शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दृष्टिकोन - धर्मादाय संस्थांच्या अंशदानाबाबतचे समज आणि गैरसमज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 06:28 IST

१९५0 चा मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था कायदा अस्तित्वात येण्याआधी स्वातंत्र्यपूर्व काळात विविध संस्थाने होती. त्यांचे तसेच विविध समाजाचे विविध संस्थाकायदे व नियम होते.

अनिलकुमार शाह

धर्मादाय संस्थांकडून धर्मादाय आयुक्त कार्यालय संस्थांच्या उत्पन्नावर अंशदान जमा करत होते. याविषयी प्रचंड गैरसमज आहेत असे दिसून येते. हे गैरसमज दूर होण्याची गरज आहे.

१९५0 चा मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था कायदा अस्तित्वात येण्याआधी स्वातंत्र्यपूर्व काळात विविध संस्थाने होती. त्यांचे तसेच विविध समाजाचे विविध संस्थाकायदे व नियम होते. त्या सगळ्याच कायद्यांचा एकमेकांशी ताळमेळ नव्हता. त्यामुळे भारतभर सार्वजनिक संस्थांच्या प्रशासन व व्यवस्थापन या प्रश्नांचा एकत्रित विचार करून उपाययोजना करणे गरजेचे झाले होते. सरकारने या प्रश्नांचा एकत्रित अभ्यास करून उपाय सुचवण्यासाठी तेव्हाचे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली १५ जानेवारी १९४८ रोजी एक समिती नेमली. त्यांनी त्यांच्या सूचनांचा एकूण १७ भागांचा विस्तृत अहवाल सरकारला दिला. तो विधिमंडळापुढे ठेवून एक सर्वंकष कायदा बनवण्यात आला व तो नागरिकांच्या, जाणकारांच्या अभ्यासासाठी जाहीर करण्यात आला. त्यावर आलेल्या सर्व सूचना व दुरुस्त्या विचारात घेऊन मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था कायदा १९५0 चा अंतिम मसुदा बनला. त्याला राष्ट्रपतींची स्वीकृती ३१ मे १९५0 ला मिळाली व १४ आॅगस्ट १९५0 च्या राजपत्रात (भाग ४) मध्ये तो प्रसिद्ध करण्यात आला.

सार्वजनिक विश्वस्त संस्था ज्यांनी दान देऊन निर्माण केल्या त्यांच्या पश्चात त्या संस्था आणि त्यांच्या मालमत्ता नंतरच्या विश्वस्तांनी त्या संस्था निर्माण झाल्या त्या कारणांसाठीच उपयोगात आणल्या पाहिजेत आणि अशा संस्थांच्या उद्देशांसाठीच त्या चालवल्या गेल्या पाहिजेत, यावर देखरेख ठेवणे, हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे, असे थोडक्यात म्हणता येईल. या कायद्यानुसार राज्यातील सर्वच सार्वजनिक संस्थांसाठी एक व्यवस्था तयार झाली. या सगळ्या व्यवस्थेचा खर्च कसा करायचा याची तरतूदही याच कायद्यात करण्यात आली. त्याप्रमाणे कलम ५८ प्रमाणे संस्थांनी त्यांच्या नक्त उत्पन्नाच्या २ टक्के अंशदान फी (कर नव्हे) म्हणून धर्मादाय आयुक्त कार्यालयाला द्यावे. त्यातून त्यांच्या कार्यालयाचा खर्च चालेल, अशी ही व्यवस्था आहे.

ही फी आहे. कुठल्याही प्रकारचा कर नव्हे. फी म्हणजे व्यवस्थेचा खर्च चालवण्याइतकीच रक्कम लोकांकडून जमा करणे. सेवा देण्यासाठी लागेल तितकाच फी वसुलीचा अधिकार आहे. व्यवस्थेचा खर्च वजा जाता खूप बाकी उरत असेल तर याचा अर्थ अंशदानाची रक्कम कमी करायला हवी. त्याहीपुढे जाऊन जर अशी खूप रक्कम जमली असेल आणि त्याचा विनियोग करता येत नसेल तर ही फी जमा करणे थांबवायला हवे. कर असेल तर मात्र तो सरकारला कोणत्याही कामासाठी वापरता येतो, तसेच त्यासाठी काही खर्च झालाच पाहिजे, असाही नियम नाही. कर जमा करण्यासाठी त्याबदल्यात काही सेवा द्यायला हवी अशी काही सक्ती नसते. तसेच तो जबरी वसूल करता येतो. कायद्यातील कलम ५८ नुसार सरकारला कुणाकडून किंवा कोणत्या संस्थेकडून अंशदान घेऊ नये हे ठरवण्याचे अधिकार आहेत.२00७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयापुढे एक जनहित याचिका दाखल झाली. त्यात अंशदान थांबवायला हवे आणि तसे आदेश धर्मादाय आयुक्त यांना द्यायला हवे ही त्यात मागणी आहे. यानंतर दोन संस्थांनी रीट याचिका त्याच कारणासाठी दाखल केल्या. या सर्वांची एकत्रित सुनावणी सुरू आहे आणि त्याचा अद्याप निकाल आलेला नाही. धर्मादाय आयुक्तांकडे या कलमाखाली जमा केलेल्या रकमेच्या फंडात मुंबई उच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या शपथपत्राप्रमाणे खर्च वजा जाता रु. २४८ कोटी इतकी रक्कम पडून आहे.उच्च न्यायालयाने विचारलेल्या फंडाच्या विनियोगाचा काहीही खुलासा सरकारतर्फे वारंवार संधी देऊनही सादर करण्यात आलेला नाही. ही चालढकल पाहून मुंबई उच्च न्यायालयाने, अतिशय कडक ताशेरे ओढत या खटल्याचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही संस्थेकडून अंशदान वसूल करता येणार नाही, असे अंतरिम आदेश २५ सप्टेंबर २00९ रोजी दिलेले आहेत. तेव्हापासून आतापर्यंत कोणतेही स्पष्टीकरण सरकारने अद्याप दाखल केलेले नाही. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील कोणत्याही संस्थेकडून धर्मादाय आयुक्त कार्यालयाला अंशदान वसूल करता येणार नाही. सबब कोणत्याही संस्थेस कुणीही तोंडी वा लेखी काहीही सांगितले तरी वस्तुस्थिती वरीलप्रमाणे आहे. 

(लेखक लेखापाल आहेत)

टॅग्स :MumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालय