शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड

By अमेय गोगटे | Updated: August 12, 2025 08:04 IST

'वनतारा' हे प्राणिसंग्रहालय किंवा झू नाही, ते 'प्राण्यांसाठीचं पुनर्वसन केंद्र' आहे. 'महादेवी'ला भेटण्याच्या निमित्ताने 'वनतारा'च्या भटकंतीची हृद्य कहाणी!

अमेय गोगटे संपादक, लोकमत डॉट कॉम

एका तलावात दोन हत्तीणी मनसोक्त डुंबत आहेत. एक 'बेलकली', दुसरी 'कुसुमकली'. थोड्या वेळाने एक बाहेर येते, माहुताकडून डझनभर केळी खाते. सोंड उंचावून अभिवादन करते. आपल्याला भारी वाटतं. दुसरी एकदम शांत असते. डॉक्टर सांगतात, ती अंध आहे. काळजात चर्र होतं. 

पुढे 'धुनमती' आणि 'चंपा' भेटतात. धुनमती अपघातग्रस्त. तिच्या पायाला आयुर्वेदिक लेप लावला जातोय. चंपा दृष्टिहीन. अनोळखी गंध आल्यास ती घाबरते. पण, धुनमतीसोबत रमते. माय-लेकीसारखंच त्यांचं हे नातं. भावुक करणारं. 

अशा शेकडो हृद्य कहाण्या 'वनतारा'मध्ये ऐकायला मिळतात. कोल्हापूर जिल्ह्याच्या नांदणी गावातील महादेवी/माधुरी हत्तीण सध्या तिथे आहे. तिच्यावर कशा पद्धतीने उपचार सुरू आहेत, हे पाहण्यासाठी 'लोकमत'चा प्रतिनिधी म्हणून 'वनतारा'ला भेट दिली. तेव्हा, 'जगात भारी' म्हणजे काय, याची साक्षात प्रचिती आली आणि हे इतकं अद्भुत प्राणी विश्व आपल्या भारतात असल्याचा अभिमान वाटला.

'वनतारा' हे प्राणिसंग्रहालय किंवा झू नाही. ते प्राण्यांसाठीचं पुनर्वसन केंद्र आहे. वयस्कर, दुखापतग्रस्त, आजारी किंवा संकटग्रस्त प्राण्यांना या केंद्रामध्ये आणलं जातं, त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जातात आणि त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. गुजरातच्या जामनगरमध्ये एकूण तीन हजार एकर जागेवर 'वनतारा' वसवण्यात आलंय. दोन हजारहून अधिक प्राणी या ठिकाणी आहेत. एक हजार एकर जागा हत्तींसाठी राखीव आहे. सध्या तिथे सुमारे २६० हत्ती आहेत. त्यात वयोमानानुसार थकलेल्या हत्तींची संख्या अधिक आहे. साध्या दुखण्यापासून ते अपचन, संधीवात, त्वचेचे विकार, स्नायूंची दुखापत, किडनीचे विकार ते मोतीबिंदूपर्यंतच्या सर्व आजारांवर इथे उपचार शक्य आहेत. त्यासाठी जगातलं सर्वात हायटेक हॉस्पिटल 'वनतारा'मध्ये आहे. 

सर्कसच्या तंबूला आग लागल्यानं होरपळलेल्या एका हत्तीणीवर तिथे लेझर ट्रिटमेंट सुरू होती. लहान मुलांना जसं खाण्यात किंवा खेळण्यात गुंतवून हळूच इंजेक्शन दिलं जातं, तसं हे दृश्य होतं. शेजारी एका हत्तीच्या पायाचं दुखणं बरं करण्यासाठी ॲक्युपंक्चर सुरू होतं, तर एका हत्तीणीची एन्डोस्कोपी केली जात होती. हत्तीचं वजन आणि एकूण आकारमान पाहता हे उपचार, शस्त्रक्रिया हे महाकठीण काम आहे. या सगळ्या ट्रिटमेंटसाठी किती अद्ययावत तंत्रज्ञान इथे उपलब्ध असेल, याचा अंदाज आपण लावू शकतो. त्यासोबतच, हत्तींची वेगवेगळी दुखणी बरी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधं, काढे, लेप यांचाही वापर केला जातो. 

मातीत-चिखलात खेळणं आणि पाण्यात डुंबणं हे हत्तींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. प्रत्येक हत्तीला ही हायड्रो (वॉटर) थेरपी आणि 'मड बाथ' मिळेल, यादृष्टीने 'वनतारा' टीमने एक वेळापत्रकच आखलेलं आहे. या जंगलात फिरताना भरपूर हत्ती दिसतात. कळपात राहणारा, रमणारा हा प्राणी असल्यानं एकटा हत्ती क्वचितच दिसतो. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, 'वनतारा'मध्ये तब्बल ६०० प्रशिक्षित माहूत आहेत. ते कायम या हत्तींसोबत असतात. 

उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक खाणं गरजेचं आहे. हत्तींची तब्येत, त्यांच्यावरील औषधोपचार आणि पथ्यपाणी लक्षात घेऊन त्यांचं 'डाएट' ठरतं आणि ते बनवण्यासाठी विशेष स्वयंपाकघर 'वनतारा'मध्ये आहे. वेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेले लाडू, खिचडी, पॉपकॉर्न, वेगवेगळी फळं आणि हिरव्यागार भाज्या हे सगळं पाहून आपल्याही तोंडाला पाणी सुटतं.

'एलिफंट कॅम्प'ची सैर करून, 'महादेवी'चं प्रत्यक्ष दर्शन घेऊन आम्ही अन्य प्राणी पाहण्यासाठी पुढच्या केंद्रात पोहोचलो. मानव-बिबट संघर्ष वाढत असल्यानं जखमी बिबट्यांच्या पुनर्वसन आणि उपचाराची गरज निर्माण झाली आहे. हे ओळखून इथे एक झोन बिबट्यांसाठी राखीव आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून जखमी, अपघातग्रस्त बिबटे, बेवारस पिल्लं इथे आणण्यात आली आहेत. त्यांच्यावरही आवश्यक उपचार केले जातात. एका बिबट्याचं 'रूट कॅनल' करण्यात आलं आणि त्यानंतर त्याचं खाण्याचं प्रमाण वाढलं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

पुढचा झोन आहे 'बिग कॅट्स'चा. कोविड काळात पर्यटन पूर्णपणे ठप्प झाल्यानं मेक्सिकोमधील प्राणिसंग्रहालयं बंद पडली. प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली. सिंह, वाघ, अस्वलं, चित्ते, जिराफ यांच्यासह शेकडो प्राणी मरणासन्न अवस्थेत होते. तेव्हा, अनंत अंबानी यांनी हे सर्व प्राणी वनतारामध्ये आणून त्यांना जणू जीवनदानच दिलं. आज इथे २५० किलोचा वाघ, ३५० किलोचं अस्वल, गर्जना करणारा सिंह पाहून भारावून जायला होतं. 

या सगळ्या प्राण्यांवर जिथे उपचार केले जातात, तिथल्या एका आयसीयूमध्ये आम्ही छोटंसं माकड पाहिलं. त्याच्यावर कुठलीशी शस्त्रक्रिया केली जाणार होती. इटुकल्या माकडाच्या तब्येतीवरही 'टीम वनतारा'चं किती बारीक लक्ष आहे, हे जाणवलं. 'वनतारा'चं हे अफाट काम बघितल्यावर कुसुमाग्रजांच्या 'कोलंबसाचे गर्वगीत' या कवितेतील ओळी आठवल्या "अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा किनारा तुला पामराला"

amey.gogate@lokmat.com

टॅग्स :Vantaraवनताराanant ambaniअनंत अंबानीGujaratगुजरात