शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
3
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
4
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
5
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
6
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
8
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
9
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
10
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
11
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
12
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
13
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
14
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!
15
DPL 2025 : "नायक नहीं खलनायक हूँ मैं..." या गोलंदाजानं हॅटट्रिक घेतली त्याच ओव्हरमध्ये मॅच घालवली
16
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
17
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
18
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
19
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
20
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू

Children's Day 2019:...त्यांची ‘दीन’वाणी अवस्था दूर व्हावी !

By किरण अग्रवाल | Updated: November 14, 2019 07:36 IST

यासंदर्भात प्रकर्षाने समोर येणारी बाब म्हणजे कुपोषण. आदिवासी वाड्या-पाड्यांवरील किंवा ग्रामीण भागातील आरोग्याची स्थिती पाहता तिथे कुपोषणाचा विषय कायम असल्याचे एकवेळ समजूनही घेता यावे

किरण अग्रवालमुले ही देवाघरची फुले, असे म्हणत उद्याचे भविष्य त्यांच्यात दडल्याचे उत्सवी सूर एकीकडे आळविले जात असताना, दुसरीकडे उमलण्याआधीच कोमेजू पाहणाऱ्या या फुलांची वर्तमानातील स्थिती संवेदनशील मनाला चटका लावणारीच दिसून यावी हे दुर्दैवीच ठरावे. विशेषत: ग्रामीण व आदिवासी भागाप्रमाणेच महानगरांमध्येदेखील कुपोषित बालके आढळून येत असल्याचे पाहता, आरोग्य यंत्रणांच्या सक्षमतेवर तर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावेच; पण अशा अवस्थेत सुदृढ व सशक्त भविष्याची स्वप्ने कशी रंगवता यावीत, असाही प्रश्न पडावा.आज देशभर बालदिन साजरा केला जाईल. बालकांमधील जाणिवा व क्षमता वाढवून राष्ट्र उभारणीच्या दृष्टीने या भावी पिढीला अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न यानिमित्ताने होतील, ते गरजेचेच आहे. कारण, उद्याच्या भविष्याचे स्वप्न आज या बालकांमध्येच पेरता व पाहताही येणारे आहे. पण आपल्याकडील उत्सवप्रियता अशी की, दिनविशेषाला आपण जी जागरूकता अगर तळमळ दाखवतो, ती तेवढी वा तशी एरव्ही दिसत नाही. त्यामुळे दिवस येतात-जातात. उत्सवी स्वरूपाचे पोषाखी कार्यक्रम पार पडतात आणि कालगणना पुढे सरकली की मागच्याचा विसर पडतो. बालदिनाच्याही बाबतीत तसेच होऊ नये. कारण, वर्तमानाच्या आधारे भविष्य घडविण्याची संधी यातून लाभणारी आहे. जे चांगले आहे, आश्वासक आहे व उद्याच्या दृष्टीने दिशादर्शक ठरेल त्याची चर्चा यानिमित्ताने व्हावीच, परंतु जिथे सुधारणांना वाव आहे, त्यातही शासन यंत्रणेकडून निधी खर्च होऊनही ज्यात समाधानकारक उद्दिष्टांची साध्यपूर्ती होताना दिसत नाही; अशा बाबींकडे लक्ष पुरवून प्रणालीतील दोष दूर करण्याचे प्रयत्न झाल्यास नक्कीच चांगले काम घडून येऊ शकेल. अर्थात, यासाठी केवळ शासकीय यंत्रणांवर विसंबून चालणार नाही तर सामाजिक संस्थांनाही पुढाकार घ्यावा लागेल.

