शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

केजरी‘वाल’, केजरी‘वाद’ आणि केजरी‘वाले’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 08:30 IST

तुम्ही खाता तेच खाणारा, तुमच्यासारखाच जगणारा नेता म्हणून तुम्ही तुमच्यातल्याच एकाला (म्हणजे मला) निवडा- हाच त्यांचा ‘मेसेज’ होय !

प्रभू चावलाज्येष्ठ पत्रकार 

विचारसरणी हीच कोणत्याही राजकीय नेत्याची मुख्य ओळख असते. पण क्वचित केव्हातरी एखादा अगम्य राजकारणी  आपण स्वत:च आपली एकमेव विचारसरणी बनून अवतरतो. चौकड्यांचा ढगळ शर्ट, विरळ मिशी आणि बुजरे हास्य अशा अवतारातले दिल्लीचे चष्माधारी खट्याळ बाळ - अरविंद केजरीवाल हे  विचारसरणीचा पत्ता नसलेल्या अशा राजकारण्याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. एका विचित्र राजकीय कॉकटेलमुळे केजरीवाल तिहारवासी बनले होते. आता ते आपल्या  धडाकेबाज पुनरागमनाचा लाभ उठवत आहेत. अतिशी यांना मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर तात्पुरतं बसवून ते ‘अतिसामान्य रुपातील असामान्य’ या  आपल्या मूळ पीठावर पुन्हा परतलेत. नव्या अवतारात त्यांचा स्वर अधिक धारदार झालाय. त्यांच्या आक्रमकतेचा सगळा रोख मोदी आणि काँग्रेसवर आहे.   अण्णा हजारे नावाचा शोध लावून झाल्यानंतर केजरीवालांची  नवी  राजकीय शोधयात्रा सुरू झाली ती आत्मशोधाची.  केजरीवाल आणि फक्त केजरीवाल सोडून काहीच सापडले नाही त्यांना आपल्या शोधयात्रेत. आपल्याला बळी बनवले जात असल्याची जोरदार आरोळी ठोकणे, नैतिकतेच्या झेंड्याचा सदैव फडफडाट करणे, मस्तकावर नवस्वातंत्र्यसैनिकाची टोपी मिरवणे - हे सगळे त्यांनी केले. नानाविध क्लृप्त्या वापरून त्यांनी आपल्या  मतपेटीची वीण गुंफली. 

दिल्लीला लाखलाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याची भाषा केजरीवाल करत नाहीत, एआय किंवा अन्य तंत्रज्ञानाच्या लंब्याचौड्या बाता फेकत नाहीत; त्याऐवजी ते आपली स्वत:चीच ओळख उगाळतात.   चतुर शब्दबाजीतून सामुदायिक सहमती साधू इच्छितात : तुमच्यासारखाच असणारा, तुम्ही खाता तेच खाणारा, तुमच्यासारखेच कपडे घालून तुमच्यासारखेच जगणारा नेता  तुम्ही निवडायला हवा. तुमचा नेता म्हणून तुमच्यातल्याच एकाला निवडा- असा त्यांचा ‘मेसेज’ असतो. २०१४ ला मोदी भक्तांची लाट उसळली होती. त्यानंतर जात, समुदाय यांच्या भिंती ओलांडून केजरीवाल यांच्या मतदारांची दुसरी लाट आली. या सैन्याने   दिल्लीच्या दोन्ही आणि पंजाबच्या एका निवडणुकीत मोदींच्या यंत्रणेचा जबरदस्त पाडाव केला. 

सध्या  ‘केजरी’वाद ही एक मिश्र लोकानुनयी विचारसरणी बनली आहे.  गांधीवाद, मार्क्सवाद, समाजवाद किंवा भांडवलवादाला असते तशी निश्चित रूपरेखा या विचारसरणीला नाही. बदल हवा, प्रत्यक्ष  काम करणारे  सरकार हवे यासाठी  आकांत करणाऱ्या नवशिक्यांचा पक्ष बांधून लगेच सत्तेवर येणारे केजरीवाल हे बहुदा पहिले भारतीय नेते असावेत. मोफत वीज, मोफत पाणी, परवडणारी आरोग्य व्यवस्था आणि जागतिक दर्जाची सार्वजनिक शिक्षण व्यवस्था हाच केजरीनामा आहे. मोफत सेवापुरवठ्याचा त्यांचा हा नमुना आता सगळ्याच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याचे अविभाज्य अंग बनला आहे. 

