शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

कृषिआधारित साखर उद्योगाची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 02:24 IST

महाराष्ट्राचा एक प्रमुख कृषिआधारित उद्योग असलेल्या साखर उद्योगाची जाम कोंडी झाली आहे. शेतकरी आणि साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत.

महाराष्ट्राचा एक प्रमुख कृषिआधारित उद्योग असलेल्या साखर उद्योगाची जाम कोंडी झाली आहे. शेतकरी आणि साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी ढिम्म सरकार जागे व्हायला तयार नाही, एक प्रकारची बेबंदशाही निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यालाच पोषक भूमिका सरकार घेत आहे. गेल्या २० आॅक्टोबरपासून राज्यातील ऊस गाळपाचा हंगाम सुरू झाला. डिसेंबरअखेरपर्यंत राज्यातील ९९ सहकारी आणि ८५ खासगी साखर कारखान्यांनी ३९८ लाख ७७ हजार टन उसाचे गाळप करून ४१ लाख१६ हजार टन साखरेचे उत्पादन केले आहे. ही सर्व साखर मागणीऐवजी गोदामात पडून आहे. उसाचे पैसे देण्यासाठी साखर कारखान्यांकडे पैसे नसल्याने, अनेक जिल्ह्यांत गळीत झालेल्या उसाचा पहिला हप्ताही देण्यात आलेला नाही. वास्तविक, कायद्यानुसार गाळप झालेल्या उसाचे पैसे चौदा दिवसांनंतर त्वरित देणे बंधनकारक आहे. कोल्हापूर, सांगलीसह काही जिल्ह्यांत एक पैसाही देण्यात आलेला नाही. साखरेचा सध्या विक्रीचा दर सरकारने २,९०० रुपये क्विंटल निश्चित केला आहे. त्याच्या आसपास बाजारपेठेत दर मिळतो आहे. मात्र, उत्पादन खर्चावर आधारित केंद्र सरकारने उसाचा वाजवी आणि किफायतशीर दर दहा साखर उताऱ्याला २,७५० रुपये प्रतिक्व्ािंटल निश्चित केला आहे. तो एकरकमी देण्याचेही बंधन साखर कारखानदारांवर आहे. मात्र, साखर कारखान्यांना अर्थपुरवठा करणाºया बँका बाजारभावानुसार केवळ २,५५० रुपयांची उचल देतात. त्यातून उत्पादन खर्च आणि बँकेची देणी वजा करता, केवळ १,८०० रुपये प्रतिक्विंटलच अर्थपुरवठा केला जातो. साखरेचे दर जेमतेम २,९०० रुपयांपर्यंत, बँकांची उचल केवळ २,५५० रुपये प्रतिक्विंटल आणि उत्पादन खर्च, तसेच बँकांची देणी ७५० रुपये वजा केल्यानंतर वाजवी किंमत २,७५० शेतकºयांना देणार कशी? खरे तर, साखर उद्योगाद्वारे शेतमालाला (उसाला) हक्काची बाजारपेठ आणि किमान आधारभूत हमीभाव देण्याची व्यवस्था झाली होती. या सर्वाला सध्याच्या अर्थकारणाने छेद गेला आहे. सरकारने साखरेचा किमान दर २,९०० रुपये प्रतिक्विंटलऐवजी ३,४०० ते ३,५०० रुपये करायला हवा आहे. हा दर वाढविल्यास किरकोळ साखरेचा बाजारातील दर किलोस ४० रुपये होऊ शकतो. इतर सर्व वाढलेले भाव पाहता सध्याची भाववाढ, तसेच चलनवाढीचा वेग पाहता, साखरेचा दर चाळीस रुपये प्रतिकिलो होण्यास काहीच हरकत नाही. वास्तविक, थेट साखर घेऊन खाण्याचे प्रमाण कमी आहे. देशात उत्पादित होणाºया साखरेपैकी केवळ ३५ टक्केच साखर ग्राहक थेट खरेदी करून खातो आहे. उर्वरित साखर पेये किंवा मिठाई तयार करण्यासाठी वापरली जाते. ही पेये किंवा मिठाई जीवनावश्यक बाब नाही. साखर उत्पादनासाठी ऊस उत्पादनाची गरज आहे. त्याचा उत्पादन खर्च वाढत असताना, साखरेचे दर कमी होणे मारक आहे. परिणामी, साखर कारखान्यांचे अर्थकारण कोलमडले आहे आणि किमान आधारभूत किंमत शेतकºयांना देणारी व्यवस्थाच संपुष्टात येऊ शकते. जेव्हा-जेव्हा असा बाका प्रसंग साखर उद्योगावर, तसेच परिणामी शेतकºयांपुढे उभा राहिला, तेव्हा राज्य, तसेच केंद्र सरकारने योग्य पावले उचलून मदत केली आहे. आताचे सरकार याबाबत काही करायला तयार नाही. साखर कारखाने आणि शेतकºयांच्या प्रतिनिधींनी गेल्या आॅगस्टपासून साखरेचे दर घसरत असताना या संकटाची दखल घ्या, अशी विनंती केली होती. मात्र, सरकार सुस्तपणे पाहत बसले आहे. ऊसकरी शेतकरी संकटात येत असेल, तर राज्य सरकारची तिजोरी मोकळी करून मदत दिली जाईल, अशी गर्जना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथे शेतकºयांच्या सभेत बोलताना केली होती, तसेच साखरेचा दर वाढवून देण्यास भाग पाडू, असेही सांगितले होते. यातील एकही गर्जना प्रत्यक्षात उतरली नाही. महाराष्ट्रातील एकमेव संघटित, शेतकºयांना किमान हमीभाव देणारा साखर उद्योग संकटात येत असताना, सरकार तोंडावर बोट ठेवून बसले आहे. साखर हंगाम ऐंशी दिवस झाले अद्याप एकही पैसा शेतकºयांना मिळालेला नाही. यामुळे निर्माण झालेल्या कोंडीतून साखर उद्योगाची सुटका केली नाही, तर न भरून येणारी हानी आपण करतो आहोत, हे सरकारला ठणकावून सांगायला हवे!

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने