शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Airport: मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल, 'या' विमानांत स्फोटकं, दर अर्ध्या तासाला उडवून देणार!
2
दहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी पडघ्यातील बोरिवली गावात रात्रभर ED, ATS ची छापेमारी
3
Sovereign Gold Bond: ₹२,९५४ च्या गुंतवणूकीवर ₹१२,८०१ चा रिटर्न; गुंतवणूकदारांना कुठे मिळतोय ४ पट पैसा, जाणून घ्या
4
‘क्रिकेटएवढं मला काहीही प्रिय नाही’; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी
5
टॅरिफ वॉरचे नवे संकट! आधी अमेरिका, आता मेक्सिकोचा ५०% टॅरिफ हल्ला; भारत-चीनसह अनेक देशांना मोठा झटका
6
६ वर्षांतील सर्वात मोठे मतभेद! फेडरल रिझर्व्हमध्येच धोरणांवर एकमत नाही; व्याजदरात कपात केली पण...
7
सार्वजनिक हिताचा विचार करूनच होर्डिंग्जचे निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचा जाहिरातदारांना परवाना शुल्कात दिलासा देण्यास नकार
8
मोठी बातमी! थायलंड पोलिसांनी लूथरा बंधूंना फुकेतमध्ये पकडले; भारतात आणले जाणार...
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, IT आणि मेटल शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
'डॉ. शिरीष वळसंगकर यांना आयुष्य संपवण्यापूर्वी 'पी राऊत' नावाच्या महिलेचे दहा कॉल', कोर्टात काय घडलं?
11
मोठी बातमी! गोवा आग दुर्घटनेनंतर देश सोडून पळणाऱ्या लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित
12
US Seizes Oil Tanker: हेलिकॉप्टरमधून उतरले आणि तेलाचे जहाज केले जप्त, व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई
13
Smriti Mandhana: लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची एका कार्यक्रमात हजेरी, सर्वांसमोर मनातलं बोलून दाखवलं!
14
क्लब जळत होता, लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते अन् लुथरा बंधु थायलंडचं तिकीट बुक करत होते! 
15
अनिल अंबानी समूहाच्या कंपनीवर ईडीची मोठी कारवाई, १३ बँक खाती गोठवली; कोणते आहेत आरोप?
16
पत्नीची प्रतारणा असह्य, पतीने उचलले टोकाचे पाऊल! आधी व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "दुसऱ्या पुरुषाचा हट्ट.." 
17
Your Money, Your Right: पीएम मोदींच्या आवाहनानं उघडू शकतं तुमचं नशीब; काय आहे हे आणि कसा होऊ शकतो फायदा?
18
लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येचा उलगडा; तिने इंजिनियर जोडीदाराला का संपवलं? म्हणाली, "तो माझ्या मुलींना.."
19
महायुतीचा फॉर्म्युला ठरला! मुंबईत शिंदेसेनेला 'इतक्या' जागा हव्यात, पुण्यात BJP-NCP वेगळं लढणार?
20
दिल्ली मेट्रो स्टेशनवर सापडलं ५०० आणि १००० च्या जुन्या नोटांचं घबाड; आकडा पाहून पोलीस हैराण
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिकोन : लोकमत पर्यावरणोत्सव, पक्षी संवर्धनाच्या दिशेने पहिले पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 10:45 IST

संपूर्ण देशभरात पक्ष्यांची व्यवस्थित व पद्धतशीर नोंद करण्याचे फ्लॅटफॉर्म

संजय करकरे 

भारतातील पक्ष्यांच्या स्थितीचा नुकताच प्रसिद्ध झालेला अहवाल देशातील एकूण पक्ष्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकणारा आहे, असे म्हणणे योग्य होईल. आज भारतात साधरणपणे १,३०० जातींच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. त्यातील निम्म्या प्रजाती आपल्या राज्यात आहेत. विविध परिसंस्थेत या पक्ष्यांच्या जाती विखुरल्या आहेत. एखाद्या परिसंस्थेचे द्योतक म्हणूनही या पक्ष्यांकडे बघितले जाते. माळढोक, तणमोर ही अत्यंत समर्पक अशी उदाहरणे आहे. गेल्या तीन दशकांत माळरानावर ज्या गतीने आक्रमण झाले, त्या गतीने या पक्ष्यांवर संक्रांत आली. आज हे पक्षी काही शेकड्यात आले अन् संकटग्रस्त म्हणून नोंदले गेले. सर्व पक्ष्यांची स्थिती थोडी-फार अशाच प्रमाणात असल्याची नोंद या अहवालातून अधिक ठळक झाली. देशातील ८६७ जातींच्या पक्ष्यांचा सुमारे १५ हजारांहून अधिक पक्षी निरीक्षकांनी केलेल्या नोंदी आणि यासाठी देशातील व परदेशातील नामांकित संस्था एकत्रित येतात, तेव्हा या अहवालाचे गांभीर्य तेवढेच वाढलेले असते.

