शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

आंबेडकरांनी वाढविल्या सोशल इंजिनिअरिंगच्या कक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:18 IST

भारिप-बहुजन महासंघाच्या सुवर्णकाळानंतर भव्यदिव्य यश मिळाले नसले तरी विधानसभेत प्रतिनिधित्व अन् स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारिप-बमसंचा झेंडा कायम राहिला तर अनेक ठिकाणी सत्तेची समीकरणे बदलविण्याची अन् बिघडविण्याची ताकद निर्माण केली. याच सामाजिक अभियांत्रिकीच्या कक्षा रुंदावत, आता अ‍ॅड.आंबेडकरांनी धनगर समाजाला साद घातली आहे.

 - राजेश शेगोकारसोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून अठरापगड जातींना एकत्र बांधत, अकोला जिल्ह्यात सत्तेचा सोपान चढण्याचा यशस्वी प्रयत्न अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी केला. त्या प्रयोगाची चर्चा पुढे महाराष्ट्रात ‘अकोला पॅटर्न’ या नावानं झाली. ‘अकोला पॅटर्न’ने १९९० ते २००४ पर्यंत सुवर्णकाळ अनुभवला. ‘भारिप-बहुजन महासंघ’ या नावाने यशस्वी झालेल्या ‘अकोला पॅटर्न’ला पुढील काळात भव्यदिव असे यश मिळाले नसले तरी, विधानसभेत प्रतिनिधित्व अन् स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारिप-बमसंचा झेंडा कायम राहिला. अनेक ठिकाणी सत्तेची समीकरणे बदलविण्याची अन् बिघडविण्याची ताकद ‘अकोला पॅटर्न’ने निर्माण केली. त्याच सामाजिक अभियांत्रिकीच्या कक्षा रुंदावत, आता अ‍ॅड. आंबेडकरांनी धनगर समाजाला साद घातली आहे.धनगर समाजाने कॉँग्रेस व भाजपकडे आरक्षणाची मागणी केली; पण दोन्ही पक्षांनी समाजाला न्याय दिला नाही. त्यामुळे आता या समाजाला सोबत घेत, आलुतेदार -बलुतेदारांना एकत्र करून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची चळवळ बळकट करून सत्ता हस्तगत करण्याची अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची योजना दिसते. त्यासाठी २० मे रोजी पंढरपुरात ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’चे आयोजन अ‍ॅड. आंबेडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.गेल्या वर्ष-दोन वर्षाच्या कालावधीत भारिप-बमसंने ‘ओबीसी पर्व’च्या माध्यमातून ओबीसींना एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला . आता त्याला धनगर समाजाची जोड मिळाली आहे. अ‍ॅड. आंबेडकरांनी यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये उमेदवार ठरविताना सर्वच जाती-धर्मांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला. परंपरागत व्होट बँकेला त्यामुळे आणखी बळ मिळाल्याने ओबीसीमधील अनेकांना आमदारकीची ऊब मिळाली. त्यामध्ये धनगर समाजाचे हरिदास भदे यांचाही समावेश होतो.धनगर समाज न्याय्य हक्कांपासून वंचित राहिला आहे. कॉँग्रेस व भारतीय जनता पक्षाने आश्वासने दिली; पण त्यांची अंमलबजावणी केली नाही. सत्तेवर येताच १५ दिवसात धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केलेल्या भाजपा नेत्यांनी आता समाजबांधवांचा भावनिक छळ सुरू केला आहे. सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली असून, सरकारविरोधात आरपारची लढाई करायची आहे. व्यवस्था परिवर्तन, नवनिर्मिती व क्रांतीच्या नव्या लढाईला आता तोंड फोडा, धनगर समाज आता ‘मागतकर्ती’ नसून ‘राज्यकर्ती’ होण्यासाठी ही लढाई आहे, असा संदेश सध्या राज्यभर दिला जात आहे.सध्या निवडणुकांचे वारे वेगाने वाहत असून, अ‍ॅड. आंबेडकरांनी सामाजिक अभियांत्रिकीच्या कक्षा वाढविताना, धनगर समाजाने आता सत्तेत सहभागाच्या दिशेने वाटचाल करावी, असा नारा दिला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अ‍ॅड. आंबेडकरांनी यापूर्वीच त्यांची भूमिका स्पष्ट केली असल्याने, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्याच्या निमित्ताने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. पंढरपूर येथे होणा-या या मेळाव्याचे पडसाद राज्यभर उमटणार असल्याने समाजाच्या भरवशावर राजकारण करणाºयांनाही नव्याने भूमिका घ्यावी लागणार असल्याचे चित्र उभे करण्यात भारिप-बमसंचे नेते सध्या तरी यशस्वी झाले आहेत, यात शंका नाही!

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारणnewsबातम्या