शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लेख: जगभरातल्या लोकांना ‘पॉडकास्ट’ इतकी का आवडतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 11:08 IST

२०२४ मध्ये पॉडकास्ट उद्योगाचे जागतिक उत्पन्न अंदाजे ७.३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले होते. २०३० पर्यंत ही  बाजारपेठ १३० अब्ज डॉलर्स मूल्याची असेल!

साधना शंकरलेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारीपुस्तकांवर बेतलेले चित्रपट किंवा वेब सिरीज आजवर भरपूर आले. मात्र, अलीकडे यशस्वी आणि रंजक ‘पॉडकास्ट्स’चे चित्रपटांमध्ये किंवा विविध कार्यक्रमांमध्ये रूपांतर करण्याचा नवा प्रवाह आकार घेत आहे. ‘द ड्रॉपआउट’, ‘वीक्रॅश्ड’ आणि ‘द थिंग अबाऊट पॅम’ यांसारखे काही लोकप्रिय ‘शो’ त्याच नावाच्या ‘पॉडकास्ट्स’वर आधारित आहेत. ‘पॉडकास्ट्स’नी प्रचंड लोकप्रियता मिळवली असून, त्यांनी पॉप संस्कृतीला नवे वळण दिले आहे. पॉडकास्ट ऐकणारा वर्ग सर्व वयोगटांतील असला, तरी त्यांचा कणा तरुण श्रोत्यांचा आहे.

या शतकातील बहुतांश नव्या घडामोडींप्रमाणेच, येथेही सुरुवात तंत्रज्ञानानेच केली. डच एमटीव्ही व्हिडीओ जॉकी ॲडम करी आणि सॉफ्टवेअर विकसक डेव्ह विनर यांनी २००३ मध्ये एकत्र येऊन एक तंत्रज्ञान विकसित केले, ज्यामुळे इंटरनेटवर उपलब्ध होताच ऑडिओ फाइल्स आपोआप डाउनलोड होऊ लागल्या. पत्रकार क्रिस्टोफर लायडन यांच्या राजकारण आणि संस्कृतीविषयक ‘ओपन सोर्स’ (२००३) या कार्यक्रमाला पहिला पॉडकास्ट मानले जाते. ‘पॉडकास्टिंग’ हा शब्द फेब्रुवारी २००४ मध्ये बेन हॅमर्सली यांनी प्रथम वापरात आणला. २००५ मध्ये स्टीव्ह जॉब्स यांनी या माध्यमातील संधी ओळखून आयट्यून्स या आपल्या प्लॅटफॉर्मवर पॉडकास्ट्सना समर्थन देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर या माध्यमाने मागे वळून पाहिलेच नाही. आज प्रत्येक विषयावर पॉडकास्ट उपलब्ध आहेत. सेलिब्रिटी, पत्रकार, इन्फ्लुएन्सर्स आणि उद्योजक पॉडकास्ट चालवतात, त्यात सहभागी होतात. ब्रँड उभारण्यासाठी हे प्रभावी माध्यम आहे.

हे माध्यम इतके लोकप्रिय होण्यामागचे कारण काय?

आपल्या आवडीच्या कोणत्याही विषयावर, कधीही ऐकता येणारे ऑडिओ हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. रेडिओप्रमाणेच स्वयंपाक करताना, वाहन चालवताना, बागकाम करताना अशा इतर कामांबरोबर ते सहज ऐकता येते. पारंपरिक चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांच्या तुलनेत पॉडकास्ट बनवणे सोपेही आहे. एक माइक, ध्वनिरोधक खोली आणि रंजक विषय एवढ्याच साधनांवर कोणीही पॉडकास्टर होऊ शकतो.

अहवालांनुसार, २०२४ मध्ये पॉडकास्ट उद्योगाचे जागतिक उत्पन्न अंदाजे ७.३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले. २०३० पर्यंत या बाजारपेठेचा आकार ३० अब्ज ते १३० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  भारतासारख्या बाजारपेठांमध्ये श्रोत्यांची वाढती संख्या आणि जाहिरातदारांची वाढती गुंतवणूक यामुळे ही वाढ होत आहे. देशातील स्मार्टफोन वापरकर्त्यांचा वाढता विस्तार आणि समृद्ध मौखिक परंपरा लक्षात घेता, ही बाजारपेठ झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. गोल्डन ग्लोब २०२६ पुरस्कारांमध्ये ‘गुड हँग’ या पॉडकास्टला सर्वोत्तम पॉडकास्टसाठी पहिलावहिला पुरस्कार देण्यात आला, ज्यामुळे या माध्यमाच्या आगमनाची अधिकृत दखल घेतली गेली.

मात्र, व्हिडीओ माध्यमाने पॉडकास्टच्या बाजारपेठेतील काही हिस्सा काबीज केला आहे. ‘व्हॉडकास्ट्स’ म्हणून ओळखले जाणारे हे स्वरूप हळूहळू लोकप्रियतेचा नवा केंद्रबिंदू ठरत आहे. यूट्यूबवरील व्हॉडकास्ट्स लोकप्रियतेत पॉडकास्ट्सची जागा घेत आहेत. नेटफ्लिक्ससारखे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मही आता व्हॉडकास्ट्स प्रदर्शित करू लागले आहेत. दरम्यान, यूट्यूबने पॉडकास्टसाठी व्हिडीओ निर्मितीची कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधने विकसित केली असून, स्पॉटिफायही व्हॉडकास्ट्सचे स्ट्रीमिंग करत आहे. लक्ष वेधून घेण्याच्या या अखंड स्पर्धेत अखेरीस कोणता माध्यमप्रकार विजयी ठरेल, हे सांगणे कठीण आहे; पण श्रोते, प्रेक्षक आणि ग्राहकांना गुंतवून ठेवण्यासाठी नवनव्या स्वरूपांची मालिका उदयास येतच राहील, हे मात्र नक्की!

English
हिंदी सारांश
Web Title : Why are podcasts so popular worldwide? A look into the trend.

Web Summary : Podcasts gained popularity due to accessibility and ease of production. The industry is projected to reach billions in revenue, driven by smartphone users. Vodcasts are emerging, with platforms adapting to video-based content. Competition for audience attention continues.
टॅग्स :Podcastsसखी टॉक्स