शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

AI : माणसांनी घाबरून जावे, की स्वागत करावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 08:07 IST

आपली वांशिक, जातीय, लिंगविषयक ओळख आधीच पूर्वग्रहग्रस्त आहे.  AI मुळे त्यात आणखी भर पडण्याचा धोका संभवतो.

चौथा प्रश्न : मानवी मन/समाजातील पूर्वग्रहांवरच  AI पोसले जाणार,  त्यातून काही भलतेच झाले तर? 

आपली वांशिक, जातीय, लिंगविषयक ओळख आधीच पूर्वग्रहग्रस्त आहे.  AI मुळे त्यात आणखी भर पडण्याचा धोका संभवतो. जे ऑनलाइन उपलब्ध आहे त्याचे विश्लेषण करून मानवी परिभाषेत ते बदलण्याची अमाप क्षमता या बुद्धिमत्तेकडे आहे. AI  समोर एखादा प्रश्न ठेवा. या प्रश्नामध्ये तुम्ही वापरलेल्या शब्दांशी संलग्न मजकुरात बुडी मारून  AI शोध घेते. ‘पॅनकेकचे घटक सांगा’ असे तुम्ही म्हटले तर  AI   पीठ, साखर, मीठ, बेकिंग पावडर, दूध आणि अंडी हे पॅनकेकला वारंवार जोडून येणारे शब्द साधारणतः कोणत्या क्रमाने येतात ते ओळखून उत्तर तयार करते. ‘चॅट जीपीटी ४’ हे असेच एक प्रारूप आहे.

वापरकर्त्याने  प्रश्न कोणत्या संदर्भात विचारला आहे हे AI ला  कळत नाही.  समाजमनात मुरलेले पूर्वग्रहच AI च्या प्रारूपातून समोर येतात.  उदाहरणार्थ आपण म्हणालो ‘डॉक्टर’ तर AI कडून पुरुष डॉक्टर असा अर्थ घेतला जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण बहुतेक डॉक्टर्स पुरुष असतात हा सामाजिक पूर्वग्रह आहे.

माणसाने निर्मिलेले AI माणसालाच हुसकावेल?

- पण, कालपरत्वे  AI  कल्पित आणि सत्य यातील फरक दाखवू शकेल. ‘ओपन ए आय’, एलन टुरिंग इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड अँड टेक्नाॅलाॅजी यासारख्या संस्था पूर्वग्रहांच्या समस्येवर काम करत आहेत.  AI  मध्ये उच्चस्तरीय कार्यकारणभाव आणि मानवी मूल्ये  बिंबवण्याचा प्रयत्न होत आहे.  भिन्न भिन्न सामाजिक पार्श्वभूमीतून आलेल्या लोकांनी प्रारूपे विकसित केली तर  AIवरील पूर्वग्रहांचा शिक्का पुसायला मदत होईल.  

पाचवा प्रश्न : शाळा-कॉलेजातील मुले लिहिणे-वाचणे विसरतील, कारण त्यांचे सगळे काम मुळात AI च करील !

स्वत:चे काम कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी AI चा वापर केला, तर ते ओळखण्यासाठी आजच  AI कडे बरीच काही साधने आहेत. काही शिक्षक मात्र विद्यार्थ्यांनी   AI चा वापर करावा यासाठी  प्रोत्साहन देत आहेत. इंग्रजीच्या ज्येष्ठ शिक्षक चेरी शील्ड  यांनी एका ताज्या लेखात वर्गात त्या चॅट जीपीटी कसे वापरतात याचे  वर्णन केले आहे. अन्य साधनांप्रमाणेच आपल्या विद्यार्थ्यांनी  AI चा वापर करावा असा शील्ड बाईंचा आग्रह आहे. एकेकाळी आपण गुगल सर्च कसा करावा हे विद्यार्थ्यांना शिकविले, तसेच निबंध लेखनासाठी चॅट जीपीटीचा उपयोग कसा करावा याचे धडे विद्यार्थ्यांना द्यावे लागतील. AI चा  स्वीकार आणि त्याची मदत कशी घ्यावी हे सांगणे यातून अध्यापनात क्रांती होऊ शकेल. कॅलक्युलेटर्स मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले, तेव्हा  मूलभूत गणित कसे करावे हे शिकणे विद्यार्थी विसरून जातील अशी भीती काही शिक्षकांना वाटत होती. पण, काहीनी नवे तंत्रज्ञान स्वीकारले आणि गणितामागची विचारकौशल्ये  काय आहेत त्यावर लक्ष केंद्रित केले. शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेत AI च्या वापरासाठी हा अनुभव महत्त्वाचा आहे. 

सहावा प्रश्न : या सगळ्या गदारोळाचे पुढे काय होईल?

AI  मुळे निर्माण होणारे धोके नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. जगभरातल्या सरकारांना या नव्या तंत्रज्ञानाला प्रतिसाद देऊ शकतील असे कायदे तयार करावे लागतील. चुकीची माहिती, बनावट व्हिडीओ, सुरक्षिततेला धोका, रोजगाराची  बदलती बाजारपेठ आणि शिक्षणावर होणारा परिणाम अशा काही गोष्टींची दखल  घ्यावी लागेल.  तुम्ही जे बघता आहात किंवा ऐकता आहात ते खरे नाही हे लोकांना त्यातून कळू शकेल याची तजवीज करावी लागेल.

AI चा राक्षस माणसांच्या नोकऱ्या फस्त करील काय?

माहितीपूर्ण, विचारपूर्वक संवाद साधण्यासाठी राजकीय नेत्यांना सज्ज राहावे  लागेल. खासगी क्षेत्रात  AI   उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांना त्यांचे काम सुरक्षितपणे आणि जबाबदारपणे होईल हे पाहावे लागेल. लोकांचा खासगीपणाचा हक्क जपणे, ते देत असलेले  AI   प्रारूप मूलभूत मानवी मूल्यांशी सुसंगत ठेवणे, पूर्वग्रह कमीत कमी राहतील असे पाहणे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाभ पोहोचतील याची काळजी घेणे आणि दहशतवादी किंवा गुन्हेगार त्यांच्या कारवायांसाठी हे तंत्रज्ञान वापरणार नाहीत, अशी व्यवस्था करणे या गोष्टी त्यात अंतर्भूत होतील. आपण आता माणसांच्या  नव्हे तर कृत्रिम बुद्धिमत्तेशी संवाद करतो आहोत हे भान ग्राहकांना कायम ठेवावे लागेल. AI  हे  जगाच्या जगण्या-वागण्याची रीत बदलू शकणारे तंत्रज्ञान आहे. फायदे तर पुष्कळ आहेत आणि धोकेही आहेतच! पण असे धोके हाताळण्याचा अनुभव आपल्याला आहे, तो आताही उपयोगी ठरू शकेल  यावर विश्वास ठेवणेच उचित होईल.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानBill Gatesबिल गेटस