शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

Budget 2021: निर्मलाताई, तुम्ही आमची घोर निराशा केलीत!; काय म्हणालात, तुम्ही कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 13:09 IST

आम्हाला वेतनआयोग असतो, आम्ही पर्यटन करतो, हॉटेलात जेवतो, सिनेमा-नाटकं बघतो, मॉलमध्ये जातो, मौजमजा करतो.

नंदकिशोर पाटील

निर्मलाताई (देशाच्या अर्थमंत्री), तुम्ही आमची घोर निराशा केलीत. आमची म्हणजे मध्यमवर्गीयांची ! आम्ही खूप अपेक्षा बाळगून होतो. गतवर्षी तुम्ही आयकर रिटर्न भरण्याचे दोन पर्याय सुचवले होते. आम्ही दोन महिने डोकेफोड केली तरी फायदा नेमका कशात? हे समजले नाही.  पण तरीही आम्ही खूश होतो. यंदा तर कोरोनाचा मार पडलेला. त्यात पगार कपातीचे दुहेरी संकट. आमच्यापैकी अनेकांच्या तर नोकऱ्या गेलेल्या. त्यामुळं तुमच्याकडून अर्थरुपी लसीकरणाची अपेक्षा होती. पण तुम्ही आमच्याकडं साफ दुर्लक्ष केलंत. आयकरात सवलत न मिळाल्याने आमच्या भावनेला, खिशाला आणि राष्ट्रभक्तीला ठेच पोहोचली आहे. तरीही आम्ही यंदाचा अर्थसंकल्प कसा कल्पक, धाडसी, देशाला आत्मनिर्भर बनवणारा आहे, हे सांगतच आहोत. सांगत राहू. दुसरं करणार तरी काय?

ताई, आम्ही इमानेइतबारे आयकर भरतो. आमच्याच पैशातून रस्ते होतात, धरणं होतात, अनुदाने दिली जातात, कर्जे फेडता येतात.  (किमान आम्ही तसे मानतो) शिवाय, आम्ही मत देतो, सोशल मीडियात सरकारची बाजू घेतो, विरोधकांवर तुटून पडतो. सरकारच्या प्रत्येक कृतीचे, घोषणेचे, धोरणांचे, निर्णयांचे स्वागत करतो. न चुकता तुमच्या सभांना गर्दी करतो. टाळ्या वाजवतो. घोषणाही देतो. कुणी आम्हाला ‘भक्त’ म्हणून हिणवले तरी आम्ही राग मानत नाही. आता आमच्यातही असतात म्हणा काही डावे, लाल, हिरवे, पिवळे, निळे. पण आम्ही त्यांना पुरुन उरतो. (हां, कर चुकविण्यासाठी कधी घरभाड्याच्या बनावट पावत्या जोडत असू. पण आमची ही करचोरी समुद्रातील थेंबभर पाण्याएवढी!) बाकी सगळा कर तर ॲटसोर्सच कापून घेतला जातो की! शिवाय, डिझेल-पेट्रोल महागले, रस्त्यांवर टोल वाढले, गॅस सिलेंडरचे भाव वाढले तरी आम्ही ते गपगुमान सहन करतो. तरीही तुम्ही यंदाच्या अर्थसंकल्पात आम्हाला थोडीसी देखील सवलत दिली नाही. शेतकरी आंदोलनाचा राग आमच्यावर तर नाही ना काढलात !

निर्मलाताई, आमच्याबद्दल, आमच्या म्हणजे मध्यमवर्गाबद्दल. समाजातही बरं बोललं जात नाही. आम्हाला वेतनआयोग असतो, आम्ही पर्यटन करतो, हॉटेलात जेवतो, सिनेमा-नाटकं बघतो, मॉलमध्ये जातो, मौजमजा करतो. थोडक्यात काय तर, आम्ही सुखासीन असतो. अशा अफवा पसरवल्या जातात. पण खरं सांगायचं तर आयुष्यभर नोकरी केल्यानंतर आमच्या पासपोर्टवर व्हिसा कुठला तर, थायलंडचा! ऊटी, महाबळेश्वर, कोकण, गोवा, बँकॉक आणि निवृत्तीनंतर चारधाम...संपलं आमचं पर्यटन!! आम्हालाही वाटतं कधीतरी अमेरिका, पॅरिस, युरोपला जाऊन यावं. तिकडच्या कॅसिनोत भरपूर पैसे उडवावेत. बेलीडान्सचे नेत्रसुख घ्यावे, सिंगल माल्ट व्हिस्की किंवा शॅम्पेन प्यावी... दक्षिण आफ्रिकेच्या सफारीवर जावं. आमच्याकडंही एखादी बीएमडब्लू किंवा मर्सडिस असावी, समुद्राकाठी फोर बेडरुमचा प्रशस्त फ्लॅट असावा, नोकरचाकर असावेत...आयुष्यात कधीतरी आम्हालाही ईडीची एखादी नोटीस यावी...त्याची बातमी व्हावी...चॅनलवर मुलाखती द्याव्यात....करोडो रुपयांची करचोरी करून परदेशात पळून जाण्याची एखादी संधी मिळावी. आमचंही कर्ज बँकांनी राईटऑफ करावं किंवा जमलं तर बुडीत खात्यातच टाकून द्यावं. आम्हालाही कर्जमाफी मिळावी. आमच्यासाठी कुणीतरी उपोषणाला बसावं... सरकारला धारेवर धरावं...वगैरे वगैरे... किती माफक अपेक्षा असतात आम्हा मध्यमवर्गीयांच्या ! 

निर्मलाताई (अर्थमंत्री), तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण मार्च महिना उजाडला की जीवनविमा, पेन्शन स्कीम, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवताना आमची किती धमछाक होते.  वर्षभर घराचे हप्ते, पॉलिसींचे प्रिमियम भरता-भरता आमच्या नाकीनऊ येतात. मुलांचं शिक्षण, आई-वडिलांचे आजार, बायकोची शॉपिंग, सण-वार हे सगळं कसं जमवतो ते आमचं आम्हालाच ठाऊक. या देशात महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी कायदे आहेत. मागासवर्गीयांसाठी योजना आहेत. गरीबांना मोफत राशन आहे. अन्‌ मध्यमवर्गीयांना? समाजाचे शिव्याशाप, ऑफिसात बॉस, नोकरीचा व्याप अन्‌ घरच्यांचा मनस्ताप! मध्यमवर्गीयांसाठीही एखादं आर्थिक विकास महामंडळ, सवलतीच्या दरात फॉरेनची टूर, बिनव्याजी कर्ज, परवडणारं घर, मोफत शिक्षण, नोकरीची हमी अशा योजना सुरु करायला काय हरकत आहे?  

काय म्हणालात, तुम्ही कोण? अहो आम्ही गर्दीत हरवलेली, चेंगरलेली, गुदमरलेली आणि इन्कमटॅक्समध्ये थोडीशी सवलत मिळाली तरी डोंगराएवढा आनंद मानणारी बिनचेह-याची मिडलक्लास माणसं!! 

टॅग्स :budget 2021बजेट 2021