शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तेलाची निर्लज्ज तहान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 04:31 IST

अमेरिकेची कारवाई जगाला अशा दिशेने ढकलत आहे, जिथे कायद्याऐवजी ताकद आणि नैतिकतेऐवजी हितसंबंध निर्णायक ठरतात. 

अमेरिकेचा व्हेनेझुएलावरील हल्ला, राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडून अमेरिकेत नेणे आणि त्यांच्यावर तिथे खटले सुरू करणे, हा घटनाक्रम केवळ दोन देशांपुरता मर्यादित नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदे, सार्वभौमत्व, जागतिक सत्ता-संतुलन आणि लोकशाही मूल्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अमेरिकेची कारवाई जगाला अशा दिशेने ढकलत आहे, जिथे कायद्याऐवजी ताकद आणि नैतिकतेऐवजी हितसंबंध निर्णायक ठरतात. 

व्हेनेझुएलावरील हल्ल्याचे समर्थन करताना, अमली पदार्थांविरोधातील लढा, भ्रष्ट शासन आणि लोकशाहीच्या पुनर्स्थापनेचे कारण अमेरिका पुढे करत आहे. परंतु, हा युक्तिवाद सोयीस्कर आणि संशयास्पदही आहे. दस्तुरखुद्द अमेरिकेतच अमली पदार्थांची समस्या गंभीर आहे. तिथे `ड्रग्ज कार्टेल्स’ सक्रिय आहेत. शस्त्र आणि ड्रग्जमाफियांची साखळी उघडपणे कार्यरत आहे. पण, अमेरिका बलाढ्य असल्याने कोणीही हस्तक्षेपाचा विचारही करू शकत नाही. नियम नेहमीच कमकुवतांसाठी असतात आणि शक्तिशाली स्वतःसाठी वेगळे निकष लावतात, हे यातून स्पष्ट झाले आहे. 

या संपूर्ण घटनाक्रमाच्या मुळाशी असलेले खरे कारण म्हणजे व्हेनेझुएलातील प्रचंड खनिज तेलसाठे! खनिज तेल केवळ आर्थिक संपत्ती नाही, तर द्वितीय महायुद्धानंतरच्या जागतिक राजकारणात सत्ता, प्रभाव आणि नियंत्रण राखण्याचे प्रमुख साधन आहे. व्हेनेझुएलाने तेलसाठे राष्ट्रीय नियंत्रणाखाली ठेवले, परदेशी तेल कंपन्यांच्या मक्तेदारीला मर्यादा घातल्या आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण स्वीकारले, तेव्हापासून तो देश अमेरिकेच्या रोषाचा केंद्रबिंदू बनला. लोकशाही आणि अमली पदार्थ व्यापाराच्या नावाखाली योग्य ठरवला जात असलेला हल्ला प्रत्यक्षात उर्जा-सुरक्षा आणि संसाधनांवरील नियंत्रणासाठीचा संघर्ष आहे. अमेरिकेचा इतिहास पाहिला, तर तेल आणि हस्तक्षेपाचे नाते नाकारताच येत नाही. 

इराकमधील युद्ध, लिबियातील हस्तक्षेप, मध्य पूर्वेतील अनेक संघर्ष यामागे लोकशाहीपेक्षा तेल आणि सामरिक हित अधिक निर्णायक ठरले, हे उघड गुपित आहे. आधी आर्थिक निर्बंध लादून कोंडी, मग आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या सरकारची बदनामी, अंतर्गत अस्थिरतेस चालना आणि शेवटी लष्करी कारवाई, ही अमेरिकेची `मोडस ऑपरेंडी’ आहे. व्हेनेझुएलाच्या बाबतीतही तोच `पॅटर्न’ दिसतो. ताजा घटनाक्रम अचानक घडलेला नसून, तो दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे. यामध्ये सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे एका सार्वभौम देशाच्या राष्ट्राध्यक्षाला पकडून नेणे! हा आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या तत्त्वांनाच सुरुंग आहे. 

राष्ट्राध्यक्ष मादुरो दोषी असतील तर त्यांच्यावरील कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालय, संयुक्त राष्ट्रांच्या यंत्रणा आणि बहुपक्षीय प्रक्रिया अस्तित्त्वात आहेत. त्या सगळ्यांना बाजूला सारून लष्करी बळाचा वापर करणे, हे स्वत:ला जगाचा पोलिस मानणारी अमेरिका आता स्वतःला जगाची न्यायसंस्थाही मानू लागल्याचेच द्योतक!  या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांची भूमिका अधिकच लाजिरवाणी ठरते. एका सार्वभौम देशावर हल्ला होतो, राष्ट्राध्यक्ष ताब्यात घेतला जातो आणि संयुक्त राष्ट्रे केवळ चिंता व्यक्त करून मोकळी होतात! 

सुरक्षा परिषदेतील नकाराधिकारांमुळे पाच बलाढ्य देशांची मनमानी सुरू आहे आणि परिणामी संयुक्त राष्ट्रांचे औचित्य आणि उपयुक्ततेवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. व्हेनेझुएलानंतर क्युबा, मेक्सिको आणि कोलंबियाही अमेरिकेच्या `टार्गेट’वर असल्याचा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा अराजक वाढवणारा म्हटला पाहिजे. 

आज व्हेनेझुएलाचे तेल कारण ठरले आहे, उद्या इतर कोणत्या देशाच्या कोणत्या नैसर्गिक संसाधनाची अमेरिकेला हाव सुटेल! हा धोकादायक पायंडा आहे. त्यामुळे इतर बलाढ्य देशांनाही शेजारी किंवा कमकुवत देशांमध्ये हस्तक्षेपाचे निमित्त मिळू शकते. एकीकडे युद्ध संपवण्याचे दावे करायचे आणि दुसरीकडे स्वतःच युद्ध पुकारायचे, हा उघड दुटप्पीपणा आहे. जेव्हा शक्ती स्वतःला कायद्यापेक्षा वर मानते, तेव्हा अराजकाकडे वाटचाल सुरू होते. आज व्हेनेझुएला या स्थितीत आहे, उद्या कोण असेल, हे सांगता येत नाही. 

नैसर्गिक संसाधनांवरील हक्क, स्वतंत्र परराष्ट्र धोरण, सार्वभौमत्व हे मुद्दे केवळ एका देशापुरते मर्यादित नसतात. अशा कारवायांविरोधात गप्प बसणे म्हणजे अप्रत्यक्षपणे अन्यायाला मान्यता देणे होय. विद्यमान संघर्ष मादुरो विरूद्ध अमेरिका एवढा मर्यादित नाही, तर तो जागतिक व्यवस्थेच्या भवितव्याशीही निगडीत आहे. व्हेनेझुएलावरील हल्ला एका देशावरचा नाही, तर तो आंतरराष्ट्रीय कायदे, नैतिकता आणि विवेकावरचा हल्ला आहे. आज जगाने याकडे डोळेझाक केल्यास, उद्या इतिहास विचारेल, जेव्हा नियम मोडले जात होते, तेव्हा जग कुठे होते?

English
हिंदी सारांश
Web Title : Venezuela: America's Relentless Thirst for Oil and Global Power

Web Summary : America's actions in Venezuela, driven by oil interests, undermine international law and global power balance. The pursuit of resources overrules morality, setting a dangerous precedent for interventionism and challenging the relevance of international organizations.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प