शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मशीन आणि माणूस, औद्योगिक क्रांतीने जग बदलले; समाज उन्नत झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 05:59 IST

जगातील  धोरणकर्ते, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि नवउद्योजक या परिषदेत एकत्र येत आहेत. जागतिक शक्तिसमीकरणांच्या नव्या पर्वाची ही चाहूल आहे.

औद्योगिक क्रांतीने जग बदलले. समाज उन्नत झाला. समृद्धी आली. विकास तळागाळात पोहोचू लागला. त्यापश्चात आलेल्या इंटरनेट क्रांतीने जगाला नवे वळण दिले. आता त्याच इंटरनेटच्या जोरावर कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय क्रांती जगाची दिशा बदलण्याच्या भूमिकेत आहे. वाफेच्या इंजिनापासून संगणकापर्यंत मानवाने अनेक भराऱ्या घेतल्या. आता अल्गोरिदम आणि डेटा ही नवी शक्ती ठरत आहे. आज एखादा शेतकरी मोबाइलवर हवामानाचा अचूक अंदाज घेतो, विद्यार्थी एआयच्या मदतीने अभ्यासाची तयारी करतो आणि लघुउद्योगाचा मालक बाजारपेठेचा डेटा पाहून निर्णय घेतो, हीच त्या बदलाची सुरुवात आहे. आज मानवजातीसमोर उभ्या असलेल्या सर्वांत मोठ्या तांत्रिक वळणावर भारत निर्णायक भूमिकेत उभा आहे. दिल्लीत सुरू असलेली ‘इंडिया-एआय इम्पॅक्ट’ शिखर परिषद म्हणूनच महत्त्वाची !

जगातील  धोरणकर्ते, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि नवउद्योजक या परिषदेत एकत्र येत आहेत. जागतिक शक्तिसमीकरणांच्या नव्या पर्वाची ही चाहूल आहे. आज एआयचा वावर बँकिंग, विमा, आरोग्य, शिक्षण, संरक्षण, उत्पादन आणि शेतीपर्यंत असा सर्वत्र आहे. निर्णयप्रक्रिया वेगवान होत आहे. खर्च कमी होत आहेत. अचूकता वाढत आहे. २०३२ पर्यंत भारतातील एआय बाजार १३.१ लाख कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. एकट्या भारताची ही एआय बाजारपेठ अनेक देशांच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी असेल. भारतीय उद्योगांनी एआय साधनांचा स्वीकार करून कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल सुरू केले आहेत. तंत्रज्ञानाचा वेग जितका जास्त, तितकीच त्याची छायाही गडद असते. डीपफेक, दिशाभूल करणारी माहिती, सायबर हल्ले, वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचे उल्लंघन आणि रोजगारातील अनिश्चितता ही  मोठी आव्हाने आहेत.  औद्योगिक क्रांतीवेळीही आव्हाने होती. ती पेलली गेली. पण आता एआयमुळे वेगळ्या प्रकारची असमानता वाढण्याचा धोका आहे. समाजात एक पूर्ण पिढी एआयमार्गी, एआयस्नेही असेल तर आधीच्या पिढीची या एआय वेगाशी जुळवून घेताना दमछाक होईल.

ही नवी दरी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तंत्रज्ञान जेव्हा समतेचे साधन न राहता सत्तेचे केंद्रीकरण करू लागते, तेव्हा लोकशाहीसमोरही नवे प्रश्न उभे राहतात. निर्णय जर अल्गोरिदम घेऊ लागले, तर त्या निर्णयांना जबाबदार कोण ठरणार, मशीन की माणूस? त्यामुळे एआयचा विकास हा केवळ बाजारकेंद्री ठेवून चालणार नाही, तो मानवकेंद्री आवश्यक आहे. यातच भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करताना भारताने तंत्रज्ञान लोकाभिमुख करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. आधार, यूपीआय आणि डिजिटल व्यवहार सामान्य नागरिकांच्या हातात दिले, तोच आपला देश एआयही लोकांच्या सेवेत आणू शकतो, अशी अपेक्षा स्वाभाविक आहे. मजबूत डेटा संरक्षण कायदे, पारदर्शक धोरणे आणि इनोव्हेशनला प्रोत्साहन देणारी व्यवस्था या त्रिसूत्रीवर भर द्यावा लागेल. अमेरिका आणि चीन एआय स्पर्धेत आघाडीवर असले तरी भारतही यात मागे नाही. तो स्पर्धकही आहे आणि सेतूही. कारण भारताची बौद्धिक संपदा आणि संशोधन क्षमता जगाने आधीच मान्य केली आहे. लोकशाही मूल्यांवर आधारित, समावेशक आणि जबाबदार एआयचा मार्ग जगासमोर मांडण्याची क्षमता भारतातच आहे.

या स्पर्धेत आधीच आघाडीवर असलेले देश आतापर्यंत एआयकडे नवा उद्योग म्हणून पाहतात. भारताचे तसे नाही. भांडवल आणि तंत्रज्ञानाच्या वर्चस्वातून जागतिक प्रभाव प्रस्थापित करू पाहणाऱ्या महासत्तांना भारत आपली ताकद पुन्हा दाखवून देऊ शकतो.  संशोधनातील गुंतवणूक, कौशल्यविकास, स्टार्टअप्सना बळ आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांची सांगड घालून भारताने एआयमध्ये दीर्घकालीन धोरण स्वीकारले पाहिजे. नव्या रोजगारांच्या संधी निर्माण करताना कौशल्य प्रशिक्षणावर भर देणेही  गरजेचे आहे. संधी आणि भीती  या दोन्ही टोकांमध्ये संतुलित मार्ग निवडायचा आहे.  दिल्लीतील परिषदेतून जर दूरदृष्टी, धैर्य आणि कृतिशीलता यांचा संगम घडला, तर भारत केवळ सहभागी राष्ट्र राहणार नाही, दिशादर्शक शक्ती ठरेल. ही परिषद केवळ घोषणांची आतषबाजी ठरू नये; ती कृतीच्या आराखड्यात रूपांतरित झाली तरच ते खरे यश. एआयचे युग सुरू झाले आहे. त्या युगाची दिशा आता भारताने ठरवायची आहे. कारण तंत्रज्ञान जग बदलते; पण दिशा ठरवते ती राष्ट्राची दृष्टी.

English
हिंदी सारांश
Web Title : Machines, Humans, and AI: Industrial Revolution Transforms the World

Web Summary : AI is poised to reshape the world, impacting sectors from banking to agriculture. India's role is crucial, balancing innovation with ethical considerations. Data protection, transparent policies, and skill development are key for responsible AI adoption. India can lead the world in human-centric AI development.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स