संपूर्ण देशभरात पक्ष्यांची व्यवस्थित व पद्धतशीर नोंद करण्याचे फ्लॅटफॉर्म असलेल्या ‘ई-बर्ड’चा येथे पुरेपूर वापर केला आहे. पक्ष्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास १०१ प्रजातींकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, ३१९ पक्ष्यांच्या प्रजातींना मध्यम, तर ४४२ पक्ष्यांच्या प्रजातींना कमी संवर्धनाची गरज आहे. पक्ष्यांच्या संख्येचा कल, त्याचे आढळ क्षेत्र याचाही या अहवालात बारकाईने समावेश केल्याने त्याची स्थिती काय, हेही लक्षात येते. उदाहरण चिमणी, मोराचे घेता येईल. चिमण्यांची संख्या खूप कमी झाली आहे. मोबाइल टॉवरचा परिणाम या जातीवर झाला आहे, अथवा कीटकांची संख्या घसरल्याने ही प्रजाती नष्ट होऊ लागल्याचे सांगितले जात होते, परंतु या अहवालात २५ वर्षांच्या नोंदींचा आकडा घेऊन देशातील या पक्ष्याची स्थिती, स्थिर अथवा वाढत असल्याचे म्हटले आहे. बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता व मुंबई या महानगरांत या चिमण्यांची संख्या कमी झाली असली, तरी हा पक्षी ग्रामीण, अर्धशहरी भागात विपुल संख्येने दिसत असल्याचा हा अहवाल सांगतो. या अहवालात मोरांची संख्या, त्याचे आढळ क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे पुढे आले आहे. योग्य संरक्षण, तसेच काही राज्यांत त्याच्याकडे संस्कृतीचे प्रतीक म्हणून बघितल्यामुळे या राष्टÑीय पक्ष्याची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. या अहवालात देशातील राज्यानुसारही पक्ष्यांच्या प्रजातींकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे. महाराष्टÑाचा विचार केला, तर ब्रॉड टेल ग्रासबर्ड, फॉरेस्ट आलुलेट, ग्रेट नॉट, निलगिरी वूड पिजन, ग्रीन मुनिया, यलो फ्रंटेड पाइड वूड पेकर, कॉमन पोचार्ड, वुली नेक स्टॉर्क, शॉर्ट होड स्नेक इगल, क्रिस्टेड ट्री स्विफ्ट, स्मॉल मिनिव्हेट, सफस-फ्रंटेड प्रिनिया, कॉमन वूडश्राईक या पक्ष्यांची नोंद झाली आहे. ज्यांच्या संवर्धनाचा विचार करण्याची गरज आहे.

पक्ष्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींनुसार विचार केला, तर शिकारी पक्ष्यांचा वर्ग बिकट परिस्थितीतून जात असल्याचा हा अहवाल सांगतो. खासकरून गिधाडांच्या बहुसंख्य प्रजातींची १९९० नंतर झालेली पडझड येथे प्रतिबिंबित झाली आहे. पाणपक्ष्यांचा दीर्घकालीन विचार केला, तर येथेही पक्ष्यांची संख्या घटल्याचे दिसून येते. वर्षभर आपल्याकडे दिसणारी जांभळी पाणकोंबडी, करकोचे, कूट, तर समुद्र किनारी दिसणारे स्थलांतरित गल्स व टर्न, तसेच स्थलांतरित बदकांच्या जातीही घसरल्याचे दिसते. खास करून गेल्या ५ वर्षांत स्थानिक पाणपक्ष्यांच्या संख्येतील घट, संवर्धनासाठी गरजेचे असल्याचे म्हटले आहे. या अहवालात पक्ष्यांच्या विविध खाद्यांच्या प्रकारावरून त्यांचे वर्गीकरण केले आहे. पाने-बिया, मिश्र आहारी, फळ, मध खाणारे, कीटकभक्षी, तर मांसभक्षी असे हे वर्गीकरण आहे. यातील पक्ष्यांची स्थिती सर्वसाधारणपणे घसरणीकडे आहे. आकाराने मोठे असलेले अनेक पक्षी सतत नजरेसमोर असतात, पण लहान आकाराच्या फिन्स व्हिवर, ग्रीन मुनिया, नागा व्रिन बॅब्लर, इंडियन आॅलिव्ह बुलबुलसारख्या पक्ष्यांकडे अतिशय दुर्लक्ष होते. या पक्ष्यांची स्थिती बिकट आहे. या अहवालातील शिफारसींना अत्यंत महत्त्व आहे. पक्ष्यांची स्थिती काय, हे पुढे आले, आता त्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी शासनकर्ते, धोरण ठरविणारे संशोधक, सर्वसामान्य लोक यांची भूमिका महत्त्वाची ठरते. एक टप्पा झाला. आता या देखण्या, अद्भुत घटकाबद्दल पुढील महत्त्वपूर्ण वाटचाल झाली, तरच तो दीर्घकाळ या सृष्टीत आपल्याला बघायला मिळेल. अगदी तसेच होईल, अशी आशा करू या.

(लेखक बीएनएचएस, नागपूर येथे सहा.संचालक आहेत )

टॅग्स :environmentपर्यावरणMumbaiमुंबई