शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
5
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
6
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
7
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
8
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
9
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
10
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
11
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
12
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
13
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
14
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
15
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
16
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
17
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
18
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
19
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
20
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

बा बळीराजा, तू जन्मजात पराभूत!

By admin | Updated: August 30, 2016 05:06 IST

यवतमाळहून बातमी आली की, कर्जबाजारीपणा आणि निसर्गाने दिलेल्या तडाख्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी बापलेकांनी, शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाच वेळी आत्महत्त्या केली

यवतमाळहून बातमी आली की, कर्जबाजारीपणा आणि निसर्गाने दिलेल्या तडाख्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी बापलेकांनी, शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाच वेळी आत्महत्त्या केली. अवघी सहा एकर शेती, मोठे कुटुंब, तीन वर्षांपासून नापिकी, या वर्षी अतिवृष्टीचा फटका, डोक्यावर सेवा सहकारी सोसायटी व सावकाराचे कर्ज, स्वत:सकट लेकाचे आजारपण, अशा चोहो बाजूनी उभ्या ठाकलेल्या नैराश्याच्या डोंगरापुढे हात टेकून, काशीराम मुधळकर यांनी मुलगा अनिलसह मरण जवळ केले. त्यांच्या आत्महत्त्येच्या दुसऱ्याच दिवशी, सर्वोच्च न्यायालयाने दही हंडीसाठीची २० फुटांची मर्यादा वाढविण्यास नकार दिल्याची बातमी आली आणि लगेच अवघा महाराष्ट्र दही हंडीवरील चर्चेत आकंठ बुडाला. निवडणूक आली की हटकून ‘बळीराजा’ची आठवण येणाऱ्या एकाही राजकीय नेत्याला, दहीहंडीच्या उंचीवरील मर्यादेपेक्षा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बापलेकाची आत्महत्त्या चर्चेयोग्य वाटली नाही. बापलेकानी विचारविनिमय करून हा निर्णय घेतला असावा का? की आधी बापाने गळफास घेतला आणि ते दृश्य बघून हादरलेल्या मुलानेही बापाशेजारीच स्वत:ची मान फासात अडकवली? की याच्या नेमके उलट झाले असावे? कोणत्याही संवेदनशील मनास पडावे असे हे प्रश्न, एकाही राजकीय नेत्याला पडल्याचे दिसले नाही; कारण घटनेस तीन दिवस उलटून गेल्यावरदेखील एकाही पदारुढ राजकीय नेत्याने मुधळकर कुटुंबास भेट देण्याची तसदी घेतली नाही. राज्य पातळीवरील नेत्यांचे सोडून द्या; पण किमान जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदारांनाही, त्या निराधार, सैरभैर झालेल्या कुटुंबाच्या पाठीवरून सहानुभूतीचा हात फिरवावासा वाटू नये? याला कोडगेपणा म्हणावे, की निगरगट्टपणा? साधारणत: १९९० च्या दशकात शेतकरी आत्महत्त्यांचे सत्र विदर्भात सुरू झाले आणि २५ वर्षे उलटली तरी थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. काही तुरळक अपवाद वगळता या वर्षी विदर्भात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. सुदैवाने किडीचाही प्रादुर्भाव झालेला नाही. आणखी काही दिवस निसर्गाचा वरदहस्त असाच राहिल्यास, या वर्षी गेल्या तीन वर्षांची कसर भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात पल्लवित झाली आहे. या आशादायक पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्त्यांच्या दरात घसरण अभिप्रेत होती; पण प्रत्यक्ष चित्र वेगळेच आहे. एकट्या अकोला जिल्ह्यातच आॅगस्ट महिन्यात दहा शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला. गत तीन महिन्यातील हा आकडा २८ आहे. का निर्माण होत असावी ही टोकाची नैराश्याची भावना? आपले ‘अच्छे दिन’ कधी येऊच शकत नाहीत, हा प्रकांड विश्वास कोठून येत असावा? अवघ्या काही दिवसांपूर्वी ग्राहकाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याला, अवघा पाच पैसे किलोचा भाव मिळतो, तूर निघण्यापूर्वीच तूर डाळीचे भाव कोसळू लागतात, तेव्हा पुढील चित्र शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर लख्ख उभे राहते अन् मग तो टोकाचा निर्णय घेतो. चांगले उत्पादन झाल्याने, उत्पन्न वाढत नाही आणि ‘अच्छे दिन’ तर मुळीच येत नाहीत, हे जेव्हा स्पष्ट होते, तेव्हा शेतकऱ्यासमोर दुसरा कुठला मार्गच शिल्लक उरलेला नसतो; कारण तो साठेबाजी करून बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करू शकत नाही, की मागणीपेक्षा पुरवठा कमी ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक उत्पादन घटवू शकत नाही! ...अन् जेव्हा नैसर्गिकरीत्या उत्पादन घटते, तेव्हाही मागणी व पुरवठ्याच्या सिद्धांताचा लाभ त्याच्या पदरात कधी पडतच नाही! त्याचा जन्मच मुळी निसर्ग, सरकार, व्यापारी, ग्राहक, सगळ्यांकडून मार खाण्यासाठी झालेला असतो. त्याच्यावर जन्मत:च पराभूत होण्याचा शिक्का बसलेला असतो. - रवी टाले