शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
4
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
5
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
6
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
7
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
8
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
9
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
10
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
11
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
12
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
13
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
14
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
15
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
16
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
17
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
18
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
19
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
20
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष म्हणजे पैलवान आणि काडी पैलवान यांच्यातली कुस्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 05:49 IST

दुर्बल  आणि बलाढ्य शेजाऱ्यांची कुस्ती, २०२० साली इस्रायलनं पॅलेस्टाईनमधली ८५ टक्के जमीन बळकावली आहे. उरलेसुरले पॅलेस्टिनीही हुसकावून लावण्याची खटपट इस्रायल करीत आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमधे एक लघु युद्ध  पार पडलं. इस्रायलची सुमारे २० माणसं मेली. २२० पेक्षा अधिक पॅलेस्टिनी इस्रायलच्या क्षेपणास्त्रांचा बळी ठरले. गाझा दाट वस्तीचा प्रदेश आहे. एक इमारत जमीनदोस्त होते तेव्हा पाचपन्नास माणसं मरतात. त्यामुळं पॅलेस्टाईनमधे २२० माणसं मरणं ही गोष्ट नित्याची आहे. गाझामधून किंवा लेबनॉनमधून आलेली रॉकेटं हवेतल्या हवेतच छेदण्याची यंत्रणा इस्रायलकडं असूनही काही रॉकेटं इस्रायलमधे पोचून तिथल्या इमारती उद्‌ध्वस्थ होणं ही घटना  मात्र पहिल्यांदाच घडलेली,  इस्रायलला जागं करणारी आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष हा दोन असमान घटकांमधील संघर्ष आहे. इस्रायल बलदंड, पॅलेस्टाईन अगदीच किरकोळ! पॅलेस्टाईनला श्रीमंत अरब जगानं पाठिंबा दिला; पण शस्त्रं दिली नाहीत. इस्रायलला अमेरिका प्रभावी शस्त्रसामग्री देते, तीच सामग्री अमेरिका सौदीलाही पुरविते. सौदी पॅलेस्टाईनला पाठिंबा देतात; पण शस्त्रसामग्री देत नाहीत. त्यामुळंच इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष म्हणजे पैलवान आणि काडी पैलवान यांच्यातली कुस्ती!

या लघु युद्धात पॅलेस्टाईननं इतकी रॉकेटं कशी जमविली आणि इस्रायलवर डागली;  त्याचा पत्ता इस्रायलला कसा लागला नव्हता या गोष्टीचा शोध लागला तर इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाचं बदलतं रूप कळू शकेल. ससेहोलपटीचा बळी ठरलेल्या ज्यू लोकांना पॅलेस्टाईन या भूमीत ब्रिटन-अमेरिका इत्यादींनी  १९४८ मधे इस्रायल नावाचा एक नवीन देश तयार करून दिला. तेही सुखासुखी घडलेलं नाही. स्थानिक पॅलेस्टिनी लोकांना अत्यंत क्रूरपणे त्यांच्या घराबाहेर काढून त्यांची घरं, जमिनी इत्यादी गोष्टी ज्यूनी बळकावल्या. जर्मनी, पोलंड, रशिया इत्यादी ठिकाणी ज्यूना फार क्रूरपणे वागवलं गेलं. त्याचा  वचपा ज्यूनी पॅलेस्टिनी लोकांना क्रूरपणे वागवून काढला. ज्यू तसं करू शकले, कारण पॅलेस्टिनी दुर्बळ होते. १९४८ साली इस्रायल निर्माण करताना स्थानिक पॅलेस्टिनींना  त्यांची इच्छा काय आहे, त्यांचं काय करायचं याचा विचार जगातल्या बलाढ्य देशांनी केला नाही. १९४८ मधे पॅलेस्टाईनची ५६ टक्के भूमी इस्रायलनं बळकावली. नंतर १९६७ च्या युद्धाचा फायदा घेऊन ७८ टक्के  जमीन बळकावली. २०२० साली इस्रायलनं पॅलेस्टाईनमधली ८५ टक्के जमीन बळकावली आहे. उरलेसुरले पॅलेस्टिनीही हुसकावून लावण्याची खटपट इस्रायल करीत आहे.