यासंदर्भात प्रकर्षाने समोर येणारी बाब म्हणजे कुपोषण. आदिवासी वाड्या-पाड्यांवरील किंवा ग्रामीण भागातील आरोग्याची स्थिती पाहता तिथे कुपोषणाचा विषय कायम असल्याचे एकवेळ समजूनही घेता यावे, परंतु शहरी-महानगरी परिसरातदेखील कुपोषित बालके आढळून येत असल्याचे पाहता यासंबंधातील तीव्रता लक्षात यावी. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार तीन वर्षांच्या आतील व अतिशय कमी वजनाची जी बालके असतात, अशी तीव्र कुपोषित बालकांची संख्या देशात तब्बल ९३ लाख इतकी असल्याचे मागे आढळून आले होते. त्यातील दहा टक्के बालकांना तत्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्याची किंवा उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती. राज्यातली, म्हणजे महाराष्ट्रातील आकडेवारी बघितली तर सुमारे ९४ हजार बालके तीव्र कुपोषित आढळून आली होती, तर त्यापेक्षा बरी स्थिती असलेल्या, परंतु कुपोषितच म्हणवणाऱ्यांची संख्या पाच लाखांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली होती. शिवाय मुंबई, पुणे व नाशिक यांसारख्या महानगरांमध्येही कुपोषित बालके आढळून आली आहेत. वस्तुत: कुपोषणमुक्तीसाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात असताना व कोट्यवधी रुपये खर्च होत असताना हे टाळता येऊ शकलेले नाही. गावोगावी अंगणवाड्यांच्या माध्यमातून पोषण आहाराचीही व्यवस्था केली गेली आहे. परंतु बालकांऐवजी व्यवस्थेतील भलत्यांचेच पोषण त्यातून होत असल्याचे वेळोवेळी बघावयास मिळते. तेव्हा बालदिनी बालकांच्या भवितव्याची चर्चा करताना कुपोषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या बालकांच्या समस्यांकडेही गांभीर्याने लक्ष पुरविले जाणे प्राधान्याचे ठरले आहे.

दुसरे म्हणजे, शिक्षणहक्क कायद्यान्वये सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न होत असले तरी त्यातील अपूर्णत:ही नजरेत भरणारी आहे. दारिद्र्य व पालकांमधील अशिक्षितता यांसारखी कारणे त्यामागे आहेत, परंतु तरी यंत्रणांनी म्हणून जी काळजी घ्यायला हवी ती घेतली जाताना दिसत नाही. मध्यंतरी शालेय शिक्षणातील पटसंख्येवरील हजेरीची कडक अंमलबजावणी केली गेली तेव्हा अनेक बाबी समोर आल्या होत्या. पण व्यवस्थेतील दोषाचा भाग टाळून त्या संदर्भात विचार करायचा तर वीटभट्टीवर किंवा तत्सम कामावर असणारी अनेक बालके आजही शिक्षणापासून वंचितच राहतात. कधी कधी हजेरी पटात त्यांची नावे असतात, मात्र वर्गात ती नसतात. तेव्हा या वंचित वर्गातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. अन्यथा, रोजी-रोटीच्या झगड्यात या बालकांची स्वप्ने कोमेजून जाण्याचीच शक्यता मोठी आहे. शहरातील चौकाचौकांत उदरनिर्वाहासाठी वाहनधारकांसमोर हात पसरून उभी राहणारी बालके पाहता त्यांचे शिक्षण वा आरोग्याचे प्रश्न कसे असू शकतात, याची कल्पना यावी. तेव्हा, बालदिनानिमित्ताच्या उत्सवी सोहळ्यात समाधान शोधण्यापेक्षा अशा गरजू बालकांची ‘दीन’वाणी अवस्था दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली गेली तर ते अधिक पुण्याचे ठरेल. कुपोषणाचा शाप दूर करतानाच, शिक्षण-आरोग्य सेवांपासून दूर असलेल्या बालकांना अधिकार व सन्मानाने जगण्यायोग्य स्थिती उत्पन्न करून देणे, यादृष्टीने यानिमित्ताने प्रामाणिक प्रयत्न होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :children's dayबालदिनHealthआरोग्य