ते कट्टर हिंदू आहेत. नियमितपणे हनुमान मंदिरात जातात. त्याचवेळी आपण  धर्मनिरपेक्ष हिंदू असल्याची ग्वाहीही देतात. त्यांनी ‘आप’ला आपले मानणाऱ्या स्वयंसेवकांची एक फौज तयार केली आहे. दिल्लीच्या गल्लीगल्लीतील झोपडपट्ट्यांत, अल्पसंख्यांकांच्या वस्त्यांत ही फौज सर्वत्र आढळते. पारंपरिक राष्ट्रीय पक्षांनी आपली फसवणूक केल्याचा राग या स्वयंसेवकांच्या मनात धुमसत असतो. अतिशय दर्जाहीन सोयी आणि गचाळ आरोग्य व्यवस्था असलेल्या नागरी वस्त्यांत  राहत असल्यामुळे त्यांना अधिक चांगल्या सार्वजनिक सेवांची, परवडणाऱ्या वीज-पाण्याची, दवाखान्यांची तीव्र आस आहे. या स्वयंसेवकांमध्ये उच्चतर नागरी वातावरणात वाढलेले ऱ्होड्स  स्कॉलर्ससुद्धा आहेत. आरंभीच्या काळात प्रतिभा आणि संसाधनांची कुमक ‘आप’ला अनिवासी भारतीयांकडूनच मिळाली होती. तुरुंगवासाच्या काळात माणसाची कसोटी लागते. केजरीवाल त्या कसोटीला पुरेपूर उतरलेत. आपले क्षितिज ते आता विस्तारू पाहत आहेत. मुख्यमंत्री पदापलिकडे झेपावत, राष्ट्रीय मैदानातील व्यक्ती केंद्रित लोकसभा निवडणुकीत  पर्याय बनण्याची त्यांची इच्छा आहे.  दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ५५ टक्के मते आणि ७० पैकी ६७ जागा मिळवून त्यांनी इतिहास घडवला. त्यानंतर त्यांनी आपले क्षेत्र विस्तारले. गेल्या दहा वर्षांत एकूण १५ राज्यांत ‘आप’ने विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या. त्यापैकी अनेक राज्यांत त्यांना खातेसुद्धा खोलता आले नाही. पण एक मुद्दा मात्र केजरीवालांनी अधोरेखित केला : ‘ मला हरवता येईल, पण माझ्याकडे दुर्लक्ष मात्र कुणालाच करता  येणार नाही.’ 

एका मुलाखतीदरम्यान केजरीवाल म्हणाले होते, ‘आम्ही सामान्य माणसे आहोत. आमच्या समस्यांची उत्तरे आम्हाला डाव्या विचारसरणीतून मिळाली तर  आम्ही ती त्यांच्याकडून घेऊ. उजवीकडून मिळाली तर तिथूनही ती तेवढ्याच आनंदाने स्वीकारू.’ ‘आप’ला राष्ट्रीय पक्ष बनवणे हे केजरीवालांचे प्राथमिक उद्दिष्ट होते, ते २०२३ ला साध्य झाले. इतर छोट्या पक्षांप्रमाणे ‘आप’पाशी भौगोलिक सीमांनी आखलेली जहागीर नाही. कुणी महाबलाढ्य पुरुष किंवा स्त्रीच्या अंमलाखालील अन्य कोणताच प्रादेशिक  पक्ष अशी पुढची  पातळी गाठू शकलेला नाही हाच आप आणि इतर पक्षांतील फरक आहे.  

व्यक्तिगत  महत्त्वाकांक्षांच्या भाऊगर्दीमुळे शिखराकडे जाणारा रस्ता ठप्प झालेला असतो याची जाणीव  केजरीवालांना आहे. म्हणूनच  स्वतंत्र ओळख असलेली आपली बँडवॅगन राष्ट्रीय निवडणुकीच्या महामार्गावर त्यांनी  ‘इंडिया’ आघाडीच्या ओम्नी बसमध्ये ढकलली आहे. आपली जागा चालकाच्या अगदी जवळच राहील अशी दक्षता मात्र ते जरुर घेतात. 

केजरीवालांच्या शैलीतील अस्मितेच्या राजकारणात ‘नव समाजवाद’ सोडून तीन गोष्टी खऱ्याखुऱ्या महत्त्वाच्या ठरतात : केजरीवाल, केजरीवाद आणि  केजरीवाले !

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली