शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

भाष्य - विद्यापीठांचे वास्तव

By admin | Updated: May 30, 2017 00:28 IST

भारतातील सर्व विद्यापीठांतील एकत्रित संशोधनाची बरोबरी केवळ केम्ब्रिज व स्टॅनफर्ड या दोन विद्यापीठांतील संशोधनांशीही होऊ शकत नाही

भारतातील सर्व विद्यापीठांतील एकत्रित संशोधनाची बरोबरी केवळ केम्ब्रिज व स्टॅनफर्ड या दोन विद्यापीठांतील संशोधनांशीही होऊ शकत नाही, असे एका अहवालातून समोर आले आहे. त्यातून भारतातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणाची आणि एकूणच विद्यापीठांची अवस्था काय आहे, यांचे भयाण वास्तव दिसून येते. भारतात तब्बल ८०० विद्यापीठे आहे. याशिवाय आयआयटी, आयआयएम यासारख्या अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्था वेगळ्याच. असे असूनही संशोधनाबाबत आपली विद्यापीठे इतकी मागास का, याचा विचार आता तरी करायला हवा. जागतिक दर्जाच्या २०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नसल्याचा एक अहवालही मध्यंतरी प्रसिद्ध झाला होता. त्या यादीत आपल्याकडील ख्यातनाम म्हणून ओळखली जाणारी विद्यापीठे आणि शिक्षणसंस्था यांचे क्रमांक २५० नंतरच सुरू होत होते. त्या ८०० जागतिक संस्थांच्या यादीतही आपल्याकडील केवळ १९ विद्यापीठे होती. या सर्वांचा अर्थ आपल्याकडील विद्यापीठांत वा आयआयटी, आयआयएम आणि आयआयएस या सर्व संस्थांमध्ये संशोधनाच्या जागतिक पातळीवरील दर्जाचा अंदाज येतो. शिक्षणव्यवस्थेत कालानुरूप न झालेले बदल, जुने अभ्यासक्रम, पुरेशा प्रमाणात निधी न मिळणे, स्वायत्ततेचा अभाव, राजकारण्यांचा हस्तक्षेप, विद्यापीठांत खेळले जाणारे राजकारण, प्राध्यापकांचे अपुरे लक्ष, संशोधनासाठी न मिळणारे प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शक नसणे हीच या अवस्थेची कारणे असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आपल्याकडे पीएच.डी. करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. पण अनेकदा त्यात संशोधन किती, असाच प्रश्न पडतो. कित्येकदा तर प्रबंधांत अन्यत्र प्रसिद्ध झालेले उतारे व मजकूर यांचाच भरणा असल्याचे दिसून येते. अशा स्थितीत आपल्या विद्यापीठांची गणना जागतिक या दर्जात झाली नाही, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मग जागतिक दर्जाच्या संशोधनाचा विषयच सोडून द्या. भारतीय विद्यार्थ्यांमध्ये क्षमता नाही असा मात्र याचा अर्थ नाही. आपल्याकडील विद्यार्थी हल्ली उच्चशिक्षण व संशोधन यासाठी परदेशी विद्यापीठांची वाट धरताना दिसत आहेत. तिथे त्यापैकी अनेकांनी केलेले संशोधनही अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या विद्यापीठांत तसे वातावरण नसल्याने ते परदेशी जातात, असाच याचा अर्थ. हे चित्र लगेच बदलणे शक्य नसले तरी त्यासाठी वेगाने पावले तरी उचलली जाणे गरजेचे आहे. पण ती पडताना दिसत नाहीत, हे दुर्दैव.