिक पद्धतीने विश्लेषण करतात, तसेच काही तथ्याधारित उपयोगी उपाय मांडतात.

परंतु या विश्लेषणाची मोठी मर्यादा अशी की, गरिबी असूच नये किंवा गरिबी लादणाऱ्या विविध कारणांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समग्र रचनेची मांडणी इथे होत नाही. अन्य भाषेत मांडायचे झाल्यास, हे सीमित अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे शरीरातील एखादा अवयव नीट काम करीत नाही, म्हणून मर्यादित उपायांनी तो कार्यान्वित करायचा, परंतु समग्रपणे खोलात जाऊन त्या अवयवाला दुर्बळ करणाºया मोठ्या कारणांवर काम केल्यास त्या अवयवाची समस्या ही कायमची मिटेल आणि अन्य अवयवांनाही भविष्यात क्षती पोहोचणार नाही, असे दूरगामी उपाय शोधायला हवेत.  गरिबी लादणारी मोठी व सर्वव्यापी कारणे ही भ्रष्ट भांडवलशाहीत, जातीव्यवस्थेत, कामचुकार नोकरशाहीत, उद्दाम राजकारणात, नैसर्गिक साधनांच्या ºहासात, अंधश्रद्धांमध्ये, शिक्षणाच्या व संधींच्या अभावात दडलेली असतात.

अमेरिकन व युरोपीयन अर्थशास्त्री आजपर्यंत बाजार सार्वभौम आहे. बाजार योग्य-अयोग्य ठरवू शकतो. बाजार बक्षीस देतो वा दंडित करतो, या गृहितकावर आधारित संशोधन करीत आले. याउलट साम्यवादी देशातील (चीन, रशिया) अर्थशास्त्रींनी दुसरी टोकाची भूमिका मांडली़ सर्वकाही सरकार नावाची व्यवस्था ठरवेल. खासगी मालकी, उद्योजकता व संपत्तीप्रधान हेतू हे समाजविघातक असतात. या अतिरेकी साम्यवादी मांडणीमुळे उलट अनियंत्रित भांडवलशाही फोफावली. अमेरिकन अर्थशास्त्रीय विश्लेषणाची एक गंभीर मर्यादा म्हणजे तुकड्यांमध्ये केलेले अनेकांचे सूक्ष्म विश्लेषण हे नीटपणे एकमेकांशी जोडले जात नाही. गरिबीचा हाच बागुलबुवा वापरत श्रीमान ट्रम्प अमेरिकचे अध्यक्ष झाले.

बॅनर्जी साहेबांनी ज्या तिसºया जगातील गरिबीवरील छोटी-छोटी प्रक्रियात्मक उत्तरे शोधली आहेत, ती समस्यांचे एकूणच अक्राळविक्राळ स्वरूप पाहता तोकडी आहेत. गरीब देशांच्या सरकारांना हाताशी धरून तेथील संसाधनांची केलेली लूट, औषधांच्या अवास्तव किमती, ऊर्जेच्या अनिश्चित किमती, गरिबांना द्यावयाच्या सवलतींवरचे निर्बंध, मोठ्या उद्योगपतींना व कंपन्यांना दिलेल्या छुप्या सवलती. जटिल समस्यांची समग्र व टिकाऊ उत्तरे शोधणे आम्हास शक्य आहे. यासाठी राजकीय व प्रशासकीय अर्थकारणाकडून आम्हाला सामाजिक अर्थकारणाकडे जावयास हवे. यासाठीचे उद्देश, ढाचे, प्रक्रिया, परिमाणे आणि विविध घटकांच्या भूमिका काळजीपूर्वक व कल्पकतेने ठरवायला हव्यात.

भारतीय अर्थव्यवस्था ही आज विस्कळीत झालेली आहे, हे दुर्दैवी वास्तव आहे. चातुर्वर्ण्यव्यवस्थेचे लागलेले दीर्घकालीन ग्रहण आजही गेलेले नाही. किंबहुना, स्पर्धात्मक राजकारणात चातुर्वर्ण्यांचा अनिर्बंध वापर आज प्रचंड वाढला आहे. अगदी कार्लमार्क्सपासून ते लॉर्ड केन्ससारख्या दिग्गज अर्थशास्त्रींना आमचे हे चातुर्वर्णीय गौडबंगाल माहीत नव्हते. आमची अर्थव्यवस्था ही विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांप्रमाणे सरळ रेषेत जाणारी नाही. तिचे अंत:प्रवाह अनेक आहेत नि म्हणून तिच्या अंत:प्रेरणासुद्धा बºयाच आहेत. आमचे म्हणून जे सत्व आहे, ते बहुजनांच्या कार्यकलापात दडलेले आहे.

बहुजनांकडे आमचे गंभीर दुर्लक्ष होते आहे. यामुळेच आमच्या अर्थव्यवस्थेचे संतुलन बिघडले आहे. आमच्या अर्थकारणाची जवळपास सर्व नऊ घरांची मांडणी (3 * 3) कमजोर झाली आहे. शेती, सेवाक्षेत्र व उत्पादन क्षेत्र एका बाजूला आणि दुसºया बाजूला मोठे खासगी उद्योग, लघुउद्योग व सार्वजनिक उद्योग, असे ‘नवघर’ आम्ही असंतुलित करून ठेवले आहेत. यासाठी ‘एकात्म मानवतावादा’च्या सुस्पष्ट प्रक्रिया, परिमाणे व भूमिका ठरवायला हव्यात. बॅनर्जी यांना जाहीर झालेल्या नोबेल पुरस्काराच्या निमित्ताने ही संक्षिप्त चर्चा इथे आपण करतो आहोत, हेही नसे थोडके!

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाAmericaअमेरिका