शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
5
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
6
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
7
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
8
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
9
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
10
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
11
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
12
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
13
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...
14
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
15
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
16
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
17
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
18
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
19
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
20
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!

आईच्या डॉक्टरला कोर्टात खेचणारी एव्ही; कोर्टानं दिली लाखो रुपयांची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 09:19 IST

इतर मुलं त्या वयाला जे सहजगत्या करतात ते आपलं मूल करू शकत नाही, कदाचित कधीच करू शकणार नाही, या सत्याशी जुळवून घेणं यातच अनेक वर्षं निघून जातात.

ज्यांची आईवडील होण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना आईवडील होण्याची चाहूल लागलेली आहे, अशा जगातल्या तमाम भावी पालकांची एकच तीव्र इच्छा असते : जन्माला येणारं मूल सुदृढ आणि अव्यंग असू दे. कारण कुठलंही व्यंग असलेलं मूल वाढवणं आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहील इतकं त्याला सक्षम करणं हे कल्पनाही करता येणार नाही इतकं कठीण काम असतं. ते साध्य करताना मुख्यतः आईवडील आणि इतरही कुटुंबीयांचा अक्षरशः कस लागतो, तोही वर्षानुवर्षं.

इतर मुलं त्या वयाला जे सहजगत्या करतात ते आपलं मूल करू शकत नाही, कदाचित कधीच करू शकणार नाही, या सत्याशी जुळवून घेणं यातच अनेक वर्षं निघून जातात. त्यात रोज येणाऱ्या व्यावहारिक अडचणी, आर्थिक ताण-तणाव, अशा मुलांसाठी लागणारं विशेष शिक्षण, लोकांच्या चित्रविचित्र नजरा, आपल्या मुलाला समाजाने नॉर्मल म्हणून स्वीकारावं यासाठी केली जाणारी धडपड आणि ते होत नाही हे लक्षात आल्यावर पालकांची होणारी तडफड असे अनेकानेक पदर एका घटनेने पालकांच्या आयुष्यात उलगडत जातात. काही पालक नाईलाज म्हणून, तर काही खरोखर मनापासून आयुष्याने त्यांना दिलेलं हे आव्हान पेलत राहतात. यातही सतत मुलाबरोबर राहणं, त्याची काळजी घेणं, सगळं आयुष्य त्याच्या वेळापत्रकाला बांधून घेणं, स्वतःसाठी कुठलाही वेळ न मिळणं या आघाड्यांवर आई पालकांची फार जास्त कुचंबणा होते. शिवाय, “गरोदरपणात तूच काळजी घेतली नसशील.” या आरोपालाही त्यांना सतत तोंड द्यावं लागतं.

मात्र, या सगळ्यात गरोदरपणात आईला तिच्या डॉक्टरने चुकीचा वैद्यकीय सल्ला दिला असेल तर? डॉक्टरचं चुकीचं म्हणणं ऐकून त्याप्रमाणे वागल्यानंतर त्या मुलात व्यंग असेल तर? अशा वेळी डॉक्टरला त्यासाठी कोणीही जबाबदार धरत नाही. लोक स्वतःच्या नशिबाला दोष देतात आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायच्या मागे लागतात. पण, या सगळ्या प्रकारात त्या मुलांचं काय होतं? डॉक्टरच्या चुकीची शिक्षा आयुष्यभर भोगणाऱ्या मुलांनी काय करावं? 

तर इंग्लंडमधल्या एव्ही टूम्बज नावाच्या एका विशीतल्या तरुण मुलीने तिच्या आईच्या डॉक्टरवर केस केली आणि न्यायालयाने तिला लाखो रुपयांची भरपाईही दिली. त्या मुलीला स्पायना बिफीडा नावाचा आजार आहे. हा आजार बाळाला आईच्या पोटात असताना होतो. या आजारात बाळाच्या पाठीचा कणा आणि मज्जारज्जू यांची वाढ व्यवस्थित होत नाही. त्यामुळे बाळाला अनेक प्रकारच्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो. काही जण मोठे झाल्यावर बऱ्यापैकी नॉर्मल आयुष्य जगू शकतात, तर काहींना संपूर्ण आयुष्य व्हीलचेअरवर बसूनच काढावं लागतं.

स्पायना बिफीडा हा आजार बाळाला होऊ नये यासाठी गरोदरपणात मातेने नियमितपणे फॉलिक ऍसिड घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. फॉलिक ऍसिडमुळे स्पायना बिफीडा हा आजार होण्याची शक्यता अतिशय कमी होते. १९९२ सालापासून अमेरिकेतील सर्व गरोदर मातांनी रोज ४०० मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड घ्यावं असं सरकारने सुचवायला सुरुवात केली. हे रेकमेंडेशन गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या मातांनाही लागू करण्यात आलं, जेणेकरून गर्भधारणेच्या आधीपासून मातेने पुरेशा प्रमाणात फॉलिक ऍसिड घेतलेलं असेल.असं असतानाही एव्ही टूम्बजच्या आईच्या डॉक्टरने मात्र तिला असं सांगितलं, की तिचा आहार जर व्यवस्थित असेल, तर तिने फॉलिक ऍसिड घेण्याची आवश्यकता नाही. त्याप्रमाणे तिने ते घेतलं नाही. त्या गरोदरपणातून जन्माला आलेल्या एव्हीला स्पायना बिफीडा हा आजार होता. आज एव्हीला या आजारामुळे दिवसचे दिवस वेगवेगळ्या नळ्या शरीराला टोचून काढावे लागतात. तिने त्या डॉक्टरवर चुकीचा वैद्यकीय सल्ला देण्याबद्दल केस केली. तिचं म्हणणं असं आहे, की त्या डॉक्टरने जर तिच्या आईला हे सांगितलं असतं, की फॉलिक ऍसिड घेणं अत्यावश्यक आहे, तर तिच्या आईने मातृत्वाचा विचार थोडा उशिरा केला असता. मात्र, त्या चुकीच्या सल्ल्यामुळे एव्हीला नॉर्मल आयुष्य जगता येत नाही.या खटल्यातील विशेष बाब अशी की,  न्यायालयाने एव्हीचं म्हणणं ग्राह्य धरून  डॉक्टरने तिला नुकसानभरपाई द्यावी, असा निकाल दिला आहे. हा निकाल अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. अशा प्रकारच्या केसमध्ये चुकीचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरला शिक्षा झालेला हा पहिलाच निकाल आहे. या तुलनेत भारतातली परिस्थिती अजूनही फारच प्राथमिक अवस्थेत आहे, हे मान्य करावंच लागेल. रुग्णाचा जीव आणि  रुग्णाचे हक्क याबाबत अजूनही आपल्या देशात पुरेशी जागृती  आलेली नाही.

बाळाच्या व्यंगाबद्दल डॉक्टरला शिक्षाही अशा प्रकारच्या केसेसमध्ये मानवी दृष्टिकोन बाळगण्याची सुरुवात  ठरेल, अशी आपण आशा जगभरात व्यक्त केली जाते आहे. गर्भात गंभीर व्यंग आहे हे दिसत असूनही गर्भपात करता न आल्यामुळे अशा मुलाला जन्म द्यावा लागणं किंवा त्या गरोदरपणात कॉम्प्लिकेशन्स होऊन माता मृत्यू होणं हे पुढारलेले म्हणवणाऱ्या देशातही अजूनही सर्रास घडतं. हा सगळाच अमानवीपणा थांबवण्याच्या दृष्टीने एव्हीच्या उदाहरणाने महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे, हे मात्र नक्की!