शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 07:49 IST

अमली पदार्थांची खरेदी-विक्री-वापर या धंद्याने गोव्याच्या पूर्ण किनारपट्टीला इतका घट्ट विळखा घातला आहे की, त्यात आता स्थानिकही ओढले गेले आहेत.

- सदगुरू पाटील (संपादक लोकमत, गोवा)गोव्यात नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण झाला. केवळ सोळा लाख लोकसंख्येच्या आणि ३७०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या चिमुकल्या प्रदेशासाठी दोन विमानतळ का हवे? असा प्रश्न पूर्वी विचारला जात असे, आता तो मागे पडला. आधुनिक सोयीसुविधांनी युक्त दिमाखदार मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाने एकूण एक कोटी प्रवासी हाताळले.

जगभरातील पर्यटक या विमानतळावर उतरतात. त्यांच्यासाठी गोवा हे एक शांत, निवांत आणि हिरवे स्वप्न. शांतता अनुभवण्यासाठी पर्यटक गोव्यात येतात आणि त्यांच्या पार्ध्यामध्ये 'जान' भरण्यासाठी जगाच्या विविध भागांतून अमली पदार्थ गोव्यात येतात. पोलिसांना हे मान्य आहे, छापासत्रे सुरू असतात; पण या धंद्याची पाळेमुळे खोदून काढणे राज्यातील यंत्रणेला शक्य झालेले नाही. 

गोव्यात ड्रग्ज माफियांकडून हजारो कोटींची समांतर अर्थव्यवस्था चालविली जात आहे. दक्षिण अमेरिकन राष्ट्रांमधून कोकेनसारखे अमली पदार्थ गोव्यात येतात. थायलंडसह अन्य भागांतूनही गोव्यात ड्रग्ज येऊ लागले आहेत. अलीकडेच गोव्यातील सर्वात मोठा ड्रग्ज साठा पोलिसांच्या क्राईम ब्रँचने पकडला. त्याआधी पोलिसांनी ४३ कोटी रुपयांचे कोकेन दक्षिण गोव्यातून जप्त केले. हा साठा थायलंडहून गोव्यात आणला गेला होता. त्यानंतर लगेच ११ कोटी ६७ लाख रुपयांचे अमली पदार्थ गोव्याच्या किनारी भागात आढळले. ११.६७२ किलोंची हायड्रोपोनिक केनाबीस मिळण्याची गोव्यातील पहिलीच वेळ. अत्यंत श्रीमंत ग्राहकांमध्ये हे विशिष्ट हायड्रोपोनिक केनाबीस ड्रग्ज (मारिजुआनाचे रूप) अधिक लोकप्रिय आहे.

या धंद्याने गोव्याच्या किनारपट्टीला इतका घट्ट विळखा घातला आहे की, त्यात आता स्थानिक देखील ओढले गेले आहेत. पूर्वी पोलिसांच्या छाप्यात ड्रग्जची खरेदी-विक्री करताना केवळ विदेशी नागरिक पकडले  जायचे. हिमाचल प्रदेश, काश्मीर, पश्चिम बंगाल, बंगळुरू, कुलू-मनाली येथील नागरिकही या धंद्यात सापडत. आता मात्र स्थानिक तरुणही पकडले जात आहेत. 

अलीकडे ड्रग्जप्रकरणी जेवढे संशयित किंवा गुन्हेगार पकडले गेले, त्यात ४० टक्के गोमंतकीय आहेत. वर्ष २०२३ मध्ये गोव्यात ड्रग्जशी निगडीत गुन्ह्यांमध्ये जेवढ्या व्यक्ती पकडल्या गेल्या, त्यापैकी २८ टक्के गोमंतकीय निघाल्या. वर्ष २०२२ मध्ये हाच आकडा २३ टक्के होता. वर्ष २०२४ मध्ये हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत वाढले. 

यावर्षी २०२५ मध्ये गेल्या काही महिन्यांत एकूण ६८ कोटींचे अमली पदार्थ पकडले आहेत. यावर्षी ६० व्यक्तींना अटक झाली, त्यातील २८ गोमंतकीय निघाले. सुशिक्षित गोव्यातील वाढती बेरोजगारी, कसिनो जुगाराच्या अड्यांचा झालेला विस्तार, अमर्याद पर्यटनवाढ यामुळे स्थानिक युवक ड्रग्ज विक्रीच्या नेटवर्कचा भाग बनू लागले आहेत. काही स्वयंसेवी संस्थांनीही आता यावर संशोधन, अभ्यास सुरू केला आहे. 

गोव्यातील ड्रग्ज धंद्याची वाढती व्याप्ती दाखविणारे चित्रपट मध्यंतरी येऊन गेले. गोवा विधानसभेनेही यापूर्वी चिंता व्यक्त करून 'आम्हाला उडता गोवा (उडता पंजाबच्या धर्तीवर) नको' अशी अपेक्षा व्यक्त केली होती. वापर व वाहतूक अशा दोन्ही कारणांस्तव गोव्यात अमली पदार्थांचा साठा पोहोचतो. वास्तविक गोव्यात कायदे कडक आहेत. यापूर्वी अनेक नायजेरीयन, इस्रायली नागरिक वगैरे कायमचे तुरुंगात पोहोचले आहेत.

गोव्यात इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल - आयोजित करण्यास दरवर्षी गोमंतकीय विरोध - करतात. कारण तिथे ड्रग्जचा वापर होतो असा संशय - आहे. दरवर्षी गोव्याच्या विविध भागांत अतिड्रग्जच्या - सेवनाने काहीजण मृत्युमुखीही पडतात. वर्ष २०२२ -मध्ये हरयानाच्या भाजप नेत्या व अभिनेत्री सोनाली फोगोट यांचा अतिड्रग्जच्या सेवनाने मृत्यू झाल्यानंतर - गोव्याची राष्ट्रीय स्तरावरही नाचक्की झाली होती; मात्र गोव्याने अजून धडा घेतलेला नाही. ड्रग्जचा वापर करून पार्ध्या तर सुरूच आहेत.sadguru.patil@lokmat.com