शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

...आता पुस्तकं धीर देत नाहीत, माणसंच देतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 05:38 IST

अस्वस्थ काळाचे वर्तमान: साधीसुधी माणसं धडपड करीत कशी तगून राहिली, याच्या गोष्टी कळतात नि मग ‘सगळं काही नाहीसं होईल’ या टोकाला जाणारं मन ताळ्यावर येतं!

वसंत आबाजी डहाके

ख्यातनाम कवी आंणि समीक्षक

‘या शतकाची अखेर जवळ आली आहे’ या तुमच्या ओळीविषयी आजच्या संदर्भाने काय सांगाल?सध्याची मन:स्थिती अशी आहे की काय बोलावं समजत नाही आणि बोललो तरी काय उपयोग होणार असं वाटत राहतं. अशी जी थांबून जाण्याची अवस्था असते तिने रुद्ध होतो माणूस. गेल्या शतकात हिंसाचाराच्या खूप घटना घडल्या होत्या. माझ्या आधी व मी असताना. त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला होता. त्यावेळीही असाच सर्वव्यापी वैफल्याचा अनुभव होता. नामदेव ढसाळांनी निराळ्या संदर्भात; पण तशाच काही सुरात म्हटलं होतं, ‘भयंकराच्या दरवाजापाशी मी उभा आहे...’ ते भयंकरपण आता दारात थांबून राहिलेलं नाही, ते सरळ आतच आलेलं आहे. वर्तमानपत्रं, टी.व्ही. चॅनल्स, आसपास भेटणारे, बोलणारे लोक सगळेच याचे पुरावे देत राहतात. हे सगळं इतकं विचित्र आणि असह्य करणारं आहे की मनात एरवी जे विचार असतात ते नाहीसे होऊन गेले की काय, अशी मानसिक स्थिती उत्पन्न होते. आपली प्रचंड लोकसंख्या, गरिबी, बेरोजगारी, नियोजनाबाबतीतली बेशिस्त, समाज म्हणून बेशिस्त हे चढत्या भाजणीत असताना आकस्मिक संकट कोसळलं की नेतृत्वाचा, जगणाऱ्या माणसांचा खरा कस लागतो. या आपत्तीला तोंड कसं द्यावं हे कुणाला समजत नाही, तेव्हा मात्र कठीण होतं. 

साधनांच्या कमतरतेमुळं लोकांची जी दैना उडाली आहे ती शब्दांच्या आवाक्यात न बसणारी आहे. मात्र, काही संस्था, एकेकटी माणसं, आरोग्य सेवकांची फौज झटते आहे हे दिसतं तेव्हा आपलं कुणीच नाही म्हणत निराश होऊन जावं अशीही परिस्थिती नाही असं वाटतं. गेल्या शतकाने दिलेली असुरक्षितता आणि आजची अस्वस्थता नि असुरक्षितता यात फरक आहे. आज प्रश्‍न केवळ माणसांच्या जगण्या-मरण्याचा नाही, जे जिवंत उरले आहेत त्यांनी भविष्यात जगावं कसं व कोणत्या उमेदीनं, आधारानं हा प्रश्‍न अनेक कंगोऱ्यांसहित दिसतो आहे. आपल्या आकलनाच्या कक्षेतच आपल्या जगाचं अस्तित्व असतं आणि भाषा हे त्या आकलनाचं मुख्य माध्यम असतं. ती भाषा तूर्त सापडत नाहीये. तुकड्यातुकड्यांनी दिसणाऱ्या प्रश्‍नांवर आपण काम तरी कसं करावं याच्या मर्यादांनी हतबलता येते. एका व्याधीने कितीतरी पातळ्यांवर प्रश्‍न उभे केले आहेत.

कोरोना विषाणू नव्या तऱ्हेनं माणसाच्या जगण्याचं कथानक विणत असेल तर चिकाटी कुठून मिळवावी?खरं सांगू, मोठ्या पुस्तकांनी प्रबंधानिबंधांनी व कालातीत तत्त्वज्ञान समजून सध्या धीर मिळत नाही. तो मिळतोय आसपासच्या काही साध्यासाध्या माणसांच्या जगण्यातून. काही जवळचे मित्र, परिचित यांनी आल्या संकटावर कशी मात केली, धडपड करीत ते कसे तगून राहिले याच्या गोष्टी कळतात नि मग सगळं काही नाहीसं होईल या टोकाला जाणारं मन ताळ्यावर येतं. रोज कोरोनातून बरे होणाऱ्यांचे आकडे बघितले तरी छान वाटतं. असं सगळं चालू असताना माझं माझं काम चालू असतं. वाचताना लिहिताना मन:स्थिती निवळते. मनोरंजनानं ताण हलका होतो; पण विसर पडत नाही. वास्तवाची खोल जाणीव होत राहते. ही व्याधी मानवनिर्मित आहे असं मी मानत नाही. माणसं माणसाला ठार करीत होती असा काळ येऊन गेला आहे. मरणाऱ्या व मारणाऱ्या दोन्हींबद्दल चिंता वाटायची असा तो काळ होता. आज असं दिसतं की आपत्तीत सापडलेल्या माणसांबद्दल चांगलीच भावना आहे. कटुतेची भावना कुणाहीबद्दल वाटत नाही. जास्तीत जास्त लोकांबद्दल माया, ममता, जिव्हाळा वाटत राहतो. त्यांच्यासाठी प्रार्थना करावी वाटते.

आजूबाजूची राजकीय-सामाजिक परिस्थिती आणि माणसं यांचं आजचं द्वंद्व तुम्हाला कसं दिसतं?राज्यकर्त्यांकडे दूरदृष्टी नसण्याचे परिणाम आपण भोगतो आहोत. अनुभव येऊनही पूर्वतयारी नसणं हा त्याचाच परिणाम. मात्र, समाजातील साध्यासाध्या माणसांनी आपल्या श्रमाचं, जिवाचं मोल देऊन माणसं वाचविली आहेत. अनपेक्षितपणे आलेल्या तणावावर उत्तरं काढून ही माणसं कामात राहिली. या काळात विशेषत: पत्रकारांची जबाबदारी मोठी होती. अपवाद वगळता या लोकांनी मात्र खूप जबाबदारीनं काम केलंय असं दिसत नाही. भेदांचा विचार वगळून पलीकडं जाण्याची ही वेळ आहे. वाईट, दोषपूर्ण गोष्टी नोंदवायच्या नाहीत असं कसं चालेल? 

‘व्यवस्था’ हा शब्द सध्या ‘पॉप्युलर’ आहे, तर त्या व्यवस्थेमधले अडथळे व उणिवा त्यांनी उघडपणे सांगायला हव्यात. समाजाला विश्‍वासाचं द्रव्य पुरविणं, शासन-प्रशासनावर सकारात्मक दबाव ठेण्याचं त्यांचं काम आहे खरं तर! ती भूमिका दिसत नाही. दुसऱ्या बाजूला हेही कळतं की खरं बोलाल तर तुमचा आवाज बंद करण्यात येईल अशा दडपशाहीचा सामना पत्रकार नि मोठ्यमोठ्या विचारवंतांना करावा लागतो आहे. चार-दोन वगळता बहुतांशी या दबावाला बळी पडतात हे दिसतं तेव्हा निराशा येते. मोठ्या बेगडी शब्दांचं प्रस्थ नि समाजमाध्यमांतून ‘दाखवेखोरी’ वाढताना मी पाहतो, पण फार काळ लोकांना त्याचं आकर्षण वाटेल असं नाही. अलीकडेच अमरावतीच्या सिव्हिल सर्जनची डायरी माझ्या पाहण्यात आली. 

एकही रुग्ण मदतीविना राहू नये यासाठी यंत्रणेतले सगळेच किती झटताहेत! त्यांची सतर्कता व जबाबदारीची जाणीव पाहून माणसं हृदयशून्य होणार नाहीत यावर माझा विश्‍वास पुन्हा पुन्हा बसतो. झाडापानांपासून, उत्सवाच्या खऱ्या गाभ्यापासून आपण सुटत चाललो आहोत असं वाटत असताना काहीतरी चमकतं आणि जाणीव होते की, ‘मध्येमध्ये असा काळ येतो की सगळं विसरलं जातं’. ही अपरिहार्यता सरते. क्रौर्य, हिंसा, वेदना, आक्रोश, हतबलता, अविश्‍वास या घटितांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. सगळ्या संदर्भासहित कुठलीही कृती तिचा आवाज व रूप घेऊन येते, येईल! कारण खरं लिहिताना झालेली आतड्याची कुरतड कुठं लपवायची हा एक प्रश्‍नच आहे.

मुलाखत : सोनाली नवांगूळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या