जेरुसलेमच्या आसपास, वेस्ट बँक या भूभागात तुरळक पॅलेस्टिनी वस्त्या आहेत. तिथल्या लोकांना हाकलून लावण्याच्या खटाटोपातला एक भाग म्हणून मे महिन्यात शेख जर्रा या वस्तीतल्या पॅलेस्टिनी लोकांची घरं पाडून त्या जागा ताब्यात घ्यायचा प्रयत्न इस्रायलींनी केला, बंदुकीच्या धाकानं. पॅलेस्टिनींनी विरोध केला.  शेख जर्रातल्या लोकांचा प्रश्न सरळ होता. ‘आम्ही जायचं कुठं?’ उर्मट इस्लायली सैनिक  म्हणत ‘तो तुमचा प्रश्न आहे.’ तिथे ठिणगी पडली.  ज्यूंवर अत्याचार झाले होते हे खरं आहे. त्यांना भूमी हवी असणं योग्य आहे; पण ती भूमी कोणी कोणाला द्यायची? मागं कधी तरी, इतिहासात,  ज्यू पॅलेस्टाईनमधे होते म्हणून ती भूमी त्यांना द्यायची का? इतिहास कुठून सुरू होतो असं धरायचं? ज्यू स्वतःला आपण पृथ्वीवरचे पहिले मानव आहोत असं मानत असले तरी ते सत्य नाही. पॅलेस्टाईनमधे ज्यूंच्या समकालीन आणि त्यांच्या आधीही अनेक उपासनापद्धती असणारे समाज होते.  पॅलेस्टाईनमधे ज्यूना वसवायचं तर स्थानिक लोकांशी बोलूनच ते करायला हवं होतं. ते झालं नाही.

पॅलेस्टिनी लोकांनी इस्रायलचं अस्तित्व अमान्य केलं. इस्रायलनं पॅलेस्टिनी अस्तित्व अमान्य केलं. आम्ही असलो तर तुम्ही नसाल अशी भूमिका दोन्ही बाजूंनी घेतली.  दुर्दैवानं इस्रायलच्या निर्मितीत हात असलेल्या महाशक्तींनी ठामपणानं दोघांना दोन स्वतंत्र देश देण्याची भूमिका घेतली नाही. इस्रायलनं गुंडगिरी करीत पॅलेस्टिनींना हाकलायचं आणि महाशक्तींनी गप्प बसायचं असं घडत घडत आज पॅलेस्टिनी फक्त १५ टक्के भूमीवर शिल्लक आहेत.

इस्रायलच्या हुशार आक्रमकतेला तितक्याच मुत्सद्दी पद्धतीनं उत्तर देण्याची कुवत यास्सर अराफत यांच्यात नव्हती. ते आडव्या डोक्याचे होते. ज्यूंनी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून अमेरिकी-ब्रिटिश संसाधनांची मदत घेऊन स्वतःचा विकास साधला. अमेरिकेत आणि ब्रिटनमधे सर्व  क्षेत्रात सर्वोच्च लायकीची मंडळी ज्यू असतात याचा फायदा इस्रायलमधल्या नेतान्याहू टाइप गुंड लोकांना मिळाला. इस्रायलच्या या उद्योगांना तोंड देण्याचं सामर्थ्य पॅलेस्टिनी, अरब, इजिप्शियन इत्यादी लोकांमधे नव्हतं, आजही नाही. आधुनिकतेच्या हिशोबात ही मंडळी मागं पडली होती. याचा फायदा इस्रायलनं घेतला. जर्मनीनं जे ज्यूंचं केलं ते ज्यू पॅलेस्टिनी लोकांचं करत आले  आहेत. 

... हे होत नाही, तोवरइस्लाम निर्माण होण्याआधी, ख्रिस्ती धर्म निर्माण होण्याआधी, ज्यू आणि इतर लोक एकमेकांच्या शेजारी राहत होतेच ना? १९४८ साली ठरल्याप्रमाणं इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात विभागणी होऊन दोन सार्वभौम देश निर्माण होत नाहीत,  तोवर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात मारामाऱ्या होत राहणं अटळ आहे.

- निळू दामले, ज्येष्ठ पत्रकार damlenilkanth@gmail.com

 

टॅग्स :Israelइस्रायल