शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जेव्हा डोक्याला बाम चोळतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 06:53 IST

न्या. डी. वाय. चंद्रचूड अलीकडे म्हणाले, “...तो शेवटचा परिच्छेद वाचताना मी काय भोगले, हे सांगणेही कठीण!”- असे झाले काय नेमके?

नंदकिशोर पाटील, कार्यकारी संपादक, लोकमत -एखाद्या गुन्ह्यातील दोषींना न्यायालयाने शिक्षा सुनावली म्हणजे न्याय! पण, न्यायाची संकल्पना एवढी संकुचित नाही. ‘न्यायदान’ ही  समाजावर दीर्घकाळ परिणाम साधणारी व्यापक प्रक्रिया असते. त्यामुळेच त्याची प्रक्रिया सहज, सोपी, सुस्पष्ट असली पाहिजे. भारतासारख्या देशात तर न्यायदानाची प्रक्रिया जटिल असल्याने  न्यायदान सहज, सोपे आणि सुस्पष्ट असावे, अशी अपेक्षा असते. विशेषत: निकालपत्रातील भाषा, वाक्यरचना आणि शब्दांची निवड अचूक हवी. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निर्णयात असेच काहीसे झालेले दिसते. तो निकाल वाचताना डोक्याला बाम चोळावा लागला, अशी उद्विग्न प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी व्यक्त केली आहे. हिमाचल प्रदेशाच्या हायकोर्टाने दिलेल्या एका निर्णयावर सुप्रीम कोर्टात न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर  सुनावणी सुरू होती. न्या. शहा म्हणाले, “हायकोर्टाने दिलेला निर्णय आकलनापलीकडे आहे. निकालपत्रात मोठी-मोठी वाक्ये आहेत. ती वाक्ये कुठे सुरू होतात आणि कुठे संपतात याचा मेळच लागत नाही. विरामचिन्हेही चुकीच्या ठिकाणी वापरली आहेत. हा निर्णय वाचल्यानंतर मला माझ्या आकलनाचीच शंका येऊ लागली. निर्णय नेहमी सोप्या भाषेत लिहावा. जो सामान्य व्यक्तीला समजेल!”- तर न्या. चंद्रचूड म्हणाले, “हायकोर्टाच्या निर्णयातील शेवटचा परिच्छेद वाचल्यानंतर तर मला डोक्याला बाम लावावा लागला. मी सकाळी १०.१० मिनिटांनी हा निर्णय वाचायला घेतला आणि १०.५५ मिनिटांनी तो वाचून संपवला. हे वाचताना मी काय भोगले आहे, याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. माझी अवस्था वर्णन करण्याच्या पलीकडे होती!”  - हायकोर्टाचा निकाल वाचून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची अशी अवस्था झाली असेल तर सामान्य माणसाची काय गत? न्यायालयीन निकालपत्र हे ललित वाङ‌्मय नसते हे मान्य; परंतु  किमान ते दुर्बोध आणि संदिग्ध तरी असू नये.  महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून न्यायालयीन निकालपत्रांकडे पाहिले जाते. निकालपत्रात केवळ कायद्यातील कलमांचा अर्थ सुस्पष्ट करून भागत नाही, तर संदर्भासहित स्पष्टीकरणही अपेक्षित असते. आजवर अनेक न्यायाधीशांनी कालातीत ठरतील अशी अप्रतिम ‘जजमेन्ट्‌स’ लिहिली आहेत. रामजन्मभूमी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदी निवाड्यांत न्या. चंद्रचूड यांनी लिहिलेली निकालपत्रे वाचण्यासारखी आहेत. केशवानंद भारती, इंदिरा सहानी, शहाबानो, ट्रिपल तलाक आदी गाजलेल्या खटल्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निवाडे आजही तितकेच महत्त्वाचे मानले जातात, ते त्यातील अन्वयार्थामुळे.  न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी सांगत , उत्तम वकील होण्यासाठी कायद्याच्या ज्ञानाबरोबरच विपुल वाचन, चौफेर दृष्टिकोन, तारतम्य, संवेदनशीलता आणि चिकित्सक वृत्ती लागते! याप्रमाणे समजण्यास सोपे निकलापत्रे देण्यात आली तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनाच काय, सामान्य माणसालासुद्धा डोक्याला बाम चोळावा लागणार नाही. नाहीतरी, आयुष्यात कधीच कोर्टाची पायरी चढावी लागू नये, अशीच आपल्याकडे सर्वसाधारण धारणा असतेच.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय