शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अमितभार्इंचे दिवाळी गिफ्टचे पार्सल दिल्ली नव्हे तर अहमदाबादेतून धाडल्याचे कन्फर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:11 IST

अमित भार्इंनी मराठीभूमीत खास दिवाळी गिफ्ट आणि फक्त खास माणसांसाठीच पाठवल्याची बातमी वा-यासारखी पसरली. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या अनेक झेलक-यांची धांदल सुरू झाली.

- राजा मानेअमित भार्इंनी मराठीभूमीत खास दिवाळी गिफ्ट आणि फक्त खास माणसांसाठीच पाठवल्याची बातमी वा-यासारखी पसरली. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या अनेक झेलक-यांची धांदल सुरू झाली. अमितभार्इंचे ते गिफ्ट नक्की दिल्लीतून आले असेल की अहमदाबादमधून? याचा शोध लावण्यासाठी कोकणातून विशेष यंत्रणा कार्यरत केली गेली. अखेर त्या यंत्रणेला यश आले. अनेक बाऊन्सरनी ही मोहीम फत्ते केली! अमितभार्इंचे दिवाळी गिफ्टचे पार्सल दिल्ली नव्हे तर अहमदाबादेतून धाडल्याचे कन्फर्म झाले. ज्यांना ते धाडले आहे त्यांची यादी आपल्या खिशात टाकण्यातही कोकणनरेशांना यश आले होते. त्या यादीत देवेंद्रभाई, चंद्रकांतदादा आणि खान्देशनरेश गिरीश यांचेही नाव नाही, हे बघून कोकणनरेश थोडे भांबावले होते. त्यात यादीत अजितदादा आणि अशोकरावांची नावे पाहून तर ते चक्रावलेच! पार्सल तर रवाना झाले. मग आपल्याला मिळाले कसे नाही? कोकणातल्या ‘परिवारा’ने कुरियरवाल्यालाच मॅनेज तर केले नसेल ना? असा विचारही त्यांच्या मनात आला. पण कोकणनरेश ज्युनिअर १ व ज्युनिअर २ यांनी मोठ्या कॉन्फिडन्सने तो धुडकावून लावला. अशाच अनेक शंकाकुशंका वारणानगरपासून नागपूरपर्यंत अनेक शिस्तप्रेमी कार्यकर्त्यांत व्यक्त होऊ लागल्या. ‘आम्ही आयुष्यभर संघ, दक्ष म्हणत राहायचे अन् अमितभार्इंचे दिवाळी गिफ्ट मात्र कालपरवाच्यांनाच!’ असा सूरही अनेकांनी पकडला. हे वातावरण तापत असतानाच पार्सल मराठीभूमीत ज्या-त्या ठिकाणी पोहोचले. पार्सल कसले, ते केवळ खाकी पाकीटच निघाले! कोकणनरेशांनी मोठ्या उत्सुकतेने ते उघडले, त्यात एक पत्र निघाले. पत्रात एवढेच लिहिले होते, ‘दादा, तूर्तास कोंबड्यांचा बिझनेस चालू ठेवा. कॅबिनेटचे नंतर बघू!’ मराठीभूमीत आलेल्या अशाच इतर लखोट्यातील मजकुराचा शोध पत्रकारांनी लावला. त्यात प्रत्येकाला ‘दिवाळी शुभेच्छा आणि प्राणिमात्रांवर प्रेम करा’ असाच संदेश होता. अजितदादांचे ‘गांडूळ प्रेमाबद्दल’ विशेष अभिनंदन करण्यात आले होते. अशोकरावांना नांदेडनगरी पर्यावरणप्रेमी बनविण्याचा सल्ला दिला होता. तर सोलापूरच्या बापूंना ‘मालक’ विजयकुमारांशी जमवून घेण्याचा कानमंत्र दिला गेला. उर्वरित लखोटे अजून सीलबंद आहेत...

टॅग्स :Amit Shahअमित शाह