शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 05:46 IST

नेमेचि येतो मग पावसाळा, तसे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. सत्ता पक्षाकडे असलेल्या प्रचंड बहुमतांच्या ओझ्याखाली दबलेल्या विरोधकांची कामगिरी गेल्या दोन अधिवेशनांमध्ये निराशाजनकच होती.

नेमेचि येतो मग पावसाळा, तसे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. सत्ता पक्षाकडे असलेल्या प्रचंड बहुमतांच्या ओझ्याखाली दबलेल्या विरोधकांची कामगिरी गेल्या दोन अधिवेशनांमध्ये निराशाजनकच होती. यावेळी मराठी-हिंदी वाद, जनसुरक्षा कायदा, शक्तिपीठ महामार्ग, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने झालेले नुकसान, अशी काही शस्त्रे विरोधकांच्या भात्यामध्ये आहेत, पण ती बाहेर काढून सरकारला पुरते घायाळ करण्यासाठी त्यांचा उपयोग कितपत केला जाईल, याबाबत शंका आहे आणि ही शंका पूर्वानुभवावर आधारित आहे. ती विरोधकांनी खोटी ठरविली, तर राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर सरकारची कोंडी विरोधकांना करता येऊ शकेल. गेले काही महिने निराशेच्या गर्तेत सापडलेले विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटलेले दिसत आहेत. या आंदोलनाच्या निमित्ताने सभागृहाबाहेर दिसलेली त्यांची एकी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये दिसली तर त्यांची कामगिरी उत्तम ठरू शकेल.

 हिंदीबाबतचे दोन्ही जीआर रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या घोषणेने त्यांनी विरोधकांच्या मोर्चातील हवा काढली किंवा विरोधकांच्या ऐक्यासमोर नमत सरकारने दोन्ही जीआर रद्द केले असे दोन्ही अर्थ काढले जाऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष नको, म्हणून वर्धेतील पवनार ते सिंधुदुर्गातील पत्रादेवीपर्यंतच्या ८०२ किलोमीटर लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला स्थगिती देणाऱ्या आधीच्या महायुती सरकारने निवडणुकीनंतर सत्तेत येताच या महामार्गाला पुन्हा चालना दिली आहे. शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून नेण्यास महायुतीअंतर्गत असलेला विरोध डावलून महामार्गाचे काम रेटण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यामुळे अधिवेशनात या महामार्गाच्या उपयुक्तेवर सरकारला घेरले जाऊ शकते. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. योग्यवेळी ही कर्जमाफी देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. पण, त्याबाबतची तारीख काही त्यांनी सांगितलेली नाही. तत्काळ कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधक दोन्ही सभागृहांमध्ये किती आक्रमक होतात याबाबत उत्सुकता असेल.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची किनारही या अधिवेशनाला असेल. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थींना निधी देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याच्या पैशांवर मारलेला डल्ला यावरून सरकारचे वाभाडे काढण्याची विरोधकांना संधी असेल. आदिवासींच्या हक्काच्या निधीवर अशा पद्धतीने गदा आणली जाऊ नये, अशी मागणी सर्वपक्षीय आदिवासी आमदारांनी अलीकडेच राज्यपालांना भेटून केली होती. एक काळ असा होता की, आदिवासींच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय आमदार विधिमंडळात एक होत आणि सरकारवर दबाव आणत. यावेळी तसे काही घडले, तर पक्षीय भेद विसरून आपले लोकप्रतिनिधी आपल्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर एकत्र येतात, याची प्रचिती आदिवासी समाजाला येईल. विधानसभेला अद्याप विरोधी पक्षनेता मिळू शकलेला नाही. उद्धवसेनेचे भास्कर जाधव त्यासाठी बाशिंग बांधून बसलेले आहेत. त्यांच्या नावाला त्यांच्याच पक्षाने अद्याप हिरवा झेंडा दाखविलेला नाही. तो दाखविला गेला, तरी सरकारला सभागृहात विविध आयुधांद्वारे अडचणीत आणण्याची क्षमता असलेले जाधव यांच्या नावाला सत्तारूढ महायुतीकडूनही पसंती दिली जाईल का, यावर त्यांची निवड अवलंबून असेल.

सत्ता पक्षाकडे प्रचंड बहुमत असले, तरी विरोधी पक्षनेताच सभागृहात असू नये, ही स्थिती सुदृढ लोकशाहीचे द्योतक नाही. धुळ्यात विधिमंडळाच्या अंदाज समितीचा दौरा असताना, समिती अध्यक्षांच्या पीएच्या खोलीत १ कोटी ८४ लाख रुपये रोख सापडल्याची अत्यंत लाजिरवाणी घटना गेल्या मे महिन्यात घडली होती. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक नेमण्याची घोषणा अजून हवेतच आहे. नीतिमूल्य समिती नेमली जाणार होती, तिचाही अद्याप पत्ता नाही. त्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरतील, अशी रास्त अपेक्षा आहे. त्याहीपेक्षा सत्तापक्ष आणि विरोधक या दोघांनी विधिमंडळ समित्यांसाठी आचारसंहिता निश्चित करावी. समित्यांची बदनामी होईल, असे वर्तन आमच्या हातून होणार नाही, याची खात्री अधिवेशनात सर्वपक्षीय सदस्यांनी दिली, तर विधिमंडळाची प्रतिष्ठा रोखण्यास मदतच होईल. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब भारदे, वि. स. पागे, रामभाऊ म्हाळगींपासून अनेक तत्त्वनिष्ठांचा स्पर्श लाभलेल्या या दोन्ही सभागृहांचे पावित्र्य राखण्याची हमी यानिमित्ताने महाराष्ट्राला दिली गेली, तर ती अधिवेशनाची महत्त्वाची इष्टापत्ती असेल.