शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
धक्कादायक! जालन्यात शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, कारण अद्याप अस्पष्ट
3
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
4
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
5
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
6
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
7
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
8
Bombay HC: थकबाकी दिल्याशिवाय खरेदीदाराला सोसायटीचे सदस्यत्व नाही: हायकोर्ट
9
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
10
अदानी समूहाची 'या' दिग्गज कंपनीतून एक्झिट; विकला उरलासुरला हिस्सा; तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?
11
NIA Terrorist: दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांना उचलले, कॅब चालक, ऊर्दू शिक्षकाचीही चौकशी
12
Pakistan: शिक्षा पूर्ण झालेल्या मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू
13
'नो-कॉस्ट EMI' चे सत्य काय? कंपन्या आणि बँका प्रोसेसिंग फीसच्या नावाखाली वसूल करतात 'इतके' शुल्क!
14
Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
15
Shaurya Patil: पायाचा त्रास, तरीही शिक्षकांचा डान्स करण्यासाठी हट्ट; शौर्य पाटीलने आयुष्य संपवण्यापूर्वी शाळेत काय घडलेलं?
16
टार्गेटवर फक्त विवाहित महिला! आधी जाळ्यात ओढायचा, मग सुरू व्हायचा टॉर्चरचा खेळ; नराधमावर गुन्हा दाखल
17
Jara Hatke: तुमच्या बागेतले ‘ते’ फूल खरे ब्रह्मकमळ नाहीच; पाहा 'हा' व्हिडीओ
18
निर्दयी आई तिला स्मशानाबाहेर टाकून फरार; महिला अधिकाऱ्याने कुशीत घेताच चिमुकली हसली
19
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
20
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
Daily Top 2Weekly Top 5

राजा, राणी आणि भातुकलीच्या गारुडाची पन्नास वर्षं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 03:37 IST

मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते यांनी मांडलेला विलक्षण भातुकलीचा खेळ! या गाण्याला आज ५० वर्षे होत आहेत

भारतकुमार राऊत

कोणत्याही समाज व संस्कृतीत त्या त्या दशकाचे एक गाणे असते; एक चित्रपट व एक नाटकही असते. ती गाणी व ते नाटक-सिनेमे पुढे काळाच्या ओघात मागे पडतात, काही अदृश्यही होतात; पण काळाच्या प्रवाहाविरुद्ध पोहत ज्या कलाकृती जिवंत राहतात, त्याच श्रेष्ठ ठरतात. १९६०च्या दशकात कविवर्य ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांनी शब्दबद्ध व सूरबद्ध केलेली भावगीते मराठी मनात रुजू व ओठांवर घोळू लागली होती, त्याच काळात यशवंत देव, मंगेश पाडगावकर व अरुण दाते या त्रिकुटानेही मराठी भावविश्वात आपले साम्राज्य स्थापन करायला सुरुवात केली. या भावमंदिरावर कळस चढवला याच त्रिकुटाने साकारलेल्या ‘भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी..!’ या विराणीने. ही अजरामर कलाकृती निर्माण झाली त्या घटनेला आज तब्बल ५० वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी मनावरचे या ‘भातुकली’चे गारुड काही अद्याप उतरलेले नाही. त्यानंतर या पठडीतील अनेक गीते आली व गेली. दोन पिढ्या मोठ्या झाल्या. हिंदी व आता इंग्रजी गाण्यांचीही गोडी मराठी माणसांना लागली; पण पाडगावकर, देव व दाते यांनी मांडलेला हा विलक्षण भातुकलीचा खेळ मात्र तसाच चालू आहे व आणखी काही दशके तरी ही भातुकली कुणी मोडणार नाही वा सोडणारही नाही. दुर्दैव हेच की ही भातुकली साकारणारे तीनही कलाकार मंगेश पाडगावकर, यशवंत देव व अरुण दाते आज आपल्यात नाहीत. पण कलाकार गेले, तरी ज्या कलाकृती पुढच्या पिढ्या चालवत राहतात, त्याच अस्सल कला. ‘भातुकली’ हे त्याचे उत्तम उदाहरण ! मंगेश पाडगावकर यांनी अनेक लयबद्ध कविता लिहिल्या, त्याची सुमधुर गीते झाली. गीतकार व संगीतकार यशवंत देव यांनी तर वेगवेगळ्या धाटणीच्या गीतांना सूरबद्ध करून अजरामर केले. गायक अरुण दातेंच्या गायकीचा वेगळा बाज  तत्कालीन मराठी रसिकांना अपरिचित होता. त्यांनी गझलांच्या बाजाची मराठी गाणी गायला सुरुवात केली व त्यात लोकप्रियताही कमावली. पाडगावकर-यशवंत देव आणि अरुण दाते या तिघांनी एकत्र येऊन केलेली मराठी गीते अजरामर ठरली. ‘अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी’, ‘भेट तुझी-माझी स्मरते अजून त्या दिसाची’, ‘धुके दाटले हे उदास उदास’, ‘दिवस तुझे हे फुलायाचे’, ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, या गीतांनी करोडो मराठी मनावर कधी हलकेच फुंकर घातली.‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’ हे त्यातलेच एक गीत. जणू मराठी संस्कृतीतील एक दंतकथाच ! असे म्हणतात की,  पाडगावकरांनी रेकाॅर्डिंगच्या दोन महिने आधीच हे गीत लिहून संगीतकार देवांकडे पाठवले. नंतर एकदा ते दोघे व दाते भेटले असता देवांनी ते गाणे ऐकवले. ती चाल ना पाडगावकरांना पसंत पडली, ना दातेंना ! त्या दोघांच्याही मते ती विराणी असल्याने तिला  भावगीताची चाल योग्य नव्हती; पण देव त्यांच्या सूररचनेबद्दल कमालीचे आग्रही होते. ते म्हणाले, ही मुळात विराणी नाहीच. ते एक प्रेमभंगाचे दु:खद गीत आहे. त्याचा गायक प्रेमविरहात होरपळलेला प्रेमवीर नसून त्याची कथा तिसऱ्यानेच विशद केलेली आहे. त्यावर तिघांत बराच खल झाला. अखेर देवांच्या मनाप्रमाणेच करायचे ठरले. मग  देवांनी शब्द दिला की पाहा, हे गाणे अजरामर होईल व तसेच झाले.हे गीत आकाशवाणीवर सादर होताच ते कमालीचे लोकप्रिय झाले. १९७८ मध्ये नानासाहेब गोरे ब्रिटनचे हायकमिशनर झाले, त्यावेळी इंडिया हाउसमध्ये दातेंच्या गाण्याचा कार्यक्रम झाला. स्वत: दाते तीन तास गायले. एक गायक व केवळ दोन वादक इतक्या श्रोत्यांना तीन तास खिळवून  ठेवतात, हे पाहून उपस्थित असलेले ब्रिटिश अधिकारी अवाक‌् झाले.. पुढे दोनच वर्षांनी बीबीसीने ‘भातुकलीच्या खेळामधली’चे रेकॉर्डिंग केले. बीबीसीने मराठी गाण्याचे रेकाॅर्डिंग करण्याची ती पहिलीच वेळ.इतके मात्र खरे की, भातुकलीच्या खेळातले हे राजा आणि राणी मराठी संस्कृतीच्या वाटचालीचा मैलाचा महत्त्वाचा दगड बनून राहिले आहेत.

(लेखक लोकमतचे माजी संपादक, माजी खासदार आहेत)  

टॅग्स :arun datearun date